Jagannath Puri Mandir Ratna Bhandar: जग्गनाथ पुरी यांच्या मंदिरातील रत्नभांडार आज खुलं करण्यात येत आहे.
46 वर्षानंतर जग्गनाथ पुरीमधील रत्नभांडार... साप करतात या खोलीचं रक्षण, आतमध्ये सोनं, चांदी अन् मौल्यवान रत्न?
ओडिशाच्या पुरी येथील श्रीजगन्नाथ मंदिरातील रथयात्रा अलीकडेच पार पडली. आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ते म्हणते रत्नभांडाराकडे. तब्बल 46 वर्षांनी ओडिशातील रत्नभांडार खोलण्यात येणार आहे. लोकसभा आणि ओडिशा विधानसभा निवडणुकांमध्ये पुरीतील रत्नभांडार हा महत्त्वाचा मुद्दा ठरला होता. भाजपने राज्यातील विधानसभा निवडणुकीच्यावेळी आश्वासनदेखील दिले होते.
ओडिशाचे कायदेमंत्री पृथ्वीराज हरिचंदन यांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नभांडाराची दुरुस्ती आणि मोजणीसाठी विविध समितीची स्थापना करण्यात आली आहे. रत्नांची मोजणी सुरू असताना रिझर्व्ह बँकेचे प्रतिनिधीदेखील उपस्थित असणार आहेत. 12 व्या दशकातील या मंदिराचा रत्नभंडार शेवटचा 1978 रोजी खुला करण्यात आला होता. त्यावेळी या खजिन्यात असलेले दागिने आणि रत्न याची मोजणी करण्यासाठी जवळपास 72 दिवस लागले होते. मात्र, यंदा तंत्रांच्या सहाय्याने मोजणीचे दिवस कमी होण्याची शक्यता आहे.
रत्न भंडार संनियंत्रण समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती विश्वनाथ रथ यांनी सांगितले की, रत्नभंडार दुपारी खोलण्यात येईल. रत्नांभंडाराचे कुलूप चावीने उघडले गेले नाही तर कुलूप तोडण्यात येणार आहे. तसंच, आतमध्ये सापांचा वावर असल्याने सर्प मित्रांना व वैद्यकीय पथक तैनात करण्यात येणार आहे. तर अन्य एका सेवकाने दिलेल्या माहितीनुसार, सर्वच जण या प्राचीन मंदिरातील रत्नभांडारमध्ये काय आहे, हे पाहण्यास उत्सुक आहेत. मात्र आत असलेल्या सापांमुळं काहीशी भीतीदेखील मनात आहे.
एका रिपोर्टनुसार, गेल्या शतकात जग्गनाथ मंदिराचे रत्न भांडार 1905,1926 आणि 1978 मध्ये उघडण्यात आले होते. तेव्हा तेथील मोल्यवान वस्तुंची यादी करण्यात आली होती. 1978 मधील एका सर्वेक्षणानुसार रत्न भंडारमध्ये 149 किलोपेक्षा जास्त सोन्याचे दागिने आणि 258 किलो चांदीची भांडी असल्याचे राज्य सरकारने सांगितले होते.12,831 वजनाचे सोन्याचे दागिने होते, ज्यात मौल्यवान रत्नही जडले होते. 22,153 जड चांदीची भांडी आणि इतर अनेक वस्तू होत्या. असं म्हणतात हे सर्व दागिने राजे-महाराजांनी देवाला दान केले होते.
Puri Jagannath Mandir Ka Tehkhana Kitni Bar Khol Ratna Bhandar In Jagannath Temple Photos Where Is Ratna Bhandar In Jagannath Temple Puri Jagannath Temple Puri Jagannath Temple Ratna Bhandar Puri-General Jagannath Temple Odisha News Odisha Jagannath Mandir Jagannath Temple Gem Store
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
IND vs SA Final : वर्ल्ड कप जिंकताच रोहितसह खेळाडूंच्या डोळ्यात पाणी, पाहा हृदय पिळवटून टाकणारे फोटोTeam India Player get emotional : टीम इंडियाचे 13 वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकला आहे. तर 11 वर्षानंतर आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला.
Read more »
Maharashtra Weather News : सोसाट्याचा वारा अन् जोरदार पाऊसधारा; राज्याच्या 'या' भागात पाऊस पुन्हा देणार दणकाMaharashtra Weather News : मागील दोन दिवसांची उसंत घेतल्यानंतर आता पावसानं पुन्हा एकदा सक्रिय होत महाराष्ट्र व्यापण्यास सुरुवात केली आहे.
Read more »
लक्झरी प्रवास, आलिशान हॉटेल्स अन्..; 12 कोटी+ पगाराशिवाय गंभीरला BCCI कडून मिळणार 'या' सुविधाPerks And Benefits To India New Head Coach Gautam Gambhir: गौतम गंभीरला केवळ कोट्यवधी रुपयांचा पगार मिळणार आहे असं नाही तर त्याला इतरही अनेक गोष्टींचा लाभ बीसीसीआयकडून दिला जाणार आहे. या गोष्टी कोणत्या ते पाहूयात...
Read more »
'कॅनडातून चोरलेलं 183 कोटींचं 400 किलो सोनं भारतात...'; 6600 सोन्याच्या विटा सापडेनात400 Kilograms Gold From Canada In India: कॅनडाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दरोडा असून एका वर्षाच्या तपासानंतर आता हे सोनं भारतात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
Read more »
फ्रिजमध्ये ठेवूनही आईस्क्रिम का वितळतं? 'या' चुका महागात पडतातअनेकदा फ्रिजमध्ये आईस्क्रिम ठेवूनही ते विरघळतं यामागे नेमकं काय चुकतं? सामान्य वाटणारी चुक तुमचं आईस्क्रिम पाण्यासारखं करतात.
Read more »
महिना सुरू होताच सोन्याच्या दरात घसरण, 24 कॅरेटचा दर जाणून घा!The Gold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा घट झाली आहे. जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोनं स्वस्त झालं आहे.
Read more »