Kokan Expressway: कोकण एक्स्प्रेसवे लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. या प्रकल्पामुळं मुंबई गोवा अंतर अवघ्या 6 तासांत पूर्ण होणार
मुंबई-गोवा महामार्ग ाचे काम गेल्या 17 वर्षांपासून रखडलेले आहे. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना नेहमी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मुंबई ते कोकणचा प्रवास खडतर असतानाच राज्य सरकारने मुंबई-गोवा अंतर कमी करण्यासाठी कोकण एक्स्प्रेस हा प्रकल्प हाती घेतला आहे. एकूण 22 गावांतून हा प्रकल्प जाणार असून यामुळं मुंबई ते गोवा प्रवास 6 तासांत पूर्ण होणार आहे. सध्या रस्तेमार्गे मुंबई-गोवा प्रवासासाठी 12 तास लागतात मात्र कोकण एक्स्प्रेसवे मुळं प्रवाशांना जलद प्रवास करता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा प्रकल्प हाती घेतला आहे.कोकणसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हा प्रकल्प एकूण 363 किमी लांबीचा असणार असून सहा मार्गिकांचा आहे. त्याची रुंदी 100 मीटर प्रस्तावित करण्यात आली आहे. तर या प्रकल्पासाठी एकूण 68 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. अलिबागच्या शहाबाज येथून हा महामार्ग सुरू होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथपर्यंत जाणार आहे. या महामार्गावर वाहने 100 ते 200च्या वेगाने वाहतील अशापद्धतीने वेग मर्यादा नियंत्रित केली जाणार आहे.
अलिबाग, रोहा, तळा, माणगाव, म्हसळा, मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, रत्नागिरी, लांजा, राजापूर, देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी या तालुक्यांचाही समावेश आहे.
कोकण एक्स्प्रेसवेसाठी 5792 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. यातील 146 हेक्टर वनजमीन या महामार्गात बाधित होणार आहे. यासाठी आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या प्रकल्पाच्या पर्यावरण मंजुरीची प्रक्रिया सुरू केली आहे. तसंच, कोकण एक्स्प्रेसवेमुळं कोकणातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. हा महामार्ग पश्चिम घाटातील इकोलॉजिकल सेन्सिटीव्ह झोन असलेल्या 22 गावांतून हा महामार्ग जाणार आहे.Maharashtra Weather News : पुढील 24 तासात ताशी 40 किमी वारे वाहून पाऊस...
Mumbai-Goa Distance Mumbai Goa Highway Konkan Expressway Project Mumbai News Marathi News कोकण एक्स्प्रेसवे कोकण एक्स्प्रेसवे बातम्या मराठी न्यूज मुंबई-गोवा महामार्ग
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
एक तासांचे अंतर 15 मिनिटांत पूर्ण होणार, रिंग रोड प्रकल्पामुळं कल्याणकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणारKalyan Ring Road Project: कल्याण रिंग रोड प्रकल्पामुळं नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. दीड तासांचा प्रवास 15 मिनिटांत पूर्ण होणार आहे.
Read more »
मुंबईतील जंगल आणखी घनदाट होणार; कुर्ला, बोरीवली, पवई 'या' भूखंडांवर...Mumbai Forest: मुंबईतील जंगल आता आणखी घनदाट होणार आहे. पालिका राबवणार महत्त्वाचा उपक्रम.
Read more »
कोकणात जाणाऱ्यांनी जायचे कसे? मुंबई गोवा हायवे पाण्यात बुडाला; प्रवाशांचे प्रचंड हालकोकणात पावसाने धुमशान घातले आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा हायवे पाण्यात बुडाला आहे.
Read more »
कोकणात जाणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची सूचना! 11 ते 13 जुलै मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक बंदकोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागू शकतो. 11 ते 13 जुलै मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे.
Read more »
गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; 'या' तारखेपासून सुरु होणार विशेष ट्रेनचे बुकिंगGaneshotsav 2024 : यंदाच्या वर्षी 7 सप्टेंबर 2024 रोजी गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे. जाणून घेऊया गणपती विशेष ट्रेनचे बुकिंग कधी सुरु होणार.
Read more »
हक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार; सिडकोच्या लॉटरीला अखेर मुहूर्त सापडलाCidco Lottery 2024: सिडकोकडून 2020 रोजी काढण्यात आलेल्या लॉटरीच्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे.
Read more »