पीडित मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीच्या आधारे आरोपी विजय साहनीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजधानी दिल्लीत 30 वर्षीय पित्याने आपल्याच सात वर्षीय सावत्र मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे आरोपी आदल्या दिवशीच जेलमधून सुटून बाहेर आला होता. 7 वर्षीय चिमुरडीला जमिनीवर आपटून त्याने निर्दयीपणे ठार केलं. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलीस शुक्रवारी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी मुलगी बेशुद्धावस्थेत त्यांना आढळली. मुलीला तात्काळ नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण नंतर तिचा मृत्यू झाला. मुलीच्या आईने, आरती यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, आरोपी विजय साहनीविरुद्ध आयपीसी कलम 302 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. आरती यांनी तक्रारीत सांगितलं आहे की, विजय हा आपला पहिला पती असून त्याला दोनवेळा अटक झाली आहे. तो जेलमध्ये शिक्षा भोगत होता. विजय जेलमध्ये असताना आपण त्याचा भाऊ दीपकसह लग्न केलं. त्याच्यापासून आपल्याला अमंतिका नावाची मुलगी झाली.आरोपी बुधवारी जेलमधून सुटला होता.
"जेलमधून सुटल्यानंतर माझा पूर्वाश्रमीचा पती गुरुवारी रात्री 10 वाजता घऱी पोहोचला होता. घऱी पोहोचताच त्याने माझ्याकडे एकत्र राहणार का अशी विचारणा केली. मी नकार दिला असता त्याने मला मुलीला ठार करण्याची धमकी दिली. त्याला दारुचं व्यसन असून, चुकीच्या कामात सहभागी असतो. त्याने झोपेत असणाऱ्या माझ्या मुलीला उचललं आणि जमिनीवर आपटलं. यानंतर मुलगी बेशुद्ध पडली होती," असं आरतीने सांगितलं आहे. यानंतर आरती यांनी तात्काळ दीपक आणि शेजारच्यांना बोलावलं. त्यांनी मुलीला घेऊन रुग्णालयात धाव घेतली.
डॉक्टरांनी मुलीचा दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात पाठवलं. परंतु नंतर, पोलिसांनी बाळाला नारायण रुग्णालयात नेले, जिथे पोहोचल्यावर तिला मृत घोषित करण्यात आलं, असं पोलिसांनी सांगितलं आहे. शवविच्छेदन करून तिचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे.परीक्षेत 'जय राम जी', 'विराट कोहली' लिहिणारे विद्यार्थी झाले उत्तीर्ण, राज्यपालांपर्यंत पोहोचलं प्रकरणं!
Gurgaon Crime News Delhi Police Murder Case Delhi Crime News
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Jos Buttler : तो आला त्यानं पाहिलं अन् जिंकून घेतलं सारं...!Jos Buttler single handed win For RR : आयपीएल इतिहासात लक्षात राहील अशी खेळी जॉस बटलरने आज कोलकाताच्या मैदानावर खेळून दाखवली.
Read more »
...अन् पाकिस्तानी चिमुरडा मैदानातच ढसाढसा रडू लागला, खेळाडूंसह अख्खं मैदान त्याच्याकडे पाहत राहिलंन्यूझीलड (New Zealand) संघ महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानात (Pakistan) दाखल झाला आहे. आयपीएल तसंच दुखापतीमुळे न्यूझीलंड संघाचे अनेक खेळाडू संघातून बाहेर आहेत.
Read more »
CSK vs LSG : प्लेऑफच्या शर्यतीत चेन्नई टिकणार! आज लखनऊ अन् चेन्नई भिडणार, पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्डIPL 2024 CSK vs LSG : आज चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे.
Read more »
IPS पद नाकारलं, IAS च व्हायचंय...! कोण आहे UPSC 2023 चा टॉपर आदित्य श्रीवास्तव?UPSC Civil Services Final Result 2023 : मागल्या अटेम्पटला आयपीएल झाला पण आयएएस व्हायचं होतं, पुन्हा प्रयत्न केला अन् पटकवला ऑल इंडिया रँक वन...!
Read more »
..अन् क्षणात मिटवला 571 कोटींचा व्यवहार; 'बिग बाजार'च्या मालकाला 95 कोटींचा फायदाFuture Group Owner Kishore Biyani Deal: एकीकडे शेकडो कोटींची कर्ज बँकांना बुडीत कर्ज म्हणून दाखवावी लागत असतानाच हा व्यवहार यशस्वीपणे पार पडल्याने या व्यवहाराची सध्या सगळीकडे चर्चा आहे.
Read more »
महाराष्ट्रात बारामती आणि बारामतीत पवार; लेक अन् बायकोच्या प्रचारातून वेळच मिळेनाराज्यभर निवडणुकीचं वातावरण तापलेलं असताना राज्यातले दोन दिग्गज नेते शरद पवार आणि अजित पवार बारामतीत अडकून पडलेत. बारामतीची लढत ही आता राजकीय राहिली नसून कौटुंबिक झालीय. त्यामुळेच स्वत:च्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी बारामतीत ठाण मांडण्याची वेळ दोन बड्या नेत्यांवर आलीय.
Read more »