शिवसेना पदाधिकाऱ्यावर गोळीबार करणाऱ्या आमदाराच्या पत्नीला BJP ची उमेदवारी, शिंदे गटाच्या नगरसेवकांचा मोठा निर्णय

Maharashtra Assembly Elections 2024 News

शिवसेना पदाधिकाऱ्यावर गोळीबार करणाऱ्या आमदाराच्या पत्नीला BJP ची उमेदवारी, शिंदे गटाच्या नगरसेवकांचा मोठा निर्णय
Kalyan EastSulabha GaikwadBJP
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 88 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 67%
  • Publisher: 63%

Sulbha Ganpat Gaikwad : कल्याण पूर्वमध्ये महायुतीमध्ये बिघाडीची शक्यता आहे. सुलभा गायकवाडांना भाजपनं उमेदवारी दिल्यानं शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. भाजपचं काम न करण्याचा इशारा नगरसेवाकांनी दिला आहे.

शिवसेना पदाधिकाऱ्यावर गोळीबार करणाऱ्या आमदाराच्या पत्नीला BJP ची उमेदवारी, शिंदे गटाच्या नगरसेवकांचा मोठा निर्णय

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं आपली पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीवरुन महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. कल्याण पूर्व मध्ये सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिल्यानं वाद पेटला आहे. कल्याणमध्ये शिंदे गटाच्या 19 नगरसेवकांनी BJP विरोधात घेतला मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रचार सुरु होण्याआधीच भाजपला मोठा झटका बसला आहे.

गणपत गायकवाड हे महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकऱणी सध्या तुरुंगात आहेत..त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना कल्याण पूर्वेतून उमेदवारी देण्यात आली आहे. यावरुनच कल्याण पूर्वमध्ये महायुतीमध्ये बिघाडी निर्माण होण्याची शक्यता आहे.. कल्याण पूर्व मधून भाजपनं आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिलीये. आ. गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता.. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही खोटे आरोप केल्याचा दावा शिवसैनिकांनी केलाय.

पोलीस ठाण्यातच आमदार गणपत गायकवाडांनी केलेल्या गोळीबाराचे पडसाद अजूनही उमटतायत. गणपत गायकवाड यांनी ज्या महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. त्यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला होता. महेश गायकवाडांच्या भूमिकेमुळं महायुतीत बिघाडी होण्याची चिन्ह निर्माण झाली होती. शिंदेंच्या शिवसेनेचे महेश गायकवाड यांनी गणपत गायकवाड यांच्या उमेदवारीला थेट विरोध केलाय.. त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना उमेदवारी दिल्यास अपक्ष लढण्याचा इशारा महेश गायकवाडांनी दिला होता.

भाजपच्या पहिल्या यादीत 99 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलीये.. यामध्ये 13 महिला उमेदवारांना संधी देण्यात आलीये.. भाजपच्या पहिल्या यादीत अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलीये.. तर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काही नेत्यांच्या घरातही उमेदवारी देण्यात आलीये..यामध्ये अनेक नवख्या उमेदवारांनाही संधी देण्यात आलीये..मोठा राजकीय भूकंप? 'शिवसेनेचं 2 ठिकाणी बोलणं, राऊत शाहांना भेटले'वर काँग्रेस म्हणाली, 'कोण कोणाला...

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Kalyan East Sulabha Gaikwad BJP Shiv Sena Shinde Group Maharashtra Politics सुलक्षा गायकवाड गणपत गायकवाड महेश गायकवाड

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

सर्वसामान्यांना सरकारचा मोठा दिलासा! मुंबईच्या 5 टोल नाक्यांवर टोलमाफी; 'या' तारखेपासून अंमलबजावणीसर्वसामान्यांना सरकारचा मोठा दिलासा! मुंबईच्या 5 टोल नाक्यांवर टोलमाफी; 'या' तारखेपासून अंमलबजावणीविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना शिंदे सरकारचा मोठा दिलासा दिलाय. मुंबईच्या एन्ट्री पॉइण्टवरील 5 टोल नाक्यांवर टोलमाफीचा निर्णय घेतलाय.
Read more »

पंकजा मुंडेंचा पराभव करणाऱ्या बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान; निकालाच्या 114 दिवसानंतर मोठा ट्विस्टपंकजा मुंडेंचा पराभव करणाऱ्या बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान; निकालाच्या 114 दिवसानंतर मोठा ट्विस्टBeed Loksabha Election 2024 Result : बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका दाखल झाली आहे.
Read more »

भाजपच्या पहिल्याच यादीत मोठा ट्विस्ट; शरद पवार गटाच्या वाटेवर असलेल्या बड्या नेत्याला तिकीट देऊन धर्मसंकटात टाकलेभाजपच्या पहिल्याच यादीत मोठा ट्विस्ट; शरद पवार गटाच्या वाटेवर असलेल्या बड्या नेत्याला तिकीट देऊन धर्मसंकटात टाकलेभाजपची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. या यादीत मोठा ट्विस्ट पहायला मिळत आहे.
Read more »

महाराष्ट्रात तिसरी आघाडी उभी करणाऱ्या बच्चू कडूंसोबत मोठा धोका!महाराष्ट्रात तिसरी आघाडी उभी करणाऱ्या बच्चू कडूंसोबत मोठा धोका!Maharashtra politics : विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झालीये.. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या मैदानात उडी मारलीये.. शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नी आक्रमक असलेले प्रहारचे नेते बच्चू कडू यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसलाय..विधानसभेसाठी बच्चू कडूंनी तिसरी आघाडी निर्माण केलीये..
Read more »

Maharashtra Politics:शिवसेना कार्यकर्ताओं की बैठक को लेकर श्रीकांत शिंदे ने कह दी ये बड़ी बात!Maharashtra Politics:शिवसेना कार्यकर्ताओं की बैठक को लेकर श्रीकांत शिंदे ने कह दी ये बड़ी बात!Maharashtra Politics:शिवसेना कार्यकर्ताओं की बैठक को लेकर श्रीकांत शिंदे ने कह दी ये बड़ी बात!
Read more »

दिल्लीमध्ये शाळेजवळ मोठा स्फोट, FSL ची टीम पोहोचली घटनास्थळीदिल्लीमध्ये शाळेजवळ मोठा स्फोट, FSL ची टीम पोहोचली घटनास्थळीDelhi Blast:रविवारच्या सकाळी दिल्लीतून धक्कादायक बातमी समोर येतेय. करवा चौथच्या दिवशी दिल्लीतील शाळेजवळ स्फोट झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. दिल्लीतील रोहिणी येथील प्रशांत विहार परिसरात स्फोटाचा आवाज ऐकू आला. शाळेच्या भिंतीजवळ हा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे.
Read more »



Render Time: 2025-02-24 04:41:41