महाराष्ट्रातील पहिला अतिविशाल प्रकल्प कोकणात! रत्नागिरीत 29550 कोटींची गुंतवणुक, 38000 नोकऱ्या

Maharashtra News

महाराष्ट्रातील पहिला अतिविशाल प्रकल्प कोकणात! रत्नागिरीत 29550 कोटींची गुंतवणुक, 38000 नोकऱ्या
Aerospace And Defense ProjectRatnagiriJobs In Maharashtra
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 68 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 45%
  • Publisher: 63%

रत्नागिरी येथे 29 हजार 550 कोटी गुंतवणुकीच्या दोन प्रकल्प राबवले जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याला मान्यता दिली आहे.

रत्नागिरी येथील वाटद, झाडगाव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रात 29 हजार 550 कोटी गुंतवणुकीच्या दोन प्रकल्पांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. यामुळे 38 हजार 120इतकी रोजगार निर्मिती होणार आहे. उच्च तंत्रज्ञानावर आधारित या गुंतवणुक प्रकल्पांमध्ये सिलीकॉन वेफर्स, एटीएमपी, फॅब आणि अवकाश तंत्रज्ञान आणि संरक्षण या क्षेत्राशी संबंधित आहेत.

वेल्लोर इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी पार्क कंपनीचा उच्च तंत्रज्ञानावर आधारित सिलीकॉन वेफर्स, फॅब, एटीएमपी निर्मितीचा राज्यातील हा तिसरा अतिविशाल प्रकल्प आहे. हा प्रकल्प वाटद व झाडगाव एमआयडीसी या भागात होणार आहे. या प्रकल्पामध्ये 19 हजार 550 कोटींची गुंतवणूक होणार आहे. त्यातून 33 हजार प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे.

हे देखील वाचा.... मुंबई ते पुणे 20 मिनिटांत, मुंबई ते गोवा एका तासात आणि मुंबई ते नागपूर फक्त दीड तासात... विमानापेक्षा सुपरफास्ट ट्रेन दुसरा प्रकल्प रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा असून तो एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील साहित्य निर्मितीचा अतिविशाल प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये 10 हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. त्याद्वारे 4500 रोजगार निर्मिती होणार आहे. एरोस्पेस व संरक्षण क्षेत्रातील राज्यातील हा पहिलाच अतिविशाल प्रकल्प आहे.या दोन्ही प्रकल्पांमुळे या भागात वाढीव रोजगार आणि व्यावसायिक उपक्रम स्थापित होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभागाची मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंत्रालयात झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आदी उपस्थित होते.महाराष्ट्रातील पहिला अतिविशाल प्रकल्प कोकणात! रत्नागिरीत 29...

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Aerospace And Defense Project Ratnagiri Jobs In Maharashtra रत्नागिरी

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

वाळूचा भला मोठा डोंगर, महाराष्ट्रातील अद्भूत चमत्कार! 499 वर्षांपूर्वी कोकणात आलेल्या प्रलयकारी त्सुनामीचा अविश्वसनीय पुरावावाळूचा भला मोठा डोंगर, महाराष्ट्रातील अद्भूत चमत्कार! 499 वर्षांपूर्वी कोकणात आलेल्या प्रलयकारी त्सुनामीचा अविश्वसनीय पुरावामहाराष्ट्रातील सर्वात मोठा वाळूचा डोंगर कोकणात आहे. 15 व्या शतकात आलेल्या प्रलयकारी त्सुनामीचा पुरावा असेला हा डोंगर कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनला आहे.
Read more »

4000 जणांना नोकरीची संधी! महाराष्ट्रतील पहिला सेमी कंडक्टर प्रकल्प नवी मुंबईत सुरु; 36 हजार 573 कोटींची गुंतवणूक4000 जणांना नोकरीची संधी! महाराष्ट्रतील पहिला सेमी कंडक्टर प्रकल्प नवी मुंबईत सुरु; 36 हजार 573 कोटींची गुंतवणूकराज्यातील पहिल्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचं नवी मुंबईत उद्घाटन झाले आहे. IRP इलेक्ट्रॉनिक कंपनीच्या प्रकल्पातून राज्यात तब्बल 36 हजार 573 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे.
Read more »

एका सुंदर वळणावर दिसतो अथांग समुद्र... महाराष्ट्रातील नयनरम्य सागरी मार्गएका सुंदर वळणावर दिसतो अथांग समुद्र... महाराष्ट्रातील नयनरम्य सागरी मार्गमहाराष्ट्रातील नयनरम्य सागरी मार्ग रत्नागिरी जिल्ह्यात आहे.
Read more »

इथं कधीही जा... एकदम भारीचं वाटतं! महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळइथं कधीही जा... एकदम भारीचं वाटतं! महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळमुंबईजवळ महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय हिल स्टेशन आहे.
Read more »

महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर; माऊंट एव्हरेस्टसोबत केली जाते बराबरीमहाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर; माऊंट एव्हरेस्टसोबत केली जाते बराबरीकळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते.
Read more »

महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार: प्रकाश आंबेडकरमहाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार: प्रकाश आंबेडकरविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात वेगवान पडद्याआड राजकीय घडामोडी घडत आहेत. टू द पॉईंट मुलाखतीत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्रातील राजकारणासंदर्भात मोठा दावा केलाय.
Read more »



Render Time: 2025-02-24 23:16:14