जगातील सर्वात उंच ब्रिज अशी ओळख असलेला चिनाब रेल्वे ब्रिज आता काहीच दिवसांत सुरु होणार आहे. हा पूल भारताचा अभिमान ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच या पुलावर रेल्वेची ट्रायल घेण्यात आली. यामुळे ब्रीज कधी सुरु होईल याची सगळ्यांनाच प्रतिक्षा आहे.
कुणी म्हणतं हे आश्चर्य आहे... कुणी म्हणतं हे अद्भूत आहे... कुणी म्हणतं अविश्वनीय आहे... कुणासाठी हे स्वप्नवत आहे.. तर कुणासाठी शेकडो किलोमीटरचा वळसा वाचवणारं आहे आणि अमाप संधी उघडणारा राजमार्ग आहे...जगातील सर्वात उंच ब्रिज अशी ओळख असलेला चिनाब रेल्वे ब्रिज आता काहीच दिवसांत सुरु होणार आहे. हा पूल भारताचा अभिमान ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच या पुलावर रेल्वेची ट्रायल घेण्यात आली. यामुळे आता ब्रीज कधी सुरु होईल याची सगळ्यांनाच प्रतिक्षा आहे. आता या पुलाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काही महिन्यांपूर्वी यासाठी या ब्रिजवरुन रेल्वे इंजिनची चाचणी घेण्यात आली. या मार्गावर सांगलदान-रियासी लिंकची ट्रायल रन घेतली गेली. हा ब्रिज चिनाब नदीवर तब्बल 359 मीटर उंचीवर उभारण्यात आलाय. तर या ब्रिजची मुख्य कमान 467 मीटर इतकी आहे. या ट्रायल रनचा व्हिडिओ देखील रेल्वे मंत्र्यांनी शेअर केला होता. आता रेल्वे मंत्र्यानी जो व्हिडिओ शेअर केला आहे त्यात या पुलाचे अप्रतिम सौंदर्य पहायला मिळत आहे. हा व्हिडिओ हेलॉकॉप्टरने शूट करण्यात आला आहे.
पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटरहून जास्त याची उंची आहे. अतिवेगवान वारे, तसंच भूकंपरोधक अशी याची रचना आहे. आंतरराष्ट्रीय स्तराच्या वेल्डिंगचा यासाठी वापर करण्यात आलाय. या ब्रिजमुळे जम्मू काश्मीरची दळणवळण यंत्रणा आणकी भक्कम होणार आहे. पर्यटनालाही यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे. तंसच देशाच्या अर्थव्यवस्थेलाही याचा फायदा होणार आहे. तर सूरक्षा यंत्रणांसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. यातून सगळ्या जगाला भारतीय इंजिनियर्सची अजोड बुद्धिमत्ता दिसलीये.
चिनाब रेल्वे पुलाचे सुंदर फोटो पाहण्यासाठी क्लिक करा... ढगांवर तरंगणारा जगातला सर्वात उंच रेल्वे पूल! भारतीय इंजिनियर्सची कमाल, पॅरीसचा आयफेल टॉवरही याच्यापुढे खुजा ठरेलFull Scorecard →विश्व
Chinnab Bridge Highest Railway Bridge India Pride Railway Trial
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
'या जगात असं कोणीच नाही जो...', जसप्रीत बुमराहचं मोठं विधान, 'कोणामध्ये हिंमत नाही की...'भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) सर्वात आव्हानात्मक फलंदाजाचं नाव विचारण्यात आलं. त्यावर त्याने दिलेलं उत्तर ऐकल्यानंतर प्रेक्षक जोरजोरात टाळ्या वाजवू लागले.
Read more »
पृथ्वीला हादरवणार जगातील सर्वात शक्तीशाली प्रकल्प; याची पावर पाहून NASA चे संशोधकही घाबरलेThree Gorges Dam : जगातील सर्वात मोठे धरण हे चीन मध्ये आहे. या धरणाचा पृथ्वीवर मोठा परिणाम झाला आहे.
Read more »
आकार फक्त 2.4 सेमी, किंमत 600 कोटी; अंबानी, अदानी नाही तर या व्यक्तीकडे आहे जगातील सर्वात महागडी गणेश मूर्तीजगातील सर्वात महागडी गणेश मूर्ती सुरतमधील एका व्यापाऱ्याकडे आहे. जाणून घेऊया या मूर्तीची खास वैशिष्ट्ये...
Read more »
इथं कधीही जा... एकदम भारीचं वाटतं! महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळमुंबईजवळ महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय हिल स्टेशन आहे.
Read more »
शाहरुख खानचा रेकॉर्ड मोडला; विजय थलपती ठरला भारतातील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेताvijay thalapathy : साऊथ सुपरस्टार विजय थलपती हा देशातील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे.
Read more »
जगातील सर्वात भारी Bodybuilder चा मृत्यू! रोज 2.5 किलो मटण, 7 वेळा जेवण; असा झाला दुर्देवी अंतWorlds Most Monstrous Bodybuilder Death: त्याच्याकडे पाहिल्यानंतर धडकी भरल्यासारखं वाटायाचं. मात्र अंगाने इतका धिप्पाड असलेला माणूस अवघ्या 5 दिवसात मृत्यूच्या दाढेत ओढला गेला. नेमकं त्याच्याबरोबर घडलं काय जाणून घेऊयात...
Read more »