अमेरिकन युट्यूबरने चीनमधून विकत घेतलेल्या रोबोट कुत्र्याचा रिव्ह्यू शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, पण यामागील कारण मात्र वेगळं आहे.
अमेरिकन युट्यूबर IShowSpeed आपल्या अतिशयोक्ती स्वभाव आणि स्टंटमुळे नेहमी चर्चेत असतो. तो नेहमीच जगावेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. यादरम्यान अनेकदा त्याची फजितीही होते. हे सर्व व्हिडीओ तो सोशल मीडियावर शेअर करत असतो, जे व्हायरल होत असतात. नुकतंच त्याने चीनमधून विकत घेतलेल्या रोबोट कुत्र्याचा रिव्ह्यू केलेला व्हिडीओ शेअर केला आहे. तब्बल 84 लाखात त्याने हा रोबोट खरेदी केला आहे. पण जेव्हा IShowSpeed त्याला भुंकण्यास सांगितलं तेव्हा त्याने आग ओकण्यास सुरुवात केली.
या व्हिडीओला 45 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यू मिळाले आहेत. व्हिडीओत IShowSpeed रोबोट कुत्र्याचं टेस्टिंग करताना दिसत आहे. यामध्ये कुत्राही कमांड फॉलो करत बस सांगित्यावर बसत असून, हस्तांदोलन करताना दिसत आहे. युट्यूबरने यावेळी ब्लॅकफ्लिप करत कुत्र्यालाही तसंच करायला सांगतो. कुत्रा कॉपी करताना उडी मारताना दिसत आहे. पण जेव्हा IShowSpeed त्याला भुंकण्यास सांगतो तेव्हा अनपेक्षित प्रकार घडतो. कुत्रा भुंकण्याऐवजी आग ओकण्यास सुरुवात करतो. यामुळे आश्चर्यचकित झालेला युट्यूबर शेजारी असणाऱ्या स्विमिंग पूलमध्ये उडी मारतो.YouTube वर त्याने याचा सविस्तर व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये नेमकं काय झालं होतं हे दिसत आहे.
दरम्यान या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी आपला विश्वासच बसत नसल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी हा डॉग रोबोट नाही तर ड्रॅगन रोबोट असल्याचं म्हटलं आहे. एकाने म्हटलं आहे की,"हा थोडा धोकादायक आहे. हा आगीने मालकाचा चावा घेतो". तर एकाने पण या कुत्र्याचं नेमकं उद्दिष्ट काय? तो आग का ओकतोय? अशी विचारणा केली आहे.
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
मनोज जरांगेंनी वाहत्या नदीच्या प्रवाहात घातली गाडी, पुढे काय झालं पाहामराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे सध्या बीड दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी यांनी थेट वाहत्या नदीच्या प्रवाहात गाडी घालून जीवघेणा प्रवास केला.
Read more »
कार खरेदी करणं होणार स्वस्त! नितीन गडकरी यांचा तो निर्णय ठरणार फायदेशीर, 25 हजारापर्यंतचे डिस्काउंट मिळणारCar Discount Offers: यंदाच्या दसरा-दिवाळीला तुम्हीदेखील कार खरेदी करु शकणार आहात. काय आहे सरकारची योजना पाहा
Read more »
Breaking News Live Updates : गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपाच्या पावित्र्यातBreaking News Live Updates : राज्यासह देशात राजकारणापासून इतर सर्व क्षेत्रांपर्यंत नेमकी काय आणि कशी परिस्थिती? पाहा Live Updates
Read more »
'मॅडम जरा मला...,' Zomato डिलिव्हरी बॉयने अचानक पँटची चेन उघडली अन्...; रात्री 1 वाजता तरुणीची पोस्टतरुणीने एक्सवर पोस्ट शेअर करत मंगळवारी रात्री उशिरा आपण कॉफीची ऑर्डर दिली असता नेमकं काय झालं याचा खुलासा केला आहे.
Read more »
Maharashtra Weather News : राज्यात कुठं पाऊसधारा, कुठं उष्ण वारा? पाहा सविस्तर हवामान वृत्तMaharashtra Weather News : मुंबईच्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी, उर्वरित महाराष्ट्रात मात्र पावसाळ्याच उन्हाळ्याची जाणीव... पाहा हवामान विभागाचं यावर काय म्हणणं...
Read more »
Olympics 2024 : रात्रभर न झोपता सायकलिंग, दोरीच्या उड्या अन्...; आदल्या रात्री विनेश फोगाटसोबत नेमकं काय घडलं?Vinesh Phogat disqualified : अंतिम सामन्यात धडक मारल्यानंतर विनेशला हा आनंद साजराच करता आला नव्हता. पाहा तिच्यासोबत नेमकं काय घडलं...
Read more »