CM Eknath Shinde On Raj Thackeray: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिम मतदारसंघातील तिढ्याबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. काय म्हणाले मुख्यमंत्री जाणून घ्या.
: विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. मतदानासाठी अवघे 20 दिवस उरले आहेत. राज्यात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीने उमेदवारांची यादी जाहिर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील माहिम मतदारसंघ चर्चेत आहे. माहिम मतदारसंघातून पहिल्यांदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. तर, अमित ठाकरे ंविरोधात शिंदेंच्या सेनेचे सदा सरवणकर यांचे आव्हान आहे.
माहिम विधानसभेची निवडणूक अटी-तटीची ठरणार आहे. लोकसभेत राज ठाकरेंच्या मनसेने महायुतीला पाठिंबा दिला होता. मात्र, विधानसभेत अमित ठाकरेंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळं राज्यात एकच चर्चा आहे. राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत महायुला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड महायुती करणार अशी चर्चा होती. मात्र सदा सरवणकर निवडणुक लढवण्यावर ठाम असल्याने महायुतीचे टेन्शन वाढलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. त्यावेळी त्यांना माहिम मतदारसंघाबाबतही वक्तव्य केलं आहे. आम्हाला विश्वासात न घेता मनसेकडून माहीमचा उमेदवार जाहीर करण्यात आला, असं शिंदेंनी म्हटलं आहे. आमची राज ठाकरेंसोबत विधानसभेच्या जागांबाबत बोलणी सुरू होती. असं असतांना त्यांनी उमेदवार जाहीर केलाय. माहीममध्ये आमचा विद्यमान आमदार आहे. कार्यकर्त्यांची माहीममधून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे.
Raj Thackeray Sada Sarvankar Vs Amit Thackeray Maharashtra CM Eknath Shinde CM Eknath Shinde On Amit Thackeray अमित ठाकरे एकनाथ शिंदे राज ठाकरे सदा सरवणकर विधानसभा 2024 Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Maharashtra Assembly Election महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
अमित ठाकरेंविरोधात शिवसेनेने दिला तगडा उमेदवार; माहीमची जागा अटीतटीची ठरणार, काय आहेत समीकरणं?Sada Sarvankar Vs Amit Thackeray: शिंदेच्या शिवसेना पक्षाची 45 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. यात अनेक विद्यमान आमदारांचा समावेश आहे.
Read more »
माहीममध्ये अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार का? राऊत स्पष्टचं म्हणाले, आम्ही सौदा...Sanjay Raut: माहिम मतदारसंघातून मनसेने अमित ठाकरेंना उमेदवारी दिली आहे. अमित ठाकरेंविरोधात शिवसेना उमेदवार देणार का? अशी चर्चा आहे.
Read more »
'शिंदे म्हणालेत, वाटेल त्या परिस्थितीत...'; अमित ठाकरेंसाठी माघार घेण्यावरुन सरवणकर स्पष्टच बोललेMaharashtra Assembly Election Mahim: मनसे आणि महायुतीमध्ये झालेल्या चर्चेनंतर महिममधून अमित ठाकरेंविरुद्धचा उमेदवार महायुतीकडून मागे घेतला जाईल अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या असतानाच सदा सरवणकर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
Read more »
अजित पवारांची दुसरी यादी: RR पाटलांच्या लेकाविरुद्ध दिला उमेदवार; झिशान सिद्दीकी, साना मलिकला संधीMaharashtra Assembly Election 2024 Ajit Pawar NCP 2nd Candidate List: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आधी 38 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता दुसऱ्या यादीमध्ये एकूण 7 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
Read more »
महाराष्ट्राच्या राजकारणातील हायव्होल्टेज लढत! अमित ठाकरेंविरोधात लढणार ठाकरे आणि शिंदे पक्षाचे तगडे उमेदवारAmit Thackeray : मुंबईतील माहिममध्ये तिरंगी लढत होणार आहे. मनसेचे अमित ठाकरे, शिवसेनेचे सदा सरवणकर, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महेश सावंत निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
Read more »
काँग्रेसचे उमेदवार अजून ठरले नाहीत आणि मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच, हायकमांडच्या दारात पोहोचला वादMaharashtra Assembly Election: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपांवरुन अंतिम निर्णय झाला नसताना काँग्रेसमध्ये (Congress) मात्र अंतर्गत गटबाजी पुन्हा उफाळून येताना दिसत आहे.
Read more »