भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) सर्वात आव्हानात्मक फलंदाजाचं नाव विचारण्यात आलं. त्यावर त्याने दिलेलं उत्तर ऐकल्यानंतर प्रेक्षक जोरजोरात टाळ्या वाजवू लागले.
भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला सर्वात आव्हानात्मक फलंदाजाचं नाव विचारण्यात आलं. त्यावर त्याने दिलेलं उत्तर ऐकल्यानंतर प्रेक्षक जोरजोरात टाळ्या वाजवू लागले.भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीने जगातील सर्वोत्तम गोलंदाजांच्या यादीत आपलं स्थान निर्माण केलं आहे. 2016 मध्ये भारतीय संघात पदार्पण केल्यापासून जसप्रीत बुमराह आपल्या जबरदस्त कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. त्याचा संघर्ष अनेक नवख्या गोलंदाजांसाठी प्रेरणा ठरत आहे.
जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचं यश म्हणजे ऐन मोक्याच्या क्षणी सर्वोत्तम गोलंदाजी करत सामन्य़ाचं चित्र पालटण्याची ताकद त्याच्यात आहे. टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात त्याने आपण किती सक्षण आहोत हे सिद्ध केलं आहे. डेथ ओव्हर्समधील त्याचे यॉर्कर फलंदाजांनी धडकी भरवणारे असतात. अनेक संघाचे दिग्गज खेळाडू बुमराहच्या गोलंदाजीचा सामना करताना मात्र अडखळताना दिसतात.
पण जगात असा कोणता फलंदाज आहे का ज्याची भीती जसप्रीत बुमराहला वाटत असेल? स्वत: बुमराहने एका सार्वजनिक कार्यक्रमात या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. जगात असा कोणता फलंदाज आहे का ज्याला गोलंदाजी करणं तुला आव्हानात्मक वाटतं? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. यावर बुमरहान अत्यंत नम्र आणि चालाखीने उत्तर दिलं. त्याचं उत्तर ऐकल्यानंतर उपस्थितांनीही टाळ्या वाजवून कौतुक केलं.“हे बघ मला चांगलं उत्तर द्यायचं आहे, पण मला माझ्या मनात एखाद्याचं नाव यावं असं वाटत नाही. कारण साहजिकच मी सगळ्यांचा आदर करतो.
"त्यामुळे मी माझ्या समोर किंवा विरोधात कोण आहे यापेक्षा स्वत:वर लक्ष केंद्रीत करतो. जर मी स्वत:ला सर्वोत्तम संधी दिली तर माझं प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण असेल. इतर गोष्टी स्वत:ची काळजी योग्य प्रकारे घेतील. म्हणजे फलंदाजाला ताकद देण्यापेक्षा आणि तो माझ्यापेक्षा चांगला होण्याची संधी देण्याचा प्रयत्न मी करणार नाही," असं बुमराह म्हणाला.
T20 विश्वचषक विजयात बुमराहचा मोठा वाटा असून, भारताचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू होता. या वेगवान गोलंदाजाने केवळ 4.17 च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली, जी संपूर्ण स्पर्धेत 20 पेक्षा जास्त षटके टाकणाऱ्या गोलंदाजांमध्ये सर्वात कमी होती. त्याने 15 विकेट्स घेतल्या. यामुळे त्याचा स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून सन्मानही करण्यात आला.स्पोर्ट्स
Indian Cricket Indian Cricket Team Indian Cricketer
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
बलात्कार रोखताना हत्या केल्यास खुनाचा खटला चालवता येणार नाही; मद्रास हायकोर्टाचा मोठा निर्णय, महिलेची सुटकासंरक्षणाचा अधिकार केवळ लैंगिक अत्याचाराच्या पीडितेलाच नाही तर बचावासाठी येणाऱ्यांनाही उपलब्ध असेल, असं न्यायमूर्तींनी म्हटलं आहे.
Read more »
'मुंबईतल्या टॉवर्समधली 60% घरं मराठी मध्यमवर्गीय राखीव असा कायदा करा, कारण...'; ठाकरे गटाची मागणीMumbai Towers Home Reserved: शेवटी ही मुंबापुरी कुणासाठी हे ठरल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही, असं म्हणत त्यांनी टॉवर्समधला मतदार महाराष्ट्रावर प्रेम करीत नाही, असा दावा केला आहे.
Read more »
'मी आता तुम्हाला थेट पाकिस्तानातच भेटेन'; बांगलादेशी खेळाडू मायदेशात जायला घाबरतोयI Will Meet You Directly In Pakistan Says Bangladeshi Player: बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचं सरकार पडल्यानंतर उसळलेल्या संघर्षादरम्यान या खेळाडूची स्वदेशामध्ये येण्याची हिंमत नाही.
Read more »
'...तो वाचला नाही पाहिजे', बदलापूरमधील घटनेवरुन संताप व्यक्त होत असतानाच PM मोदींचं मोठं विधानकोलकातामधील बलात्कार आणि हत्या (Kolkata Rape and Murder) तसंच बदलापूरमधील (Badlapur Sexual Assault) घटनेनंतर संताप व्यक्त होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महिलांवरील अत्याचारावर भाष्य केलं आहे.
Read more »
Gujarat Rain: 'आता जगण्यासाठी कारणच नाही,' 50 लाखांची ऑडी पावसाच्या पाण्यात बुडाली, उद्योजकाने फोटो शेअर केले अन् नंतर....आता जगण्यासाठी काहीच उरलेलं नाही. माझ्या तिन्ही गाड्या आता राहिलेल्या नाहीत, असं उद्योजकाने सांगितलं आहे.
Read more »
....यांना महिला अद्याप समजल्या नाहीतच; लाडकी बहीण योजनेवर रोहिणी खडसेंची सडकून टीकाRohini Khadse : एकीकडे लाडक्या बहिणींचा सन्मान केला जातोय तर दुसरीकडे महिलांवार अत्याचाराच्या घटना काही थांबायचं नाव घेत नाही असं असताना रोहिणी खडसे यांनी राज्य सरकारवर खडसून टिका केली आहे.
Read more »