मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे सध्या बीड दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी यांनी थेट वाहत्या नदीच्या प्रवाहात गाडी घालून जीवघेणा प्रवास केला.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे सध्या राज्यभर दौरे करत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यासाठी आणि आरक्षणाचा लढा आणखी तीव्र करण्याच्या दृष्टीने त्यांचे हे दौरे सुरु आहेत. या दौऱ्यांमध्ये ते मराठा बांधव आणि सहकाऱ्यांशी चर्चा करुन निवडणुकीची रणनीती आखत आहेत. त्यातच मनोज जरांगे सध्या बीड दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी जीवघेणा प्रवास करत सर्वांना श्वास रोखून धरायला भाग पाडलं.
मनोज जरांगे पाटील यांचा आज बीड जिल्हा दौरा होता. या दौऱ्यामध्ये ते सूर्याची वाडी या गावातून धुमाळवाडीकडे जात होते. धुमाळवाडीकडे जात असताना बिंदुसरा नदीला पूर आला होता. तरीही जरांगे पाटील यांनी या नदीतून गाडी टाकत जीवघेणा प्रवास केला. बीड जिल्हा पोलिसांकडून जरांगे पाटील यांना नेहमीच पोलीस सुरक्षा पुरवली जाते. परंतु आज स्कॉटिंग व्हॅन नसल्याने मनोज जरांगे या मार्गाने निघाले. नदीला पूर आला होता तरीही जरांगे पाटील यांच्या गाडीने या नदीमधून प्रवास केला. यावेळी उपस्थितांची धाकधूक वाढली होती.
मनोज जरांगे यांच्यासह कारमध्ये पोलीस कॉन्स्टेबलसह मराठा आंदोलकही होते. मनोज जरांगे यांची कार नदीच्या पाण्यात उतरवण्यापूर्वी सहकाऱ्यांनी दुसरी कार अगोदर पाण्यात उतरवली होती. ती कार सुखरुप पोहोचल्याची खात्री झाल्यानंतर मनोज जरांगे यांना कारमधून नदीपलीकडे नेण्यात आलं. दरम्यान, सिंधुदुर्ग किल्ल्यावरील पुतळा दुर्घटनेवर बोलताना आपण 1 सप्टेंबर रोजी राजकोटला जाणार असून कोणीही या घटनेचं राजकारण करु नये, असेही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
1 सप्टेंबर रोजी राजकोट किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करणार असल्याच मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे. राजकारण करायला भरपुर जागा आहे, असंही जरांगे यांनी ठाकरे आणि राणे गटात झालेल्या राड्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.Full Scorecard →
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
कार खरेदी करणं होणार स्वस्त! नितीन गडकरी यांचा तो निर्णय ठरणार फायदेशीर, 25 हजारापर्यंतचे डिस्काउंट मिळणारCar Discount Offers: यंदाच्या दसरा-दिवाळीला तुम्हीदेखील कार खरेदी करु शकणार आहात. काय आहे सरकारची योजना पाहा
Read more »
Breaking News Live Updates : गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपाच्या पावित्र्यातBreaking News Live Updates : राज्यासह देशात राजकारणापासून इतर सर्व क्षेत्रांपर्यंत नेमकी काय आणि कशी परिस्थिती? पाहा Live Updates
Read more »
Maharashtra Weather News : राज्यात कुठं पाऊसधारा, कुठं उष्ण वारा? पाहा सविस्तर हवामान वृत्तMaharashtra Weather News : मुंबईच्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी, उर्वरित महाराष्ट्रात मात्र पावसाळ्याच उन्हाळ्याची जाणीव... पाहा हवामान विभागाचं यावर काय म्हणणं...
Read more »
Olympics 2024 : रात्रभर न झोपता सायकलिंग, दोरीच्या उड्या अन्...; आदल्या रात्री विनेश फोगाटसोबत नेमकं काय घडलं?Vinesh Phogat disqualified : अंतिम सामन्यात धडक मारल्यानंतर विनेशला हा आनंद साजराच करता आला नव्हता. पाहा तिच्यासोबत नेमकं काय घडलं...
Read more »
काळजी घ्या! 5 ऑगस्टपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा इशाराMaharashtra weather Update: राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा सुरुवात होण्याची शक्यता आहे. पाहा आज हवामान विभागाने काय अलर्ट दिला आहे.
Read more »
VIDEO: सेल्फी काढण्याच्या नादात तरुणी 150 फूट खोल दरीत, पुढे जे झालं ते चमत्कारापेक्षा कमी नाहीSatara young girl Selfie: सेल्फीच्या नादात जीव गेल्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसात समोर येत आहेत. तरीही धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी काढण्याचा तरुणाईचा मोह काही आवरताना दिसत नाही. पावसाचे दिवस असल्याने तरुण पिढीची पावलं डोंगर दऱ्यांच्या दिशेने वळू लागली आहेत.
Read more »