पोर्श अपघाताची पुनरावृत्ती! तरुणाकडून महिलेला चिरडण्याचा प्रयत्न; अपघातानंतर कारच्या छतावर बसून केली शिवीगाळ

Pune News News

पोर्श अपघाताची पुनरावृत्ती! तरुणाकडून महिलेला चिरडण्याचा प्रयत्न; अपघातानंतर कारच्या छतावर बसून केली शिवीगाळ
Pune News TodayPune Live Newsपुणे ताज्या बातम्या
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 77 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 58%
  • Publisher: 63%

Pune Car Accident: आळंदी जवळील वडगाव घेणंद येथे पोर्शे कार अपघाताची पुनरावृत्ती झाल्याची घटना घडली आहे.

पोर्श अपघाताची पुनरावृत्ती! तरुणाकडून महिलेला चिरडण्याचा प्रयत्न; अपघातानंतर कारच्या छतावर बसून केली शिवीगाळ

पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील पोर्शे कार अपघात प्रकरण चर्चेत असतानात आळंदीतही अशीच एक घटना घडली आहे. अल्पवयीन कार चालकाकडून महिलेसह नागरिकांना चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसंच, या घटनेचा व्हिडिओदेखील समोर आला आहे. वडगाव घेणंद येथील ही घटना आहे.

आळंदी पोलिसांत या प्रकरणी तक्रर दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनुसार, समोरील जमावाला चिरडण्यासाठी अल्पवयीन तरुणाने कार पाठीमागे घेऊन जात पुर्ण वेगाने चालवत महिलेसह नागरिकाना चिरडण्याचा प्रयत्न केला आहे. या संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अंगावर काटा आणणार हा थरार मनात धडकी भरवणारा आहे. इतकंच नव्हे तर हा अपघाताचा थरार झाल्यानंतर सदर तरुण कारच्या छतावर बसून शिवीगाळ करत होता.

पुर्वीच्या भांडणाचा राग धरुन महिलेसह नागरिकांना चिरडण्याचा प्रयत्न केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी आळंदी पोलिसांत फिर्याद देण्यात आली आहे. नाजुका थोरात यांच्या फिर्यादीवरुन आळंदी पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर अशी घटना घडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. कायदा व सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आळंदी पोलिस या प्रकरणी तपास करत आहेत. हा अल्पवयीन मुलगा कोण आहे आणि हे कृत्य कशामुळं घडलं हे मात्र, अद्याप समोर आलेले नाहीये. या प्रकरणी पोलिस तपास करत असून या प्रकरणी लवकरच आरोपीला ताब्यात घेण्यात येईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकऱणी पोलिसांनी लवकरात लवकर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून व पीडितांकडून करण्यात येत आहे.Full Scorecard →

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Pune News Today Pune Live News पुणे ताज्या बातम्या पुणे आळंदी पुणे आळंदी कार अपघात पुणे पोर्शे कार अपघात पोर्शे कार अपघात

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Pune Porche Accident: अपघातानंतर 'त्याला' मारहाण करणारे नागरिक अडचणीत; मुलाच्या पालकांनी केली मोठी मागणीPune Porche Accident: अपघातानंतर 'त्याला' मारहाण करणारे नागरिक अडचणीत; मुलाच्या पालकांनी केली मोठी मागणीPune Porche Accident: पुणे पोर्शे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाला मारहाण करणाऱ्या नागरिकांवर कारवाई होणार?
Read more »

KKR vs SRH : आऊट झाल्यावर कोपऱ्यात बसून ढसाढसा रडला 'हा' खेळाडू, नेमकी चूक कोणाची?KKR vs SRH : आऊट झाल्यावर कोपऱ्यात बसून ढसाढसा रडला 'हा' खेळाडू, नेमकी चूक कोणाची?Rahul Tripathi In Tears : आपल्याच चुकीमुळे धावबाद झाल्याने राहुल त्रिपाठी ड्रेसिंग रुमच्या पायऱ्यांवरच बसून ढसाढसा रडला.
Read more »

भाजप उमेदवाराच्या ताफ्यातील वाहनानं चौघांना चिरडलं; दोघांचा मृत्यूभाजप उमेदवाराच्या ताफ्यातील वाहनानं चौघांना चिरडलं; दोघांचा मृत्यूAccident News : अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी, जखमींना तातडीनं रुग्णालयात केलं दाखल...
Read more »

Pune Porsche Accident Case: 14 दिन की ज्यूडिशियल कस्टडी में भेजे गए नाबालिग आरोपी के दादा और पिताPune Porsche Accident Case: पुणे पोर्श दुर्घटना मामले में कोर्ट ने कड़ा एक्शन लिया है।
Read more »

महाराष्ट्रातील सातवं आश्चर्य; मुंबईच्या समुद्रात आकाशाला गवसणी घालणारा ग्लोबल पॅगोडामहाराष्ट्रातील सातवं आश्चर्य; मुंबईच्या समुद्रात आकाशाला गवसणी घालणारा ग्लोबल पॅगोडाbuddha purnima 2024 : मुंबईच्या धावपळीतून मन:शांती शोधण्याचा प्रयत्न करत असाल तर पॅगोडाला आवर्जून भेट द्या.
Read more »

पुणे कार अपघातात धक्कादायक माहिती समोर, बिघाड असलेली पोर्शे कार दिली लेकाच्या हातीपुणे कार अपघातात धक्कादायक माहिती समोर, बिघाड असलेली पोर्शे कार दिली लेकाच्या हातीPune Porsche Accident Case : महागड्या पोर्श कारच्या अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या कारने दोघांचा जीव घेतला ती कार बिघाड असलेली होती. यानंतरही ती कार मुलाच्या हाती देण्याची चूक विशाल अग्रवालन केली.
Read more »



Render Time: 2025-02-25 06:47:58