अजित पवारा यांचा एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत अजित पवार गुलाबी रिक्षातून प्रवास करताना दिसत आहेत.
अजितदादांच्या गुलाबी जॅकेटची राजकारणात चांगलीच चर्चा सुरू आहे. सर्व कार्यक्रमांमध्ये अजितदादा गुलाबी जॅकेटमध्येच पाहायला मिळत असल्याने अजितदादांच्या नव्या लूकची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. अशातच अजित पवार यांचा एक फोटो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये अजित पवार एका गुलाबी साडीवाल्या ताईंच्या गुलाबी रिक्षा त बसलेले दिसत आहेत.
राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने कात टाकली असून पक्षाचे प्रतिमावर्धन करण्याची जोरदार तयारी चालवली आहे.त्याचाच भाग म्हणून विधानसभा निवडणुकीची प्रचार आणि प्रसिद्धीची रणनीती आखण्याचे काम एका खासगी संस्थेला देण्यात आले आहे. त्यामुळे गुलाबी रंग ही पक्षाची खास ओळख ठसवण्यात येणार आहे. कार्यक्रमांमध्ये सर्वत्र गुलाबी रंग प्राधान्याने वापर होत असल्याचे दिसत आहे.
अजित पवार यांनी सोशल मिडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अजित पवार रिक्षातून प्रवास करत आहेत. या रिक्षाची चालक ही महिला आहे. या महिलेच्या हातात गुलाबी रिक्षाचे स्टेअरिंग आहे. अजित पवार प्रवासी म्हणून रिक्षात बसले आहेत. अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेतील हा फोटो आहे. Pink is power! असे कॅप्शन या फोटोला देण्यात आले आहे. त्यांचा हाच फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.यापूर्वी देखील अजित पवार यांचा पत्नीसोबतचा एक खास फोटो व्हायरल झाला होता.
सरडा आणि ढेकूण म्हणून राज्याचा कायापालट होणार आहे का असा सवाल, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना विचारला. अजित पवारांनी गुलाबी रंगाला आपलंसं केलं. त्यावरून सरडाही रंग बदलतो अशी खोचक टीका शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्याला अजित पवारांनी पुण्याच्या आंबेगावमधील जनसन्मान यात्रेत उत्तर दिलं.
Ajit Pawar Travel In A Pink Rickshaw Maharashtra Politics अजित पवार गुलाबी रिक्षा
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
अजितदादांच्या गुलाबी जॅकेटची जोरदार चर्चा; राष्ट्रवादी कात टाकणार, डझनभर जॅकेट खास शिवून घेतलेअजितदादांच्या गुलाबी जॅकेटची जोरदार चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट नवी रणनिती आखण्याच्या तयारीत आहे.
Read more »
'मी इस्तांबुलमध्ये येण्यासाठी उत्सुक', युसुफ डिकेकच्या पोस्टवर Elon Musk चं उत्तर51 वर्षांचे नेमबाज युसुफ डिकेक यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये सफेद रंगाचा शर्ट घालून हात खिशात ठेवल्यामुळे डिकेक व्हायरल होत आहे.
Read more »
गुलाबी जॅकेटवर पांढरा गुलाब! सुनेत्रा पवार याचे अजित पवार यांना खास सरप्राईजMaharashtra Politics : अजित पवारांचं सध्या सगळंच गुलाबी गुलाबी चालंय.. अजित पवारांच्या या गुलाबी राजकारणामागे दडलंय काय? बॅनरपासून जॅकेटपर्यंत एकच गुलाबी रंग का? असे प्रश्न सर्वांनाच पडलेत.
Read more »
Tadoba Video : ताडोबात वाघाची नागपंचमी, दुर्मिळ क्षणाचा Video पाहिला का?Tadoba Viral Video : नागपंचमीच्या मुहूर्तावर ताडोबातील वाघ आणि कोब्राचा दुर्मिळ क्षण सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Read more »
Viral Video: काम पर जाने के लिए बेचारा Jaipur का Spider Man खुद धो रहा है अपनी BikeRajasthan, Viral Video: इन दिनों सोशल मीडिया पर राजस्थान के गुलाबी शहर जयपुर के एक शख्स का वीडियो Watch video on ZeeNews Hindi
Read more »
Viral Video: Jaipur का Spider Man बन गया कॉर्पोरेट मजदूर, करने लगा 9 से 5 की जॉबRajasthan, Viral Video: इन दिनों सोशल मीडिया पर राजस्थान के गुलाबी शहर जयपुर के एक शख्स का वीडियो Watch video on ZeeNews Hindi
Read more »