कोकणात धडकलं गुलाबी वादळ, अजित पवारांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग

Maharashtra Politics News

कोकणात धडकलं गुलाबी वादळ, अजित पवारांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
Ajit PawarRastravadi Jansanman YatraNCP
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 55 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 53%
  • Publisher: 63%

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची जन सन्मान यात्रा आज कोकणात होती. श्रीवर्धन आणि चिपळूण इथल्या सभांमधून अजित पवारांनी तिथल्या नागरिकांशी संवाद साधला.

या दौऱ्याच्या निमित्ताने अजित पवार यांनी सुनील तटकरे यांना बळ देतानाच कोकणातील आपले हक्काचे मतदारसंघ कसे शाबूत राहतील हा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं. अजित पवार यांचं गुलाबी वादळ कोकणात धडकलंय. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि रत्नागिरीतील चिपळूण इथं राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेचे कार्यक्रम झाले. बारामतीसह अजितदादांचे सर्व उमेदवार पराभूत होत असताना कोकणात सुनील तटकरे यांनी रायगडची जागा राखली.

जनतेसाठी आणलेल्या योजना कोणत्या आणि काय कामं केली हे सांगण्यासाठी जन सन्मान यात्रा असल्याचं अजित पवार यांनी सांगितलंय. विरोधक काय बोलतात याकडे लक्ष न देता आम्ही काय कामं केली हे सांगण्यासाठी आम्ही लोकांमध्ये आलोत. चुकीचे शब्द वापरणे टाळलं पाहिजे याचा पुनरुच्चार अजित पवार यांनी केली आहे. सबका साथ सबका विकास योजना किंवा केंद्रातील अनेक योजना सर्व समाजासाठी राबवल्या. राज्यातील योजनांमध्ये देखील सर्व समाजांचा समावेश असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.

कोकणात राष्ट्रवादीचे अवघे दोनच आमदार आहेत. श्रीवर्धनमधून आदिती तटकरे आणि दुसरे चिपळूणचे शेखर नाईक. आगामी विधानसभेसाठी राष्ट्रवादीचा शिंदे गटाच्या कर्जत मतदारसंघावर डोळा आहे. परंतु शिवसेना हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडेल अशी चिन्हं दिसत नाहीत. या मतदारसंघावरून दोन्ही पक्षात सध्या जोरदार वाक्युद्ध सुरू आहे. महायुतीच्या जागावाटपात कोकणात आणखी एखादी जागा पदरात पाडून घेण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न दिसतोय.

अजित पवार यांच्या कोकण दौऱ्यामुळे सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांना बळ मिळणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हे फार लाभदायक ठरणार असल्याची चर्चा आहे.वाद विकोपाला! भाजपनं अजित पवार गटाविरोधात घेतला मोठा निर्णय...

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Ajit Pawar Rastravadi Jansanman Yatra NCP Ajit Pawar Kokan Yatra Vidhansabha Election 2024 Maharashtra Assembly Election अजित पवार विधानसभा निवडणूक

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

बेताल नेत्यांविरोधात अजित पवार आक्रमक, दादांचा भाजप-शिवसेनेच्या वाचाळवीरांना दमबेताल नेत्यांविरोधात अजित पवार आक्रमक, दादांचा भाजप-शिवसेनेच्या वाचाळवीरांना दमAjit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महायुतीच्या नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत. वादग्रस्त विधानं करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांनाच अजित पवारांनी दम भरलाय.
Read more »

विधानसभेसाठी पीएम मोदींनी फुंकलं रणशिंग, महिनाभरात मोदी तिसऱ्यांदा महाराष्ट्रातविधानसभेसाठी पीएम मोदींनी फुंकलं रणशिंग, महिनाभरात मोदी तिसऱ्यांदा महाराष्ट्रातMaharashtra Politics : विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारंवार महाराष्ट्रात येत आहेत. लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 18 पेक्षा जास्त सभा महाराष्ट्रात घेतल्या होत्या.
Read more »

संघाच्या मैदानात अजित पवार दक्ष! माजी प्रमुखांच्या समाधीस्थळावर न जाता थेट निघून गेलेसंघाच्या मैदानात अजित पवार दक्ष! माजी प्रमुखांच्या समाधीस्थळावर न जाता थेट निघून गेलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूरच्या रेशीमबागेतील डॉक्टर हेडगेवार स्मृतीभवनाला भेट दिली. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र जाणं टाळलं...
Read more »

आता बोरीवलीहून थेट कोकणात जा; आजपासून सुरू होतेय नवीन एक्स्प्रेस, 'या' शहरांत असणार थांबाआता बोरीवलीहून थेट कोकणात जा; आजपासून सुरू होतेय नवीन एक्स्प्रेस, 'या' शहरांत असणार थांबाMadgaon Bandra Express: पश्चिम रेल्वेवरुन लवकरच कोकणात जाणारी ट्रेन सुटणार आहे. आज या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.
Read more »

कन्फर्म सीट मिळणार? गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वेकडून Good Newsकन्फर्म सीट मिळणार? गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वेकडून Good NewsGanpati Special Trains: बाप्पाचे आगमन होताच चाकरमान्यांना वेध लागतात ते गावचे. यंदा कोकणात जाण्यासाठी 342 स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहेत.
Read more »

पुणेकरांसाठी Good News! कोकणात 55 मिनिटांत तर 75 मिनिटांत गोव्याला पोहोचता येणारपुणेकरांसाठी Good News! कोकणात 55 मिनिटांत तर 75 मिनिटांत गोव्याला पोहोचता येणारPune To Goa Flight Service: पुणेकरांना आता आरामदायी व जलद प्रवास करता येणार आहे. कोकणात 55 मिनिटांत तर 75 मिनिटांत गोव्याला पोहोचता येणार आहे.
Read more »



Render Time: 2025-02-24 00:41:52