मराठा आंदोलक मनोज जरांगे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवसापासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार आहेत. अशातच मंत्री छगन भुजबळ यांनी कोणता खळबळजनक दावा केलाय.
रात्री 2 वाजता रोहित पवार, राजेश टोपे यांना... मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळ यांचा खळबळजनक गौप्यस्फोट
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला एक वर्षांहून जास्त काळ झालाय.आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी आतापर्यंत सहा वेळा आमरण उपोषण केलंय मात्र,अद्याप मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही. राज्यात विधानसभा निवडणुका जवळ आल्यात अशातच जरांगे यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवसापासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करण्याचं जाहीर केलंय. सरकारमधील मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांना मराठयांना ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध आहे.
आंतरवाली ज्यावेळी दगडफेक आणि लाठीमार झाला त्यावेळी मनोज जरांगे तिथून निघून गेला होता. रात्री दोन वाजता रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी मनोज जरांगे यांना पुन्हा तिकडे आणून बसवले असा खळबळजनक दावा,भुजबळांनी केलाय.जरांगेंच्या मदतीला रोहित पवारांची टीम काम करत असल्याचा आरोपही भुजबळांनी केला जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसाकंडून लाठीमार झाला. तेव्हा मनोज जरांगे निघून गेले होते. मात्र शरद पवार पक्षाचे आमदार राजेश टोपे आणि रोहित पवार यांनी मनोज जरांगेंना आंदोलस्थळी आणून बसवलं होतं, असा दावा, मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत केला. त्यानंतर घटनास्थळाला शरद पवारांनी भेट दिली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही भेट दिली. मात्र,त्या दोघांनाही खरी परिस्थितीची माहिती नव्हती,असंही भुजबळांनी म्हटंलय.
भुजबळांना मराठा आणि ओबीसीमध्ये वाद लाऊन फक्त दंगली घडवायच्या आहेत,अशी टीका मनोज जरांगे यांनी केलीय. ओबीसी बांधवांनी भुजबळांचं ऐकून भांडणं विकत घेऊ नये,असंही जरांगे यांनी म्हटलंय. आंतरवाली सराटीत लाठीमार झाल्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात मोठ्या प्रमाणात पेटला. लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाच्या मुद्याचा फटका लोकसभेतही महायुतीला बसला. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मान्यता घेणार असल्याची माहिती आहे.
Manoj Jarange Maratha Reservation मनोज जरांगे छगन भुजबळ
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच असं घडणार? मुलगी बापाविरोधात लढणार? पवार गटाला चॅलेंजMaharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत जित पवार यांच्या मंत्र्यांची मुलगी थेट वडिलांविरोधात निवडणूक लढवणार आहे. अजित पवार गटासाठी हे मोठं आव्हान असणार आहे.
Read more »
पूनम महाजन, रावसाहेब दानवे यांचा पत्ता कट; भाजपकडून धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारीMaharashtra politics : भाजपकडून धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
Read more »
'मॅडम जरा मला...,' Zomato डिलिव्हरी बॉयने अचानक पँटची चेन उघडली अन्...; रात्री 1 वाजता तरुणीची पोस्टतरुणीने एक्सवर पोस्ट शेअर करत मंगळवारी रात्री उशिरा आपण कॉफीची ऑर्डर दिली असता नेमकं काय झालं याचा खुलासा केला आहे.
Read more »
मनोज जरांगेंनी वाहत्या नदीच्या प्रवाहात घातली गाडी, पुढे काय झालं पाहामराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे सध्या बीड दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी यांनी थेट वाहत्या नदीच्या प्रवाहात गाडी घालून जीवघेणा प्रवास केला.
Read more »
गुलाबी साडीवाल्या ताईंच्या गुलाबी रिक्षात बसून अजित पवार निघाले कुठे? फोटो सोशल मिडियावर व्हायरलअजित पवारा यांचा एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत अजित पवार गुलाबी रिक्षातून प्रवास करताना दिसत आहेत.
Read more »
'तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी...', कोहली, रोहित शर्मावर सुनील गावसकर नाराज; म्हणाले 'बुमराहचं समजू शकतो...'भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांना दुलीप ट्रॉफीमधून विश्रांती देण्यात आली आहे.
Read more »