लाडकी बहीण योजना कधी बंद होणार? महिलेच्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले...

Devendra Fadnavis News

लाडकी बहीण योजना कधी बंद होणार? महिलेच्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले...
Ladki Bahin YojnaMaharashtra Government
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 68 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

लाडकी बहीण योजनेवरून रंगलेला श्रेयवाद आणि रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपाच्या महिला मोर्चाच्या वतीने लाडक्या बहिणींचा लाडका देवाभाऊ कार्यक्रम सुरू झाला आहे.

लाडकी बहीण योजनेवरून रंगलेला श्रेयवाद आणि रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपच्या महिला मोर्चाच्या वतीने लाडक्या बहिणींचा लाडका देवाभाऊ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे यावेळी देवेंद्र फडणवीस गुलाबी जॅकेट घालून पोहोचले होते. यामुळे महायुतीमध्ये आता श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे का? अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान यावेळी महिलांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या.

रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांनी मालवणी भाषेतून ऑनलाईन माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला. यावेळी एका महिलेने लाडकी बहीण योजना बंद होणार का? अशी विचारणा केली. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी जोपर्यंत आपलं सरकार आहे तोपर्यंत योजना बंद होणार नाही असं उत्तर दिलं. या कार्यक्रमाला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, आमदार अतुल भातखळकर, अमित साटम, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ व इतर नेते उपस्थित होते. अंधेरी पूर्वच्या जागेवरून शिवसेना भाजपात असलेली रस्सीखेच आणि लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत रंगलेली श्रेयवादाची लढाई या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम महत्त्वाचा मानला जात आहे.यावेळी भाषण करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की,"आज तुम्ही दिलेल्या प्रेमातून उतराई व्हायक नाही. आत बसलेल्या महिलांइतक्याच महिला बाहेर आहेत.

"पुन्हा आपलं सरकार येणार आहे, पुन्हा आपण यासाठी तरतूद करु. बहिणींनो चिंता करू नका, जोवर महायुती सरकार आहे तोवर योजना बंद करू शकत नाहीत. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्यांना 1500 रुपयांची काय किंमत कळणार. लाडका मुलगा आणि लाडकी मुलगी हे विरोधकांचं ब्रीदवाक्य आहे," अशी टीका त्यांनी केली. "आम्ही बोल बच्चन नाही. काही बोलबच्चन आहेत, केवळ भाषण करतात. हे लेना बँकवाले, यांची तोंडं रावणासारखी आहेत. दहा तोंडाने खोटं बोलणारी आहेत. महिलांविषयी बोलणाऱ्या नादान लोकांना सांगतोय महिला मुली आणि आईचं प्रेम कुणीही खरेदी करू शकत नाही," असंही ते म्हणाले.महाराष्ट्रभारतमहाराष्ट्र

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Ladki Bahin Yojna Maharashtra Government

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

...म्हणून लाडक्या बहिणींना फक्त 1 रुपया मिळणार, आदिती तटकरेंनी सांगितलं कारण!...म्हणून लाडक्या बहिणींना फक्त 1 रुपया मिळणार, आदिती तटकरेंनी सांगितलं कारण!Ladaki Bahin Yojana : शिंदे सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्टमध्ये लाडकी बहिणचा पहिला हप्ता देणार आहे.
Read more »

...अन्यथा लाडकी बहीण योजना बंद पडेल; अजित पवार यांनी का केले असं वक्तव्य...अन्यथा लाडकी बहीण योजना बंद पडेल; अजित पवार यांनी का केले असं वक्तव्यAjit pawar : राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहिण योजना जाहीर केली आहे. या योजनेबाबत अजित पवार यांनी अत्यंत महत्वाचे वक्तव्य केले आहे.
Read more »

गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; 'या' तारखेपासून सुरु होणार विशेष ट्रेनचे बुकिंगगणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; 'या' तारखेपासून सुरु होणार विशेष ट्रेनचे बुकिंगGaneshotsav 2024 : यंदाच्या वर्षी 7 सप्टेंबर 2024 रोजी गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे. जाणून घेऊया गणपती विशेष ट्रेनचे बुकिंग कधी सुरु होणार.
Read more »

'...तर लाडकी बहीण योजना थांबवण्याचे आदेश देतो'; 35 हजार कोटींचा संदर्भ देत SC चा इशारा'...तर लाडकी बहीण योजना थांबवण्याचे आदेश देतो'; 35 हजार कोटींचा संदर्भ देत SC चा इशाराSupreme Court On Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारने आर्थसंकल्पामध्ये 35 हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
Read more »

महाराष्ट्रात आता उत्तर भारतीय महिलांसाठीही 'लाडकी बहीण'; शिंदेंची शिवसेना करणार प्रचार; 40 सभा घेणारमहाराष्ट्रात आता उत्तर भारतीय महिलांसाठीही 'लाडकी बहीण'; शिंदेंची शिवसेना करणार प्रचार; 40 सभा घेणारमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत परप्रांतातून आलेल्या महिलांसाठी विशेष तरतूद आहे अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरूपम यांनी दिली आहे.
Read more »

मोठी घोषणा! मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाअंतर्गत 50 हजार युवकांना मिळणार इतके रुपयेमोठी घोषणा! मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाअंतर्गत 50 हजार युवकांना मिळणार इतके रुपयेMukhyamantri Yojnadut Karykram:लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरु असताना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय.राज्यातील तरुणांसाठी आता मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.
Read more »



Render Time: 2025-02-25 11:24:49