RBI Monetary Policy : आरबीआयच्या सध्या सुरु असणाय़ऱ्या तीन दिवसीय द्वैमासिक पतधोरण बैठकीचा आजचा अखेरचा दिवस.
कर्ज, कर्जाचे हफ्ते आणि त्याचा पगाराच्या गणितावर होणारा परिणाम ही आकडेमोज सर्वसामान्य गटातील दर दुसरा व्यक्त करताना दिसतो. याच गणितावर परिणाम करणाऱ्या घोषणांकडेही सामान्य वर्गाची नजर असते. अशीच एक अतिशय महत्त्वाची घोषणा आरबीआय अर्थात देशातील बँक क्षेत्रात सर्वोच्च पदी असणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून करण्यात आली आहे.
मागील तीन दिवसांपासून आरबीआयची द्वैमासिक पतधोरण बैठक सुरू असून, 8 ऑगस्ट रोजी या बैठकीचा शेवटचा दिवस. याच बैठकीत झालेल्या चर्चा आणि त्यानंतर घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या निर्णयांसंदर्भात गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी माध्यमांना संबोधित करत खासगी आणि गृहकर्जा पासून बँकेच्या इतर धोरणांवर लक्ष ठेवून असणाऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली. आरबीआयच्या घोषणेनुसार रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आला नसून, एमपीसीमधील 6 पैकी 4 सदस्यांनी व्याजदरांमध्ये बदल करण्यावर हरकत दर्शवली असून, सध्यातरी रेपो रेट 6.
शक्तिकांता दास यांनी आरबीआयचं पतधोरण जाहीर करण्यापूर्वी अर्थविषयक क्षेत्रातील जाणकारांच्या माहितीनुसार यावेळी आरबीआयकडून रेपो रेटमध्ये घट केली जाण्याची शक्यता धुसर आहे. अद्यापही महागाई दर चिंताजनक स्तरावर असून, परिणामी फेब्रुवारी 2023 पासूनच रिझर्व्ह बँकेनं रेपो रेट 6.5 टक्क्यांवर स्थिर ठेवले होते. यावेळीही रेपो रेट स्थिर असल्यामुळं सलग नवव्यांदा या दरांमध्ये बदल झालेले नाहीत.मागील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये आरबीआयनं रेपो रेट वाढवून 6.5 टक्क्यांवर आणले होते.
रेपो रेट या शब्दाचा सातत्यानं वापर होत असतानाच त्याचा नेमका अर्थ अनेकांच्याच लक्षात येत नाही. तर, हा तो दर असतो, ज्या आधारे बँकांना कर्ज दिलं जातं. रेपो रेट वाढला म्हणजे बँकांना आरबीआयकडून अधिक व्याजदरानं कर्ज मिळणार. ज्यामुळं कार लोन, होम लोन, पर्सनल लोन यांच्यावरील व्याजदरात वाढ होऊन त्याचा थेट परिणाम कर्जाच्या हफ्त्यांवर होत असून, तुमच्या खर्चाची गणितं बिघडताना दिसतात.भारत
Rbi News RBI Latest Update RBI MPC होम लोन Monetary Policy Emi RBI MPC Meet Repo Rate Reserve Bank Of India आरबीआय शक्तिकांत दास RBI MPC Meeting रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
मोठी घोषणा! मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाअंतर्गत 50 हजार युवकांना मिळणार इतके रुपयेMukhyamantri Yojnadut Karykram:लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरु असताना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय.राज्यातील तरुणांसाठी आता मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.
Read more »
Breaking News : पूजा खेडकरवर मोठी कारवाई, UPSC ने रद्द केली उमेदवारीPooja Khedkar News : युपीएससीनं पूजा खेडकर यांना दोषी ठरवलं आहे. सिव्हील सर्विस नियमांतर्गत युपीएससीने मोठा निर्णय घेतलाय.
Read more »
Mhada Lottery : अखेर म्हाडानं मनावर घेतलं; सोडतीत नाव न आलेल्यांसाठी 'इथं' काढणार दुसरी लॉटरी....; डिपॉझिट तयार ठेवाMhada Lottery : म्हाडाच्या आगामी सोडतीसाठी अनेकजण इच्छुक असतानाच या म्हाडाकडून आणखी एकदा सोडतीसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
Read more »
मुंबई पालिकेकडून पदव्युत्तर निवासी विद्यार्थ्यांच्या पगारवाढी संदर्भात मोठा निर्णयSalary Hike for Post Graduate Resident: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील पदव्युत्तर निवासी विद्यार्थ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी 22 जुलै 2024 पासून संप करण्याची सूचना दिली होती.
Read more »
SC-ST अंतर्गत उप-श्रेणी तयार करु शकता; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णयसर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) 2005 चा निकाल रद्द केला ज्यामध्ये राज्य सरकारांना (State Government) आरक्षणाच्या (Reservation) उद्देशाने अनुसूचित जातींच्या उप-श्रेणी (Sub Category) तयार करण्याचा अधिकार नाही असं सांगण्यात आलं होतं.
Read more »
हार्दिक पांड्याला कर्णधारपदावरुन हटवल्यानंतर गौतम गंभीरचा मोठा निर्णय, नेटमध्ये थेट त्याला....भारतीय संघ आज श्रीलंकेविरोधातील (Ind vs SL) पहिला टी-20 (T-20) सामना खेळणार आहे. गौतम गंभीर (Gautam Gambhir) भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर होणारी ही पहिलीच मालिका आहे.
Read more »