Madgaon Bandra Express: पश्चिम रेल्वेवरुन लवकरच कोकणात जाणारी ट्रेन सुटणार आहे. आज या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.
Mumbai news Western Railway To Launch Bi-Weekly Express Service Piyush Goyal to flag off Madgaon Bandra Express On August 29गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी चाकरमान्यांची लगबग सुरू आहे. या काळात रेल्वेचे कन्फर्म तिकिट मिळणे खूप कठिण असते. मात्र आता रेल्वे प्रशासनाने चाकरमान्यांना मोठा दिलासा दिला आहे. 29 ऑगस्ट म्हणजेच आजपासून मडगाव-वांद्रे टर्मिनस-मडगाव ही एक्स्प्रेस धावणार आहे. बोरीवली रेल्वे स्थानकातून या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.
कोकणात जाण्यासाठी पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना सीएसएमटी किंवा एलटीटीवरुन ट्रेन पकडावी लागते. त्यामुळं बोरीवली स्थानकातून कोकणात जाण्यासाठी ट्रेन सोडण्यात याव्या, अशी मागणी होत होती. खासदार पियुष गोयल यांनीही लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केंद्रीय रेल्वेमंत्री अश्निनी वैष्णव यांच्या उपस्थितीत बोरीवलीहून वसईमार्गे कोकणात गाड्या सोडाव्यात, असं म्हटलं होतं. त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसादही दिला होता.
गणेशोत्सवाला अवघा एक आठवडा उरला आहे. त्याआधीच बोरीवलीहून वसईमार्गे गाडी सोडण्यात येणार आहे. आज 12.50 मिनिटांनी बोरीवली रेल्वे स्थानकातून ही गाडी सुटणार आहे. आठवड्यातून दोन वेळा ही गाडी धावणार आहे. प्रथमच वसई-पनवेल या कॉरीडॉरचा वापर करुन वांद्रे-टर्मिनस ते मडगाव एक्स्प्रेस सुरू करण्यात येत आहे.वांद्रे टर्मिनसवरुन ही एक्स्प्रेस सकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी सुटणार आहे. त्यानंतर ती गोव्यात मडगावमध्ये रात्री 10 वाजता पोहोचणार आहे.
Mumbai Live News Madgaon Bandra Express Bandra Madgaon Express Piyush Goyal Mumbai-Goa मुंबई-गोवा वांद्रे-मडगाव एक्स्प्रेस मुंबई ताज्या बातम्या मुंबई लाइव्ह न्यूज
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
पश्चिम रेल्वेला अपग्रेड करण्यासाठी मेगाब्लॉक, आजपासून 35 दिवस प्रवाशांचे लोकलहाल, असं असेल संपूर्ण नियोजनMumbai Local Train Update: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आजपासून पश्चिम रेल्वेचा मेगाब्लॉक सुरू होत आहे.
Read more »
Kolkata Rape Case ला नवं वळण! आरोपीने पोलीस अधिकाऱ्याबरोबर काढलेल्या सेल्फीने खळबळKolkata Doctor Rape murder Case: या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी सुरु असतानाच आता सदर प्रकरणात एक नवीन माहिती समोर आली आहे.
Read more »
अदानी ग्रुप गैरव्यवहारानंतर सेबी प्रमुख माधवी बुच पुरी यांच्याविरोधातील आणखी एक मोठं प्रकरण उघडकीसHindenburg Research : अदानी समुहावर आर्थिक अनियमिततेचा आरोप केलेल्या हिंडेनबर्गने आता थेट सेबीच्या प्रमुखांवर गंभीर आरोप केले आहेत.
Read more »
पुणेकरांसाठी Good News! कोकणात 55 मिनिटांत तर 75 मिनिटांत गोव्याला पोहोचता येणारPune To Goa Flight Service: पुणेकरांना आता आरामदायी व जलद प्रवास करता येणार आहे. कोकणात 55 मिनिटांत तर 75 मिनिटांत गोव्याला पोहोचता येणार आहे.
Read more »
Good News! नागपूर ते भिवंडी अवघ्या आठ तासांत, कसारा घाटाचा प्रवासही 8 मिनिटांत होणारMaharashtra Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्ग लवकरच प्रवाशांचा सेवेत येणार आहे. आता अंतिम टप्प्याचे काम सुरू असून सप्टेंबरअखेर काम पूर्ण होणार आहे.
Read more »
Breaking News Live Update : सुप्रीम कोर्टात उद्या शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणीBreaking News Live Update : राज्यात आचारसंहिता नेमकी कधीपासून लागू होणार याविषयीची उत्सुकता असतानाच आता अनेक राजकीय खलबतं सुरू झाली आहेत.
Read more »