Dahanu Nashik Railway: डहाणू आणि नाशिक या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली आहे.
नाशिक आणि डहाणू दरम्यान नव्या मार्गिकेच्ये सर्वेक्षणासाठी रेल्वे मंत्रालयाने अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी 100 किमीची लाईन त्र्यंबकेश्वर आणि वाणगावमधून मार्गक्रमण करणार आहे. या नव्या रेल्वे मार्गामुळं दोन शहरातील अतंर कमी होणार आहे. तसंच, कनेक्टिव्हीटीदेखील वाढणार आहे. तसंच, या प्रादेशिक वाहतूक, पर्यटन आणि आर्थिक देवाण-घेवाणदेखील अधिक सुलभ होणार आहे.
नाशिक जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणजे त्र्यंबकेश्वर आहे. या स्थळाला ऐतिहासिक आणि सांस्कृतीक महत्त्व आहे. तसंच, नाशिक जिल्ह्यात अनेक देवस्थाने आहेत. तसंच, पंचवटी येथेही दरवर्षी हजारो भाविक भेट देतात. नाशिकमध्ये लाखो भक्त भेट देत असतात. या रेल्वे मार्गामुळं नाशिकला आणखी एक शहर जोडले जाणार आहे. त्यामुळं नाशिक जिल्ह्यात पर्यटनाला चालना मिळणार आहे. पालघर जिल्हा आणि नाशिक जिल्ह्यातील अंतरही कमी होणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतिम स्थान सर्वेक्षण करण्याचा निर्णय नियोजन आणि व्यवहार्यता अभ्यासानंतर घेण्यात आला आहे . भौगोलिक परिस्थिती, पर्यावरणीय प्रभाव आणि खर्च यासर्व घटकांचा विचार करुनच सर्वेक्षण रेल्वे मार्गासाठी सर्वात योग्य मार्गाचे मूल्यांकन करेल. या रेल्वे मार्गामुळं ग्रामीण विकासाबरोबरच धार्मिक पर्यटनालाही चालना मिळणार आहे.
सर्वेक्षणामध्ये रेल्वेचा नेमका मार्ग कुठून जाणार त्याची जोडणी कशी असणार, आवश्यक जमीन अधिग्रहण, पुलांचे ठिकाण या सर्व गोष्टींची चाचपणी करण्यात येणार आहे. लवकरच सर्वेक्षणाचे काम सुरू होणार आहे. त्यानंतर बांधकाम नियोजनासह प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. या रेल्वेमार्गामुळं प्रवासाचा वेळ खूप कमी होणार आहे तसंच, रेल्वेला चालना देखील मिळणार आहे.
Railway Transport Route Dahanu Nashik Railway Dahanu Nashik Railway News Dahanu Nashik Railway Route Dahanu Nashik Railway Update New Broad Gauge Railway ब्रॉडगेज डहाणू-नाशिक रेल्वे डहाणू-नाशिक रेल्वे बातमी डहाणू-नाशिक रेल्वे डहाणू-नाशिक रेल्वे अपडेट डहाणू-नाशिक रेल्वे मान्यता
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
समृद्धी महामार्गाचा विस्तार, इगतपुरीपासून आणखी एक नवा मार्ग; कोणाला फायदा होणार?Samruddhi Mahamarg Route: समृद्धी महामार्गाचा आता लवकरच विस्तार होणार आहे. आणखी इगतपुरीपासून आणखी एक नवा मार्ग तयार होणार आहे.
Read more »
मुंबई-गोवा अंतर अवघ्या 6 तासांत पूर्ण होणार; कोकणात जाण्यासाठी तयार होतोय आणखी एक महामार्गKokan Expressway: कोकण एक्स्प्रेसवे लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. या प्रकल्पामुळं मुंबई गोवा अंतर अवघ्या 6 तासांत पूर्ण होणार
Read more »
उड्डाणपुलाच्या डोक्यावरुन धावणार मेट्रो; मुंबई महानगरातील पहिला डबल डेकर पूल, वाहतूककोंडी फुटणारMumbai Metro Station: मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सुलभ होणार आहे. मुंबई महानगर परिसरात पहिल्या-वहिल्या डबल डेकर पुलाचे उद्घाटन करण्यात आले आहे.
Read more »
उत्तर नव्हे बदल हवा! मुलांना का नाही सांगत सातच्या आत घरात यायला? मुलीच का... कोर्टाचा खडा सवालBadlapur Case : मुलींच्या बाबतीत समाजाची भूमिका आणि मुलींकडे पाहण्याचा एकंदर दृष्टीकोन पाहता परिस्थिती बदलण्यासाठी आता आणखी वेळ दवडून चालणार नाही असाच आग्रही सूर मुंबई उच्च न्यायालयानं आळवला आहे.
Read more »
Yashashree Shinde Murder Case: उरण स्टेशनजवळ सापडले 2 महत्त्वाचे पुरावे; मिळणार अनेक प्रश्नांची उत्तरंYashashree Shinde Murder Case Big Update: मागील दोन आठवड्यांपासून पोलीस या प्रकरणामध्ये तपास करत असताना शोध घेत असलेल्या त्या दोन गोष्टी पोलिसांना सापडल्या असून यामधून अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत.
Read more »
महाराष्ट्रात कधी होणार विधानसभा निवडणूक? आयुक्तांनी स्पष्टच सांगितले...Maharashtra Assembly Election: केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. यावेळी महाराष्ट्रातील निवडणुकींच्या तारखादेखील जाहीर केल्या जातील अशी अपेक्षा होती. मागच्या वेळी महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या होत्या.
Read more »