Maharashtra Assembly Elections 2024: शिंदेंच्या शिवसेनेने पहिली यादी जाहीर केली आहे. यादीत पहिलेच नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आहे
शिंदेंना घेरण्यासाठी ठाकरेंचं चक्रव्यूह; मुख्यमंत्र्यांविरोधात आनंद दिघेंच्या जवळच्या व्यक्तीला उमेदवारी?
आगामी लोकसभा निवडणुकांसाठी शिवसेनेने पहिली यादी जाहीर केली आहे. शिंदेंच्या शिवसेनेने 45 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यादीत पहिलेच नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आहे. एकनाथ शिंदे हे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहणार आहेत. तर, सूत्रांनुसार, एकनाथ शिंदे यांना टक्कर देण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेने मास्टरप्लान आखला असल्याचे समजते. दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जवळच्या व्यक्तीला उमेदवारी देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एकनाथ शिंदे यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे पक्षाकडून केदार दिघे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. केदार दिघे हे दिवंगत नेले आनंद दिघे यांचे पुतणे असून शिवसेना ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख आहेत. कोपरी पाचपाखाडी जिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या विद्यमान आमदार आहेत त्यांच्या विरोधात केदार दिघे हे शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित होत आहे. त्यामुळे शिंदे विरुद्ध दिघे असा सामना कोपरी पाचपाखाडी या विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळू शकतो.
केदार दिघे यांनी ठाणे शहर आणि कोपरी पाचपाखडी या दोन्ही विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे शहरातून माजी खासदार राजन विचारे यांच्या नावाचा विचार शिवसेना ठाकरे पक्षाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे केदार दिघे हे कोपरी पाचपाखडी या एकनाथ शिंदे विद्यमान आमदार असलेल्या मतदारसंघातून शिंदेंच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचं सूत्रांकडून कळत आहे. केदार दिघे यांना लवकरच या संदर्भात पक्षाकडून आदेश देणार असल्याचे समजतंय.
Maharashtra Assembly Election Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Eknath Shinde Anand Dighe Kedar Dighe Who Is Anand Dighe
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
जोगेश्वरीमधून शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेल्या मनिषा वायकर कोण आहेत?विधानसभा निवडणुकींकरता एकनाथ शिंदे यांच्यांकडून मनिषा वायकर यांना जोगेश्वरी पूर्व येथून उमेदवारी देण्यात आली आहे.
Read more »
'मला फक्त एक खून माफ करा', भर सभेत राज ठाकरे असं का म्हणाले?मला एक खून माफ करा, राज ठाकरेंचं गोरेगावमधील मनसे कार्यकर्ता मेळाव्यात मिश्किल वक्तव्य.
Read more »
मोठी बातमी! उमेदवार यादी जाहीर होण्याआधीच भाजपाला धक्का! दिग्गज नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत?Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने अद्याप उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही. मात्र त्याआधी नाराजीनाट्य रंगत असल्याचं दिसत आहे.
Read more »
चाळीत राहणाऱ्याला 382 कोटींची Income Tax Notice; 1 चूक पडली महागात; आधार आणि PAN...Rs 382 crore Income tax Notice To Diva Man: ठाण्यामधील दिवा येथील एका चाळीतील छोट्याश्या खोलीत राहणाऱ्या व्यक्तीकडे आयकर विभागाने चक्क 382 कोटींची हिशोब मागितला अन् या व्यक्तीला धक्काच बसला.
Read more »
Maharashtra Assembly Election: भाजपाची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, दिग्गजांना स्थान, चव्हाणांच्या मुलीलाही उमेदवारीMaharashtra Assembly Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत एकूण 99 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.
Read more »
शिवसेना पदाधिकाऱ्यावर गोळीबार करणाऱ्या आमदाराच्या पत्नीला BJP ची उमेदवारी, शिंदे गटाच्या नगरसेवकांचा मोठा निर्णयSulbha Ganpat Gaikwad : कल्याण पूर्वमध्ये महायुतीमध्ये बिघाडीची शक्यता आहे. सुलभा गायकवाडांना भाजपनं उमेदवारी दिल्यानं शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. भाजपचं काम न करण्याचा इशारा नगरसेवाकांनी दिला आहे.
Read more »