शरद पवारांना अहिल्यानगरात सापडले दुसरे लंके, सर्वसामान्य कार्यकर्त्याला पवारांनी दिली संधी

Maharashtra Vidhan Sabha Election News

शरद पवारांना अहिल्यानगरात सापडले दुसरे लंके, सर्वसामान्य कार्यकर्त्याला पवारांनी दिली संधी
Maharashtra Vidhan Sabha NivadnukMaharashtra Assembly Electionमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 61 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 49%
  • Publisher: 63%

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. विविध राजकीय पक्षांनी प्रचारास सुरुवात केली आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकींच्या तारखा घोषित झाल्या आहेत. राज्यातील विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या याद्यादेखील जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या पाच वर्षांत राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. राज्यातील दोन मोठ्या पक्षांतील बंडखोरी आणि त्यानंतर झालेलं सत्तास्थापन अशा नाट्यमय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक होत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आत्तापर्यंत तीन याद्या जाहीर केल्या आहेत. आत्तापर्यंत 76 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून कोल्हे परिवाराने माघार घेतल्यानंतर शरद पवारांनी विद्यमान आमदार आशुतोष काळेंच्या विरोधात सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली आहे. पवारांनी संदीप वर्पे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. संदीप वर्पे यांच्या रुपाने शरद पवारांना अहिल्यानगर जिल्ह्यात अजून एक निलेश लंके सापडले असल्याची ही चर्चा जोरदार कोपरगाव मतदार संघात रंगताना दिसत आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत संदीप वर्पे यांनी विद्यमान आमदार आशुतोष काळे यांना निवडून आणण्यासाठी प्रचार केला होता. आता तोच सर्वसामान्य कार्यकर्ता व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उत्तर नगर जिल्हाकार्याध्यक्ष संदीप वर्पे आता आशुतोष काळे यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरणार आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात घड्याळ विरुद्ध तुतारी ही लढत पाहायला मिळणार आहे.2019मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत निलेश लंके यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. पारनेर मतदारसंघातून ते विजयी झाले होते.

2019मध्ये त्यांनी आमदारकी मिळवली. राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर ते अजित पवारांसोबत गेले होते. मात्र लोकसभेच्या आधीच त्यांनी शरद पवार गटात प्रवेश करत लोकसभेची निवडणूक लढवली. निलेश लंके यांचा विजय झाला आणि ते खासदार झाले.Maharashtra Assembly Election 2024 : मविआत घोळ, तीन मतदारसंघात दोन पक्षाचे उमेदवार; अर्जनोंदणी तोंडावर तरीही...

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Maharashtra Assembly Election महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मराठी बातम्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ताज्या मराठी बात

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

'रोहित पवार पुढल्या काळात राज्यात...'; जाहीर सभेला संबोधित करताना शरद पवारांचं विधान'रोहित पवार पुढल्या काळात राज्यात...'; जाहीर सभेला संबोधित करताना शरद पवारांचं विधानSharad Pawar On Rohit Pawar: रोहितची पाच वर्ष आपल्या सेवेसाठी होती आता या पुढच्या काळात त्याचे काम राज्यासाठी असेल, असे संकेत शरद पवारांनी दिले आहेत.
Read more »

शरद पवारांनी एका दगडात मारले दोन पक्षी! अदिती तटकरेंविरुद्ध उमेदवार सापडला? CM शिंदे, अजित पवारांना धक्काशरद पवारांनी एका दगडात मारले दोन पक्षी! अदिती तटकरेंविरुद्ध उमेदवार सापडला? CM शिंदे, अजित पवारांना धक्काMaharashtra Assembly Election Big Blow Eknath Shinde Ajit Pawar: आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली. त्यानंतर आता थेट रायगडच्या पालकमंत्र्यांविरोधात विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत ते आहेत.
Read more »

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा गौप्यस्फोट! तिसरी आघाडी म्हणजे... रोहित पवार यांचा खळबळजनक दावामहाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा गौप्यस्फोट! तिसरी आघाडी म्हणजे... रोहित पवार यांचा खळबळजनक दावाMaharashtra Politics : शरद पवारांकडून कौतुक झाल्यानं नवी ऊर्जा मिळाल्याचं आमदार रोहित पवारांनी म्हटलंय. टू द पॉईंट या विशेष मुलाखतीत रोहित पवार बोलत होते. रोहित पवारांना येत्या दोन महिन्यात मोठी जबाबदारी मिळणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलं होतं.
Read more »

सुप्रीम कोर्टाने अजित पवारांना खडसावलं, मात्र धक्का शरद पवारांना, खंडपीठ म्हणालं 'उगाच लाजिरवाणी...'सुप्रीम कोर्टाने अजित पवारांना खडसावलं, मात्र धक्का शरद पवारांना, खंडपीठ म्हणालं 'उगाच लाजिरवाणी...'Supreme Court on NCP Symbol: आमच्या आदेशाचे उल्लंघन करण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न केला जात आहे असं जर आम्हाला वाटलं तर आम्ही स्वतःहून अवमानाची कारवाई करू, असं न्यायमूर्ती सूर्यकांत, दीपंकर दत्ता आणि उज्वल भुयान यांच्या खंडपीठाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुनावलं.
Read more »

'भावा मी हारलो!', पत्नीचा पाठलाग केल्यानंतर आधी पाठवला मेसेज, नंतर घरात मुलं झोपेत असतानाच...; एकच खळबळ'भावा मी हारलो!', पत्नीचा पाठलाग केल्यानंतर आधी पाठवला मेसेज, नंतर घरात मुलं झोपेत असतानाच...; एकच खळबळआत्महत्या करण्यापूर्वी घनश्यामने आपल्या भावाला मेसेज करुन पत्नीने आत्महत्या केल्याची माहिती दिली.
Read more »

IND vs BAN: T-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! संघावर गंभीर, KKR चा प्रभाव; पाहा यादीIND vs BAN: T-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! संघावर गंभीर, KKR चा प्रभाव; पाहा यादीIndia vs Bangladesh T20 Indian Squad: भारत आणि बांगलादेशदरम्यानच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी संघ जाहीर करण्यात आला असून काही नव्या खेळाडूंना संघात संधी देण्यात आली आहे.
Read more »



Render Time: 2025-02-24 00:34:07