23 year Old Cricketer Rape Case: या प्रकरणामध्ये आरोपी खेळाडूला दोषी ठरवण्यात आलं असून न्यायालयाने त्याला 8 वर्षांची शिक्षाही सुनावली आहे. आता या खेळाडूने सोशल मीडियावरुन प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्याने या प्रकरणी एक इशाराच दिला आहे.
नेपाळच्या राष्ट्रीय क्रिकेट संघातील फिरकीपटू संदीप लामिछाने याने पहिल्यांदाच त्याच्याविरोधातील बलात्कार प्रकरणावर भाष्य केलं आहे. सोशल मीडियावरुन लामिछाने व्यक्त झाला असून त्याने थेट एक इशाराच दिला आहे. जानेवारी 2024 मध्ये काठमांडू जिल्हा न्यायालयाने लामिछानेला 8 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. एका 18 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली होती. लामिछानेला 3 लाख नेपाळी रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
आपल्याविरुद्ध कट रचण्यात आल्याचा दावा या फिरकीपटूने केला असून शेवटी विजय सत्याचा होईल असा विश्वास लामिछानेने व्यक्त केला आहे. मी सर्व काही देवावर सोडून दिल्याचंही लामिछानेनं म्हटलं आहे. विशेष म्हणजे 5 जून पासून सुरु होणाऱ्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेमध्ये नेपाळचा संघ खेळणार आहे. म्हणूनच आता लामिछाने याने पुढील काही आठवड्यांमध्ये या बलात्कार प्रकरणामध्ये संघातील खेळाडू किंवा संघाशी संबंधित कर्मचाऱ्यांचा उल्लेख करत एखादा मोठा गौप्यस्फोट केल्यास संघाला त्याचा फटका बसू शकतो.
I refrained myself from long to post. I have no doubt that I am a victim of conspiracy. May God bless them all who played their roles in this conspiracy. I leave everything up to God. Time will tell the truth unless revealed. लामिछाने हा नेपाळचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. लामिछानेच्या कामगिरीच्या जोरावर नेपाळच्या संघाला उत्तम कामगिरी करत जगभरातील वेगवेगळ्या टी-20 लीगमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. लामिछानेने 210 विकेट्स घेतल्या आहेत. सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये तो 103 सामने खेळला आहे. लामिछानेने 14 एकदिवसीय आणि 18 टी-20 सामन्यांमध्ये संघाचं नेतृत्व केलं आहे. तो आयपीएलमध्ये खेळणारा पहिला नेपाळी खेळाडू ठरला. हा 23 वर्षीय क्रिकेटपटू दिल्ली कॅपिटल्सच्या संघाकडून खेळला आहे.
Cricket Player Rape Case Sandeep Lamichhane Breaks Silence
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Loksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशाराLoksabha Election 2024: तांत्रिकदृष्ट्या बीएमसीच्या हद्दीत येणाऱ्या आणि मुंबई ईशान्य मतदारसंघात मतदानाचा बजावणाऱ्या हरिओम नगरला टोलमाफी झाली नाही तर मतदान करणार नाही, असा थेट इशारा नागरिकांना सरकारला दिला आहे.
Read more »
T20 World Cup 2024 : ना भारत ना पाकिस्तान, सेमीफायनलमध्ये कोण पोहोचणार? मायकल वॉर्नची मोठी भविष्यवाणीMichael Vaughan predict semifinal teams : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये (T20 World Cup 2024) पोहोचणाऱ्या संघाची नावं मायकल वॉर्नने सांगितली आहेत.
Read more »
CSK vs SRH Live Score IPL 2024 : चेन्नईला पहिला धक्का अजिंक्य रहाणे बादCSK vs SRH Live Score, IPL 2024 : आज आयपीएल 2024 च्या 46 व्या सामन्यात चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्ससमोर कठिण आव्हान उपस्थित करणार आहे.
Read more »
प्रणिती शिंदेंची ताकद वाढणार; पोटनिवडणुकीत 1 लाख मते घेतलेल्या नेत्याचा पाठिंबाLoksabha Election: प्रणिती शिंदे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे.
Read more »
Eknath Khadse : एकनाथ खडसे यांना दाऊद- छोटा शकील गँगकडून जीवे मारण्याची धमकी; फोन आला आणि....Eknath Khadse Death Threat : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील नेते एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचं वृत्त समोर. धमकी देणाऱ्यां संशयितांमध्ये काही नावं समोर...
Read more »
Maharashtra Weather News : कोकणात पुढील 24 तासांत उष्णतेची लाट; गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहनMaharashtra Weather News : कोकणच्या समुद्रावरूनही वाहणार उष्ण वारे... पाहा हवामानात झालेले बदल तुमच्या दैनंदिन जीवनावर कसा करणार परिणाम...
Read more »