Water Shortage : मे महिन्याच्या 24 आणि 24 तारखेला मुंबईतील काही परिसरात पाणी पुरवठा बंद राहिल. नागरिकांनी त्यामागची कारणे समजून घ्या.
मुंबईतील घाटकोप र, भांडूप आणि मुलूंड परिसरात राहणाऱ्या नागरिकांना 24-25 मे रोजी पाणी कपात ीचा सामना करावा लागणार आहे. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव- मुलूंड लिंक रोड प्रोजेक्टच्या अंतर्गत फोर्टिस रुग्णालय ते मुलूंड औद्योगिक क्षेत्रातलगत असलेल्या 1200 मिमी व्यास पाईपलाईनला वळवण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे दादर , घाटकोप र, भांडुप-मुलुंडमध्ये आज पाणी बंद असेल. 24-25 मे रोजी 24 तास या परिसरात पाणी बंद असणार आहे.
नाहूर , भांडुप , कांजूर चा परिसर, टागोरनगर संपूर्ण परिसर, कन्नमवार नगर विक्रोळी , मुलुंड-गोरेगाव जोडरस्तालगतचा परिसर, सीएट टायर मार्गलगतचा परिसर, गाव रोड, दत्त मंदिर मार्ग, अंजना इस्टेट, शास्त्री नगर, उषा नगर, लाल बहादूर शास्त्री मार्गलगतचा परिसर, सोनापूर, गावदेवी मार्ग, जंगल मंगल मार्ग, लेक मार्ग, द्राक्ष बाग, काजू टेकडी, जनता मार्केट, टँक रोड परिसर, महाराष्ट्र नगर, कोकण नगर, सह्याद्री नगर, क्वारी मार्ग व प्रतापनगर मार्गलगतचा परिसर येथे पाणीपुरवठा 24-25 मे रोजी बंद असेल.
Mumbai Water Crisis News Mumbai Water Supply News Mumbai Water Cut Water Supply In Mumbai Today News Mumbai Water Supply Cut Today News पाणी कपात पाणी संकट घाटकोप दादर भांडूप मुलूंड
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
मुंबईवर पाणी कपातीचे संकट; धरणामध्ये केवळ 10.67 टक्केच पाणीसाठा शिल्लकवाढत्या तापमानामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे मुंबईकरांवर लवकरच पाणी कपातीचे संकट ओढावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Read more »
पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर पालिका आक्रमक, दोन्हीही पबवर मोठी कारवाईपुणे महापालिकने कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या वॅाटर्स आणि ओरिल्ला पबवर महापालिकेची मोठी कारवाई केली आहे.
Read more »
30 हजार पोलीस, 3 दंगल पथक आणि..; महाराष्ट्रातील मतदानाच्या शेवटच्या टप्प्यासाठी 'अशी' सुरु आहे तयारीमतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात आणि मतदान केंद्रात मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.
Read more »
वाढत्या उष्णतेमुळं मुंबईकरांवर दुहेरी संकट, पोटदुखीने नागरिक हैराण, काय काळजी घ्याल!Mumbai News Today: उन्हे तापल्यामुळं पोटदुखीच्या समस्यात वाढ झाली आहे. रुग्णालयात दररोज तीसहून अधिक रुग्ण दाखल होत आहे.
Read more »
नांदेड शहराला पाणी मिळालं, पण 25 दिवसांपासून पावडेवाडीचा पाणी पुरवठा बंदच; नागरिक संतापलेनांदेड शहराला लागून असलेल्या पावडेवाडी ग्रामपंचायत हद्दीत शहर झपाट्याने वाढले. जवळपास 55 हजार लोकसंख्या या भागात आता वास्तव्यास आहे. या भागाला नांदेड महापालिकाच पाणीपुरवठा करते. पण गेल्या 25 दिवसांपासून नांदेड महापालिकेने पाणीपुरवठा केला नाही.
Read more »
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! संपूर्ण शहरात वीकेंडला पाणीपुरवठा बंदPune Water Cut : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी असून महापालिकेने पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलंय.
Read more »