Maharashtra Bandh on 24th August: महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) बदलापूरमधील लैंगिक अत्याचार (Badlapur Sexual Assault) प्रकरणाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) घोषणा केली आहे.
Maharashtra Bandh on 24th August: महाविकास आघाडीने बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत या बंदमागे नेमकं कारण काय? अशी विचारणा केली आहे.: महाविकास आघाडीने बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत या बंदमागे नेमकं कारण काय? यासंबंधी माहिती दिली आहेत. तसंच त्यांनी महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.
"या बंदमध्ये राजकारण नाही. हा विकृतीचा व्हायरस आहे. कोणीही असं कृत्य करण्याची हिंमत व्हायला नको. जर कोणी केली तर त्याला ताबडतोब कठोर शिक्षा होते ही भीती विकृतांच्या मनात निर्माण कऱण्यासाठी हा बंद करत आहोत. सुरक्षित बहिण ही प्राथमिकता असली पाहिजे. जर बहीण सुरक्षित असेल तर लाडकी बहीण योजना आणता येतात. 24 ऑगस्टला महाराष्ट्रातील तमाम जनतेने जात, पात धर्म बाजूला ठेवावे. जर मुलगी शाळेत सुरक्षित नसेल तर शिक्षणाचा अर्थ काय?", असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
"कडेवरच्या मुलांवर अत्याचार झाल्यानंतर ते घाबरुन शांत बसतात. जर अत्याचार उघड झाल्यावर पोलीस शांत बसणार असतील तर जनतेने करायचं काय? हे परवापासून जे घडत आहे तो जनतेचा उद्रेक आहे. त्याला वाचा फो़डण्यासाठी हा 24 ऑगस्टचा बंद करत आहोत. हा बंद कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून माता भगिनींच्या रक्षणासाठी किती जागरुक आहोत हे दाखवण्यासाठी आहे. सर्वांनी हा बंद पाळला पाहिजे," असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी आंदोलनामागे विरोधक असल्याचा आरोप केला आहे असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की,"निवडणूक डोळ्यामसोर ठेवून राबवलेली ही योजना नव्हती. ठाणे जिल्ह्यात बदलापूर येतं. ही घटना त्यांना मान्य आहे का? हे दुष्कृत्य ते अमान्य करत आहेत? काल मुख्यमंत्री कुठे होते. राज्यभर निषेध होताना रत्नागिरीत लाडक्या बहिणीसाठी हात पसरुन राखी बांधून घेत होते. राखीच्या बंधनाला तरी जागा, किती निर्लज्ज व्हायचं. मुख्यमंत्र्यांनी तसं वाटणं स्वाभाविक आहे. कारण ते घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत.
Badlapur School Crime Badlapur Crime Mumbai High Court Badlapur News Sexual Assault Bombay High Court Hearing On Badlapur School Case Badlapur News Mumbai News Mumbai News Today Latest Mumbai News Latest Maharashtra News बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण बदलापूर शाळा गुन्हा बदलापूर गुन्हा मुंबई उच्च न्यायालय बदलापूर बातम्या लैंगिक अत्याचार बदलापूर शाळा प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात सुना मुंबई बातम्या
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Badlapur School Case: 'अगदी भाजपाचा कार्यकर्ता असला तरी...'; बदलापूर प्रकरणावर ठाकरेंची संतप्त प्रतिक्रियाUddhav Thackeray On Badlapur School Sexual Assault Case: मातोश्री येथे पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी शक्ती विधेयकाचा उल्लेख करत बदलापूर अत्याचार प्रकरणावर भाष्य केलं आहे.
Read more »
बदलापूर घटनेच्या निषेधार्थ 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक, शाळेतील CCTV फुटेजही गायब?Badlapur Case : बदलापूरमधील दोन चिमुकल्यांवरील अत्याचारप्रकरणी महाविकास आघाडीने २४ तारखेला महाराष्ट्र बंद ची हाक दिली आहे. बदलापूरची घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे.
Read more »
Badlapur Sexual Assault: बदलापूरमधील आंदोलनामागे नेमकं कोण? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले, म्हणाले 'CM शिंदेना ही घटना...'Badlapur Sexual Assault: बदलापूरमधील लैंगिक अत्याचार घटनेच्या निषेधार्थ 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी हा बंद राजकीय नसून, सर्वांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन केलं आहे.
Read more »
कोण असणार मविआचा मुख्यमंत्रिपदाचा दावेवार? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं!Uddhav Thackeray: आज मुख्यमंत्री म्हणून जाहीर करा मी पाठिंबा द्या वज्रमूठ कामातून दिसली पाहिजे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
Read more »
'मणिपूरला तर गेले नाहीत पण मोदी, शाहांनी बांगलादेशला जाऊन हिंदूंवरील...'; ठाकरेंची मागणीUddhav Thackeray On Bangladesh Crisis: जनता सर्वोच्च असते हे बांगलादेशमधील घटनेवरुन दिसून आल्याचं सांगताना उद्धव ठाकरेंनी इस्रायल आणि श्रीलंकेचाही उल्लेख केला.
Read more »
ठाकरेंच्या 'एक तर तू राहशील किंवा मी राहीन' चॅलेंजवर फडणवीसांचं मोजून 4 शब्दात उत्तर; म्हणाले, 'योग्य...'Fadnavis React On Uddhav Thackeray Challenge: उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये बोलताना एकेरी उल्लेख करत दिलेल्या आव्हानावर फडणवीसांनी मोजक्या शब्दात पहिली प्रतिक्रिया नोंदवली.
Read more »