महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंची भूमिका ठरणार महत्त्वाची; पुण्यातील 'या' 5 मतदार संघात मनसे उमेदवार उभे करणार?

Maharashtra Assembly Elections 2024 News

महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंची भूमिका ठरणार महत्त्वाची; पुण्यातील 'या' 5 मतदार संघात मनसे उमेदवार उभे करणार?
Maharashtra PoliticsRaj ThackerayMns
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 72 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 53%
  • Publisher: 63%

Raj Thackeray : लोकसभा निवडणूक स्वबळावर राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिलाय. आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची असणार आहे. पुण्यातील आठ पैकी पाच मतदारसंघात मनसे उमेदवार देण्याच्या तयारीत असल्यानं राज ठाकरे यांनी मिशन पुणे हाती घेतलंय.

महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे ंची भूमिका ठरणार महत्त्वाची; पुण्यातील 'या' 5 मतदार संघात मनसे उमेदवार उभे करणार?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पुणे मिशन हाती घेत पुण्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. विधानसभा निवडणुकीसाठीच्या या खास बैठकीसाठी पुण्यातील इच्छुकांना मुंबईत पाचारण करण्यात आलं होतं. मनसे कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांनी नेमका काय कानमंत्र दिला हे अजून गुलदस्त्यात आहे.कधीकाळी पुणे महापालिकेत मनसेचे 29 नगरसेवक आणि शहरात एक आमदार राहिलेल्या मनसेची अलीकडच्या काळात चांगलीच घसरण झालीये. गेल्या महापालिका निवडणुकीत मनसेचे दोन नगरसेवक निवडून आले .

अलीकडच्या काळात झालेल्या निवडणुकांमध्ये मनसेला अपेक्षित यश मिळालं नाही. तरीही पुण्यात राज ठाकरे यांची क्रेझ कायम आहे. त्यामुळेच त्यांच्या सभांना पुण्यात मोठी गर्दी होते. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने या गर्दीच रूपांतर मतांमध्ये करण्याचा आव्हान पुन्हा एकदा पक्षासमोर आहे. पुणे शहरातील कोथरूड, शिवाजीनगर, कसबा, पर्वती तसेच हडपसर मतदारसंघात मनसेची बऱ्यापैकी ताकद आहे. त्यामुळेच इथल्या इच्छुकांनी विधानसभा लढवण्याची तयारी सुरू केली आहे.पुणे शहरातील आठही विधानसभा लढण्याची मनसैनिकांची इच्छा आहे.

राज ठाकरे एकीकडे पुण्यातील परिस्थितीचा आढावा घेत असतानाच पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील त्यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीमुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. यावेळची विधानसभा निवडणूक मनसे स्वबळावर लढवणार हे जवळजवळ निश्चित आहे. विधानसभेसाठीचे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. त्याचा विचार करता मनसेच्या तंबूत निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आवश्यक हालचालींना अजून तरी वेग आलेला दिसत नाहीये.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Politics Raj Thackeray Mns Constituencies In Pune राज ठाकरे विधानसभा निवडणूक

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

अमित ठाकरेंना 'बिनशर्त पाठिंबा' मिळावा राज शिंदेंच्या निवासस्थानी? सूत्रांची माहितीअमित ठाकरेंना 'बिनशर्त पाठिंबा' मिळावा राज शिंदेंच्या निवासस्थानी? सूत्रांची माहितीRaj Thackeray Meet CM Eknath Shinde: विशेष म्हणजे राज ठाकरेंची ही भेट पूर्वनियोजित नव्हती. मनसे पदाधिकाऱ्यांबरोबरच्या बैठकीआधी अचानक ते वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचले.
Read more »

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा सस्पेंस! सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये फाईलने चेहरा लपवणारा 'तो' नेता कोण?महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा सस्पेंस! सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये फाईलने चेहरा लपवणारा 'तो' नेता कोण?Maharashtra politics : विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत.
Read more »

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा धमाका होणार! भाजपचा बडा नेता शरद पवार गटात प्रवेश करणारमहाराष्ट्राच्या राजकारणात मोठा धमाका होणार! भाजपचा बडा नेता शरद पवार गटात प्रवेश करणारMaharashtra politics : भाजपला मोठा धक्का बसणार आहे. एक बडा नेता शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. लवकरच पक्ष प्रवेश होणार आहे.
Read more »

'मला फक्त एक खून माफ करा', भर सभेत राज ठाकरे असं का म्हणाले?'मला फक्त एक खून माफ करा', भर सभेत राज ठाकरे असं का म्हणाले?मला एक खून माफ करा, राज ठाकरेंचं गोरेगावमधील मनसे कार्यकर्ता मेळाव्यात मिश्किल वक्तव्य.
Read more »

तीन पक्षात जागावाटप कसं करणार? शरद पवारांनी सांगितली रणनीती; म्हणाले, पुढच्या 10 दिवसांत...तीन पक्षात जागावाटप कसं करणार? शरद पवारांनी सांगितली रणनीती; म्हणाले, पुढच्या 10 दिवसांत...Sharad Pawar: शरद पवार यांनी अलीकडेच एक पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी जागावाटपावर महत्त्वाची भूमिका मांडली आहे.
Read more »

मनसेच्या उमेदवार यादीत मोठा ट्विस्ट! अमित ठाकरे 'या' मतदार संघातून निवडणूक लढवणार?मनसेच्या उमेदवार यादीत मोठा ट्विस्ट! अमित ठाकरे 'या' मतदार संघातून निवडणूक लढवणार?मुंबईतील अत्यंत महत्वाच्या आणि ठाकरे गटाच्या बिलेकिल्ल्याजवळ असलेल्या मतदार संघातून अमित ठाकरे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
Read more »



Render Time: 2025-02-23 23:37:34