आपल्या मुलीवर गोळीबार केल्याप्रकरणी एका महिलेने आपल्याच 10 वर्षाच्या मुलाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
उत्तर प्रदेशात एका महिलेने आपल्याच 10 वर्षाच्या मुलाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुलाने गावठी पिस्तुलातून गोळी घालून आपल्या मुलीची हत्या केल्याचा महिलेचा आरोप आहे. मुलगा सध्या सहावीत शिकत असून, त्याचे आई-वडील शेतकरी आहेत. पीडित 16 वर्षीय मुलगी नववीत शिकत होती. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला आहे.
“आईने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे त्या मुलावर आयपीसी कलम 304-A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेलं नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे,” असं संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितलं आहे. अधिकाऱ्याने पुढे सांगितलं की, मुलाने शस्त्र कसे मिळवले याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. कारण त्याच्या पालकांनी त्यांच्याकडे घरी पिस्तूल नाही असं सांगितलं आहे.
पोलीस सध्या घराजवळ लावण्यात आलेल्या सर्व सीसीटीव्हीमधील फुटेज तपासत आहेत. तसंच मुलाच्या वडिलांविरोधात आतापर्यंत दोन गुन्हे दाखल असल्याचं समोर आलं आहे. आम्ही त्या केसेसची माहिती मिळवत आहोत असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा आपल्या 13 आणि 16 वर्षांच्या दोन बहिणींसह खेळत होता. यावेळी त्यांचे पालक घऱी होते. मुलाने गावठी पिस्तूल आणलं होतं आणि त्याच्यासह खेळत होता. पण अचानक पिस्तुलातून गोळी सुटली आणि 16 वर्षाच्या बहिणीच्या पोटात जाऊन लागली.
गोळीचा आवाज ऐकल्यानंतर शेजारी धावत घरी आले. यावेळी त्यांना मुलगी रक्ताच्या थारोळ्यात खाली पडलेली दिसली. त्यांनी तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेलं. पण डॉक्टरांनी पोहोचताच तिला मृत घोषित केलं.Insurance Premium News : हेल्थ इन्श्युरन्स घेणाऱ्यांना मोठा झटका, 10 ते 15% वाढणार पॉलिसीचा प्रीमियम
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
पंकज त्रिपाठी यांच्या भावोजींच्या अपघाती मृत्यूपूर्वीचं CCTV आलं समोर, कार थेट डिव्हायडरवर गेली अन्...बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी यांचे भावोजी राकेश तिवारी अपघात झाला तेव्हा कार चालवत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश तिवारी यांचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार थेट दुभाजकावर जाऊन आदळली.
Read more »
कोणती आई मुलाला व्हर्जिनिटी, शारीरिक संबंधांबद्दल विचारते? मलायका अरोरावर नेटकऱ्यांचा संतापMalaika Arora and Arhaan Khan : मलायका अरोरानं अरहानला थेट कॅमेऱ्यासमोर विचारला असा प्रश्न की नेटकऱ्यांनाही बसला धक्का
Read more »
काँग्रेसचे बंडखोर हेच उद्धव ठाकरे यांचे सर्वात मोठ टेन्शन; थेट कारवाईची मागणीकाँग्रेसचे बंडखोर उद्धव ठाकरे यांच्यासाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहेत. यामुळे आता उद्धव ठाकरे थेट कारवाईची मागणी करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
Read more »
Virat Kohli: नो-बॉलवर विराट कोहलीला का दिलं आऊट? पाहा ICC चा नियम काय सांगतो...Virat Kohli No-ball Controversy: कोलकाताविरुद्धच्या सामन्यात बाद झाल्यानंतर विराट कोहली चांगलाच संतापलेला दिसून आला. यावेळी त्याने आऊट झाल्यानंतर थेट मैदानावरील अंपयारशी पंगा घेतला
Read more »
'रोहितने तरी कुठे मागील 2-3 वर्षात..'; हार्दिकची बाजू घेत सेहवागने रोहितलाच सुनावलंIPL 2024 Virender Sehwag Blunt Take On Rohit Sharma: हार्दिक पंड्यावर होत असलेली टीका आणि मुंबई इंडियन्सच्या संघाची कामगिरी यासंदर्भात बोलताना सेहवागने थेट रोहित शर्माचा उल्लेख करत कठोर शब्दांमध्ये आपली भूमिका मांडली.
Read more »
Loksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशाराLoksabha Election 2024: तांत्रिकदृष्ट्या बीएमसीच्या हद्दीत येणाऱ्या आणि मुंबई ईशान्य मतदारसंघात मतदानाचा बजावणाऱ्या हरिओम नगरला टोलमाफी झाली नाही तर मतदान करणार नाही, असा थेट इशारा नागरिकांना सरकारला दिला आहे.
Read more »