Mumbai News : मुंबईला जागतिक स्तरावरील शहराचा दर्जा देऊ पाहणारे अनेक प्रकल्प सध्या नागिरकांच्या सेवेत आले असून, त्यातील एक महत्वाकांक्षी प्रकल्प आता आणखी अद्ययावत पद्धतीनं नागरिकांसाठी सज्ज झाला आहे.
Mumbai News : मुंबईकरांचा प्रवास वेगवान पण, 'या' वेळेतच कोस्टल रोड च्या दुसऱ्या टप्प्यावरून प्रवासास परवानगी
Mumbai news coastal Road Phase 2 Opening In Mumbai Full Haji Ali To Marine Drive Route latest updatesवांद्रे- वरळी सी लिंकची बांधणी झाल्यानंतर त्यावरून प्रवास करताना कायमच अनेकांच्या मनात भारावल्याची भावना घर करून जात होती. शहराच्या सौंदर्यासह रस्ते वाहतुकीमध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या या सी लिंकप्रमाणं अनेक उड्डाणपूल, फ्री वे, अटल सेतू या आणि अशा बऱ्याच प्रकल्पांनी खऱ्या अर्थानं शहरातील नागरिकांचा प्रवास अधिक सुकर केला. त्यातच आता कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याचीसुद्धा भर पडणार आहे.
2024 या वर्षाच्या सुरुवातीला अटल सेतूचं लोकार्पण पार पडलं आणि त्यामागोमागच कोस्टल रोडचा पहिला टप्पाही प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर आता याच सागरी किनारा मार्ग अर्थात कोस्टल रोडचा आणखी एक टप्पा प्रवाशांच्या सेवेत येणार असून, सोमवार, 10 जून 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुसऱ्या टप्प्यावरील मार्गिकेची पाहणी केल्यानंतर मंगळवारपासून नागरिकांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पातील मरीन ड्राईव्ह पासून सुरू होणारा दुसरा भूमिगत बोगदा वाहतुकीसाठी सुरु केला जाईल.
कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याच्या उपलब्धतेमुळं मुंबईतील मरीन ड्राईव्ह ते हाजी अली असा एकूण 6.25 Km अंतराचा हा बोगदा अवघ्या 10 मिनिटांमध्ये पाक करता येणार आहे. ज्यामुळं शहरातून प्रवास करणाऱ्यांना आता प्रवासातील बराच वेळ वाचवता येणार असून, वाहतूक कोंडीतून त्यांची सुटकाही होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.वाहतुकीसाठी पूर्ण वेळ खुला नसेल कोस्टल रोड
कोस्टल रोडचा दुसरा टप्पा वाहतुकीसाठी 24 तास खुला नसेल याची प्रवाशांनी नोंद घ्यावी. मिळालेल्या माहितीनुसार आठवड्यातील एकूण पाच दिवस म्हणजे सोमवार ते शुक्रवारदरम्यान सकाळी 7 ते सायंकाळी/ रात्री 11 वाजेपर्यंत म्हणजेच एकूण 16 तास हा बोगदा वाहतुकीसाठी खुला असेल. शनिवार आणि रविवार या प्रकल्पातील उर्वरित काम आणि देखभालीचं काम करण्यात येणार आहे. दरम्यान, कोस्टल रोडच्या या दुसऱ्या टप्प्यामुळं वरळी, वांद्रे, ताडदेव, पेडर रोड इथे जाणाऱ्या वाहतुकीला वेग मिळणार आहे.
Mumbai Mumbai Coastal Road Coastal Road Phase 2 Coastal Road Phase 2 Opening Date Coastal Road Phase 2 Opening Day Haji Ali To Marine Drive मरीन ड्राईव्ह हाजीअली कोस्टल रोड मराठी बातम्या बातम्या
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
दीड तासांचे अंतर 20 मिनिटांत कापता येणार; मुंबईतील 'या' महत्त्वाच्या रस्त्याचे काम प्रगतीपथावरMumbai News Today: मुंबईकरांचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी प्रशासनाकडून रस्ते, उड्डाणपुल आणि मेट्रोचे जाळे परसवण्यात येत आहेत.
Read more »
Zee 24 Taas Impact: कोस्टल रोडच्या भुयारी मार्ग गळती संदर्भात मुख्यमंत्र्यांनी दिल्या 'या' सूचनाCoastal Road subway leak: कोस्टल रोडच्या भुयारी मार्गाला गळती लागल्याची बातमी झी 24 तासने सर्वप्रथम दाखवली होती. या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळालाय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बातमीची दखल घेतली आहे. तसेच त्यांनी कोस्टल रोडची पाहणीदेखील केली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Read more »
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांवर संतापली मलायका अरोरा! म्हणाली...काल त्यांच्या ब्रेकअपची चर्चा सुरु झाला असून त्यांनी त्यांचं पाच वर्षांचं नातं संपवल्याचं म्हटलं. पण या सगळ्या चर्चांमध्ये आता त्यांच्या मॅनेजरनं वक्तव्य केलं आहे.
Read more »
इमरान खाननं जंगलात बनवला आलिशान व्हिला! नेटकऱ्यानं विचारलं 'पैसे कुठून आले?' तर सडेतोड उत्तर देत अभिनेता म्हणाला...पहिल्याच चित्रपटातूनच इमरान हा नॅशनल क्रश झाला होता. पण काही काळानंतर तो या चित्रपटसृष्टीपासून लांब झाला.
Read more »
गॅस चोरी करताना टँकरचा भीषण स्फोट, चाकण-शिक्रापूर परिसर हादरला; नेमकं काय घडलं?सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण यात घरांची मोठी पडझड झाली.
Read more »
कानाला टॅग नसलेल्या बैलाला शर्यतीत भाग घेता येणार नाही; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशटॅग नसलेल्या बैलांना बैलगाडा शर्यतीमध्ये सहभाग घेण्यास परवानगी देऊ नये असे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
Read more »