Extortion Case Against MNS Party Leader: मुंबई पोलिसांच्या खंडणी विभागाने या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला असून सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांनी हाती घेतला आहे. या प्रकरणामध्ये आता पोलीस इतर तपशील गोळा करत आहेत.
लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी आपण महाराष्ट्रातील महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निकटवर्तीयाविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. पालघरचे मनसे लोकसभा निवडणूक समन्वयक तसेच पक्षाचे नेते अविनाश जाधवांविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात हा गुन्हा दाखल झाल्याने याचा फटका अविनाश जाधवांबरोबरच पक्षाला बसू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
जैन यांच्या मालकीच्या सोन्याच्या दुकानात एक व्यवहार होता. हा व्यवहार करण्यासाठी हे लोक गेलेले असताना हा धमकावण्याचा आणि खंडणी मागण्याचा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे. सध्या या प्रकरणातील प्राथमिक माहिती हाती आली असून पोलीस अधिक माहिती गोळा करत आहेत. सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर रकॉर्डींगचा तपास पोलीस करत आहेत.अविनाश जाधव हे मनसेचे ठाण्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. आंदोलने असो किंवा कार्यक्रम असो अविनाश जाधव हे कायम वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून बातम्यांमध्ये चर्चेत असतात.
Case Filed Raj Thackeray Mns Prty Thane Leader Avinash Jadhav
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
जेलमधून सुटका होताच आरोपीने 7 महिन्याच्या सावत्र मुलीला हातात घेतलं अन्....पीडित मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीच्या आधारे आरोपी विजय साहनीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read more »
'पुलवामा'संदर्भातील 'ते' विधान प्रणिती शिंदेंना भोवणार? थेट निवडणूक आयोगाने घेतली दखलPraniti Shinde On Pulwama Attack: भारतीय जनता पार्टीने प्रणिती शिंदेंबरोबरच शरद पवार गटाचे अहमदनगरमधील उमेदवार निलेश लंकेविरुद्धही निवडणूक आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.
Read more »
...अन् पाकिस्तानी चिमुरडा मैदानातच ढसाढसा रडू लागला, खेळाडूंसह अख्खं मैदान त्याच्याकडे पाहत राहिलंन्यूझीलड (New Zealand) संघ महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानात (Pakistan) दाखल झाला आहे. आयपीएल तसंच दुखापतीमुळे न्यूझीलंड संघाचे अनेक खेळाडू संघातून बाहेर आहेत.
Read more »
पंकजा मुंडेंवर पावणेतीन कोटींचं कर्ज! 450 ग्रॅम सोनं अन् 4 किलो चांदी; एकूण संपत्ती..Pankaja Munde Property Details: बीड मतदारसंघातून निवडणूक लढणाऱ्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.
Read more »
पुरुषांच्या तुलनेत महिला डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर मृत्यू दरात घट; अभ्यासातून मोठा खुलासाएनल्स ऑफ इंटरनल मेडिसीनमध्ये प्रकाशिक झालेल्या अभ्यासानुसार, पुरुष डॉक्टरांद्वारे उपचार केलेल्या रुग्णांपेक्षा महिला डॉक्टरांद्वारे उपचार केलेल्या रूग्णांचा मृत्यू आणि रूग्णालयात पुन्हा दाखल होण्याचं प्रमाण कमी आहे.
Read more »
प्रणिती शिंदेंची ताकद वाढणार; पोटनिवडणुकीत 1 लाख मते घेतलेल्या नेत्याचा पाठिंबाLoksabha Election: प्रणिती शिंदे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे.
Read more »