सुप्रीम कोर्ट आता WhatsApp वर केसची अपडेट पाठवणार; सरन्यायाधीशांचा मोठा निर्णय

Chief Justice Of India News

सुप्रीम कोर्ट आता WhatsApp वर केसची अपडेट पाठवणार; सरन्यायाधीशांचा मोठा निर्णय
CJID Y ChandrachudSupreme Court
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 66 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 47%
  • Publisher: 63%

वकिलांना केससंबंधी ऑटो मेसेज मिळणार आहे. तसंच बारच्या सदस्यांना प्रकाशित होताच आज ज्या प्रकरणांवर सुनावणी होणार आहे त्यांची यादी मिळेल अशी माहिती सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी दिली आहे.

सुप्रीम कोर्ट आता यापुढे व्हॉट्सअपवर केससंबंधी मेसेज पाठवणार आहे. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी ही माहिती दिली आहे. तसंच वकिलांना दाखल केसेस, सुनावणी होणाऱ्या केसेस यांची व्ह़ॉट्सअपरवर यादी पाठवली जाईल असं त्यांनी सांगितलं आहे. कोर्टात सुनावणी होणाऱ्या प्रकरणांची यादी तयार करण्यात येत असते. यामुळे त्या संबंधित दिवशी नेमकी कोणती प्रकरणं सुनावणीसाठी आहेत हे आधीच वकिलांना समजेल.

"75 व्या वर्षी सुप्रीम कोर्टाने एक छोटं पाऊल टाकलं असून मोहीम सुरु केली आहे. याचा मोठा प्रभाव पडण्याची क्षमता आहे. व्हॉट्सअप मेसेंजर हा आपल्या दैनंदिन जीवनातील शक्तिशाली सेवा असून, संवादाचं प्रबळ माध्यम ठरलं आहे. न्याय मिळण्याचा अधिकार अधिक बळकट करण्यासाठी आणि न्यायव्यवस्थेत पारदर्शकता वाढवण्यासाठी, सर्वोच्च न्यायालयाने Whatsapp मेसेजिंग सेवा त्याच्या IT सेवांसोबत एकत्रित करण्याची घोषणा केली आहे," अशी माहिती सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी दिली आहे.

न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर याचिकांमुळे उद्भवलेल्या एका जटिल कायदेशीर प्रश्नावर सुनावणी सुरू होण्यापूर्वी, सरन्यायाधीशांनी ही घोषणा केली. आता वकिलांना केस दाखल करण्याबाबत स्वयंचलित संदेश प्राप्त होतील. याव्यतिरिक्त, बारच्या सदस्यांना त्यांच्या मोबाईल फोनवर ज्या प्रकरणांवर सुनावणी होणार आहे त्याची यादी प्रकाशित होताच प्राप्त होईल.न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी सांगितलं आहे की,"ही सुविधा आणि सेवा आपल्या रोजच्या कामाच्या सवयींमध्ये मोठा बदल आणेल.

न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी सुप्रीम कोर्टाचा अधिकृत व्हॉट्सॲप नंबर देखील शेअर केला असून यावर कोणताही संदेश किंवा कॉल स्वीकारणार नाही हे स्पष्ट केलं आहे."सरन्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाचा अधिकृत व्हॉट्सॲप नंबर दिला असून संदेश किंवा कॉल स्वीकारणार नाही हे स्पष्ट केलं आहे," अशी माहिती तुषार मेहता यांनी दिली.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

CJI D Y Chandrachud Supreme Court Whatsapp Messages Cause Lists

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Surat Lok Sabha :Surat Lok Sabha :Jitendra Awhad On Surat Lok Sabha : सूरतमध्ये काँग्रेस उमेदवाराचा अर्ज अपात्र ठरवल्याने आता देशाच्या राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे.
Read more »

5 महिन्यांच्या बाळाला Infosys देणार 4.2 कोटी रुपये; या मागील नारायण मूर्ती कनेक्शन जाणून घ्या5 महिन्यांच्या बाळाला Infosys देणार 4.2 कोटी रुपये; या मागील नारायण मूर्ती कनेक्शन जाणून घ्याNarayana Murthy 5 month Old Grandson 4.20 Crore: कंपनीने जाहीर केलेल्या एका निर्णयामुळे 10 नोव्हेंबर 2023 ला जन्मलेला आणि आता अवघ्या पाच महिन्यांचा असलेल्या नारायण मूर्तींच्या नातवाला मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
Read more »

मुलाच्या नावावरुन सुरु असलेल्या वादानंतर चिन्मय मांडलेकरचा मोठा निर्णय, कायदेशीर मार्ग अवलंबणारमुलाच्या नावावरुन सुरु असलेल्या वादानंतर चिन्मय मांडलेकरचा मोठा निर्णय, कायदेशीर मार्ग अवलंबणारमुलाचं नाव जहांगीर का ठेवलं असं म्हणतं त्याला आणि त्याच्या कुटूंबाला ट्रोल करण्यात आलं. कुटुंबाला होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून चिन्मयनं एक मोठा निर्णय घेतला आहे. याविषयी चिन्मयनं एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
Read more »

SC: सांसदों-विधायकों के खिलाफ दो हजार से ज्यादा मामलों में पिछले साल आया फैसला, सुप्रीम कोर्ट को दी गई जानकारीSC: सांसदों-विधायकों के खिलाफ दो हजार से ज्यादा मामलों में पिछले साल आया फैसला, सुप्रीम कोर्ट को दी गई जानकारीविजय हंसारिया ने सुप्रीम कोर्ट को बताया कि कोर्ट द्वारा दिए गए निर्देशों के बाद एमपी/एमएलए कोर्ट में सांसदों और विधायकों के खिलाफ दर्ज मामलों की सुनवाई में तेजी आई है।
Read more »

14 साल की रेप पीड़िता 30 हफ्ते की प्रेग्नेंट, सुप्रीम कोर्ट ने दी अबॉर्शन की इजाजत14 साल की रेप पीड़िता 30 हफ्ते की प्रेग्नेंट, सुप्रीम कोर्ट ने दी अबॉर्शन की इजाजतसुप्रीम कोर्ट ने नाबालिग रेप पीड़िता को दी गर्भपात की इजाजत
Read more »

नेताओं के खिलाफ सालों चलने वाले मामलों का ट्रेंड बदला, सुप्रीम कोर्ट की वजह से अब जल्द हो रहे हैं फैसलेनेताओं के खिलाफ सालों चलने वाले मामलों का ट्रेंड बदला, सुप्रीम कोर्ट की वजह से अब जल्द हो रहे हैं फैसलेसुप्रीम कोर्ट ( फाइल फोटो )
Read more »



Render Time: 2025-02-25 12:49:44