Mumbai University Walk in interview: चांगल्या पगाराची नोकरी शोधणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. मुंबई विद्यापीठाअंतर्गत वॉक इन इंटर्व्ह्यूची प्रक्रिया पार पडणार आहे.
Mumbai University Walk in Interview: थेट मुलाखतीतून ही निवड होणार असून उमेदवारांना त्याची माहिती देण्यात आली आहे.चांगल्या पगाराची नोकरी शोधणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. मुंबई विद्यापीठाअंतर्गत वॉक इन इंटर्व्ह्यूची प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. थेट मुलाखतीतून ही निवड होणार असून उमेदवारांना त्याची माहिती देण्यात आली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
मुंबई विद्यापीठाअंतर्गत इंजिनीअरची एकूण 8 रिक्त पदे भरली जाणार आहेत. ज्युनिअर इंजिनीअर सिव्हिलची 6 पदे भरली जाणार आहेत. तर ज्युनिअर इंजिनीअर इलेक्ट्रीकलची 2 रिक्त पदे भरली जातील. ज्युनिअर इंजिनीअर सिव्हिल पदासाठी मुलाखत देणाऱ्या उमेदवाराकडे संबधित क्षेत्रातील किमान 3 वर्षांची पदवी असणे आवश्यक आहे. तसेच या क्षेत्रातील किमान 1 वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. ज्युनिअर इलेक्ट्रिकल इंजिनियनरिंग पदासाठी यातील किमान 3 वर्षांची पदवी असलेला उमेदवार अर्ज करु शकतो.
ज्युनिअर इंजिनीअर सिव्हिल आणि ज्युनिअर इलेक्ट्रिकल इंजिनियनरिंग पदासाठी उमेदवारांची निवड थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे. यासाठी उमेदवारांना थेट मुलाखतीला उपस्थित रहावे लागणार आहे.मुंबई विद्यापीठातील रिक्त पदांच्या भरतीसाठी होणाऱ्या मुलाखतीला तुम्ही जाताय? मग काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. नोकरीचा अर्ज तुम्हाला सोबत न्यावा लागेल. त्या अर्जामध्ये तुम्ही स्वत:बद्दल लिहिलेली माहिती अचूक आहे का? आवश्यक कागदपत्रे आपल्या सोबत आहेत का? हे नक्की पाहा.
मुंबई विद्यापीठातील रिक्त पदांच्या भरतीसाठी होणारी मुलाखत 8 जुलै 2024 रोजी होणार आहे. मुंबई विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सभागृह,डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, तिसरा मजला, विद्यानगरी, सांताक्रूझ (पूर्व] मुंबई,98 या पत्त्यावर ही मुलाखत होईल.सकाळी 10 वाजता ही मुलाखत होणार असून उमेदवारांनी वेळेच्या अर्धा तासआधी उपस्थित राहणे आवश्यक आहे. दिलेल्या वेळेनंतर आलेल्या उमेदवारांचा मुलाखतीसाठी विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्या.
Mumbai University Walk In Interview Mumbai University Job Mumbai University Vacancy Mumbai University Bharti Job For Engineer Junior Engineer – Civil Junior Engineer – Electrical Junior Engineer – Civil Job Details Junior Engineerelectrical Job Details
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Bank Job: सेंट्रल बॅंकेत 8 वी उत्तीर्णांना मिळेल चांगल्या पगाराची नोकरी, 'येथे' पाठवा अर्जCentral Bank Job: बॅंकेत नोकरी मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण आपलं शिक्षण कमी असेल तर बॅंकेत नोकरी कशी मिळणार असे अनेकांना वाटत असते. पण आता काळजी करण्याचे कारण नाही. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती सुरु आहे. या भरतीसाठी आठवी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात.
Read more »
पोर्श अपघाताची पुनरावृत्ती! तरुणाकडून महिलेला चिरडण्याचा प्रयत्न; अपघातानंतर कारच्या छतावर बसून केली शिवीगाळPune Car Accident: आळंदी जवळील वडगाव घेणंद येथे पोर्शे कार अपघाताची पुनरावृत्ती झाल्याची घटना घडली आहे.
Read more »
Reasi Bus Terror Attack: जम्मू काश्मीर पोलिसांनी तब्बल 50 संशयितांना घेतलं ताब्यात; सखोल तपास सुरुजम्मू काश्मीरच्या रियासी येथे यात्रेकरूंच्या बसवरील दहशतवादी हल्ल्यानंतर पोलिसांकडून सखोल तपास सुरु आहे. पोलिसांनी आतापर्यंत 50 संशयितांना ताब्यात घेतलं आहे.
Read more »
मणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला, 2 जवान जखमीमणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांची ही अतिरिक्त सुरक्षा टीम मंगळवारी होणाऱ्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिरीबाम येथे चालली हहोती.
Read more »
Video: 'ती फार माज दाखवते!' एअर होस्टेसकडून अभिनेत्रीची पोलखोल; खरा चेहरा आणला समोरAir Hostess Shocking Revelation About Famous Actress: या एअर होस्टेसची मुलाखत सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून अनेकांनी या अभिनेत्रीवर टीकेची झोड उठवली आहे.
Read more »
'BJP केवळ 110 जागाच जिंकला', राऊतांचा दावा; म्हणाले, '..तर मोदी PM झाले नसते'Sanjay Raut On Election Commission Of India: गोंधळ उडवून दुसऱ्याच निशाणीवर शिक्का मारण्याची मानसिकता निर्माण केली जात असेल तर येथे निवडणूक आयोगाने जबाबदारीने वागायला हवे, असं राऊत म्हणालेत.
Read more »