Eknath Khadse: एकनाथ खडसे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. यापुढे खडसे आमदारकीची व खासदारकीची निवडणुक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी यापुढे निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर खडसे यांनी हा निर्णय घेतल्याने जळगाव जिल्ह्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तसंच, एकनाथ खडसे यांची लवकरच भाजपात घरवापसीदेखील होणार आहे. खडसे यांच्या भाजपप्रवेशाला दिल्लीकडून हिरवा कंदिल मिळाल्याचं सांगण्यात येतंय. मात्र भाजपमध्ये प्रवेश कधी होणार, याची मात्र अद्याप तारीख सांगण्यात आलेली नाहीये.
एकनाथ खडसे यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, मी या पुढे विधानसभेची निवडणुक लढवणार नाही. मी आता विधानपरिषदेचा सदस्य आहे. हे सदस्यत्व असताना दुसरी आमदारकीची निवडणुक लढवणे योग्य होणार नाही. मी आता विधानसभेची निवडणुक लढवणार नाही, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. तसंच, खासदारकी माझ्या परिवारात आहे. त्यामुळं खासदारकीची निवडणूकदेखील मी लढवणार नाही. ज्या छोट्या छोट्या निवडणुका आहेत. त्या लढवण्याच्या संदर्भात आजतरी विचार केलेला नाही. असं खडसे यांनी स्पष्ट केले आहे.
एकनाथ खडसे यांचा राजकीय संन्यास आहे का? असा प्रश्न सध्या चर्चेत आहे. यावर त्यांनी राजकीय संन्यास मरेपर्यंत घेणार नाही, असं स्पष्ट उत्तर दिलं आहे. एकनाथ खडसे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वचा राजीनामा दिला होता. तसंच, भाजपमध्ये प्रवेश करण्यआधीच ते सून रक्षा खडसे यांचा प्रचार करताना दिसत होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना मुळ पक्षासोबत यावे, असं म्हटलं होतं. त्यावर पत्रकारांनी एकनाथ खडसे यांना प्रश्न विचारला होता.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात सोमवारी 13 मे रोजी मतदान होत आहे. रावेर लोकसभेत मतदारसंघात महायुतीकडून रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे.महाराष्ट्रमनोरंजन
Loksabha Election 2024 Loksabha 2024 Update लोकसभा मतदारसंघ जळगाव मतदारसंघ Jalgaon Loksabha Election 2024 एकनाथ खडसे एकनाथ खडसे लोकसभा Eknath Khadse Campaign For BJP Raksha Khadse
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
'पुणे 80000 कोटी कर देतं, 70 लाख लोकसंख्या..'; राज ठाकरेंनी समस्यांचा पाढाच वाचलाRaj Thackeray Says Pune Rally Speech: मुंबई शहर बर्बाद व्हायला एक काळ गेला पब पुणे शहर बिघडायला वेळही लागणार नाही हे मी गेले अनेक वर्ष पुण्यात येऊन सांगतोय, असं राज ठाकरे म्हणाले.
Read more »
PHOTO : लोकसभा निवडणूक प्रचारात व्यग्र मोदींनी विमानातून पाहिला सूर्यतिलक सोहळा, त्यांच्या एका कृतीनं वेधलं लक्षलोकसभा निवडणूक प्रचारात व्यग्र असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सूर्यतिलक सोहळा पाहण्यासाठी अयोध्येत जाऊ शकलं नाही. पण त्यांनी विमानातून या क्षणाचे साक्षीदार झाले.
Read more »
Exclusive : अमोल कोल्हे अभिनयातून संन्यास घेण्याच्या तयारीत; स्वत:च केला खुलासाझी 24 तासच्या निवडणूक यात्रा कार्यक्रमात दिलेल्या खास मुलाखतीत अमोल कोल्हेंनी ही महत्त्वाची घोषणा केली...
Read more »
Loksabha Election 2024 : 'हे बरोबर नाही' शरद पवारांविषयी वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना अजित पवार स्पष्टच म्हणालेLoksabha Election 2024 : चंद्रकांत पाटील यांच्यावर अजित पवारांची खदखद; शरद पवारांविषयीच्या त्या वक्तव्यामुळं नाराजी. राजकीय वर्तुळात चर्चा नव्या मतभेदांची
Read more »
'राज ठाकरे भाजपचे नवे डार्लिंग बनले, पण..', राऊतांचा टोला; म्हणाले, 'राणे जेवढे..'Sanjay Raut On Raj Thackeray Narayan Rane: अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणत्याच स्वाभिमानाची अपेक्षा करता येणार नाही, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
Read more »
Loksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशाराLoksabha Election 2024: तांत्रिकदृष्ट्या बीएमसीच्या हद्दीत येणाऱ्या आणि मुंबई ईशान्य मतदारसंघात मतदानाचा बजावणाऱ्या हरिओम नगरला टोलमाफी झाली नाही तर मतदान करणार नाही, असा थेट इशारा नागरिकांना सरकारला दिला आहे.
Read more »