Raj Thackeray Target Uddhav Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्या कणकवली येथील प्रचारसभेतून विरोधकांवर टीका केली. यावेळी त्यांनी प्रामुख्याने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. भारतीय जनता पक्षाने तुमची अडीच वर्षे मान्य केली असती. तर तुम्ही आज बोलला नसतात.
' उद्धव ठाकरे ंना अडीच वर्षे मुख्यमंत्री पद मिळालं असत तर....' राणेंच्या प्रचारसभेत राज यांचा उद्धव ठाकरे ंना टोला
Raj Thackeray Target Uddhav Thackeray: उद्योगधंदा आला की यांचा खासदार विरोध करणार आणि आमदार सहकार्य करणार, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्या कणकवली येथील प्रचारसभेतून विरोधकांवर टीका केली. यावेळी त्यांनी प्रामुख्याने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. भारतीय जनता पक्षाने तुमची अडीच वर्षे मान्य केली असती. तर तुम्ही आज बोलला नसतात. कारण ती गोष्ट हिरावून घेतली म्हणून आग लागली. त्यावेळी सत्तेचा बोळा कोंबला असता, असा टोला राज ठाकरेंनी लगावला.
उद्योगधंदा आला की यांचा खासदार विरोध करणार आणि आमदार सहकार्य करणार, असा टोला त्यांनी लगावला. सध्या अनेक अणुउर्जा प्रकल्प भारतात आहेत. पण स्फोट झाला तर काय होईल याची भीती कोकणाला दाखवली जाते. कोकणात प्रकल्प येऊ द्यायचा नाही. यांचा खासदार नाणारला विरोध करणार आणि लोकांना भडकवणार, असा टोला त्यांनी लगावला.नाणारमध्ये जमिन घेतल्या आहेत त्या कोणी घेतल्या? यांनी नाणारला विरोध केला. मुख्यमंत्री झाल्यावर बारसूत प्रकल्प हलवायचं म्हटले. तेथे 5 हजार एकर जमिन सापडली म्हणाले. म्हणजे कोणीतरी घेऊन ठेवली होती.
पहिल्यांदा प्रकल्प थांबवायचा आणि जमिनीच्या किंमती वाढवायच्या. हे इथल्या खासदाराचे धंदे असल्याचे राज ठाकरे म्हणाले. या कोकणात चांगले प्रकल्प यावेत ही प्रत्येकाची इच्छा आहे. अख्खं जग गोव्यात जातं. कोकणात इंग्लिश स्पिकिंग कोर्स आणा, असे आवाहन त्यांनी नारायण राणेंना केले. नारायण राणे मुख्यमंत्री झाले तेव्हा मला प्रश्न पडला होता. पण त्यांनी ज्या पद्धतीने मुख्यमंत्री पद हाकलं ते भल्या भल्यांना जमलं नाही.
Raj Thackeray Kanakavali Speech Raj Thackeray Raj Thackeray On Narayan Rane Raj Thackeray On Uddhav उद्धव ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्री पद राज यांचा उद्धव ठाकरेंना टोला Lok Sabha
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
'उद्धव ठाकरेंना मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये', पवारांचं सूचक विधान; पण ते असं का म्हणाले?Sharad Pawar Direct Dig At PM Modi With Refrance To Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे आपले शत्रू नसून त्यांना काहीही मदत लागली तर त्यांच्या मदतीला धावणारी पहिली व्यक्ती आपण असू असं पंतप्रधान मोदी मुलाखतीत म्हणाल्याचा संदर्भ देत शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला.
Read more »
आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतो असा फडणवीसांनी शब्द दिला होता पण... उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा आरोपउद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर सर्वात मोठा आरोप केलाय... फडणवीसांनी शब्द फिरवल्याचा आरोप ठाकरेंनी केलाय.. त्यावरुन आता फडणवीस आणि ठाकरेंमध्ये जुंपलीय.. नेमका उद्धव ठाकरेंनी काय आरोप केलाय ज्यामुळे राज्यातलं राजकारण तापलंय.
Read more »
शरद पवारांनीच मला सांगितलं होतं की उद्धव ठाकरेंना...; एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट; 'वसईत चहाच्या टपरीवर...'LokSabha Election: शिवसेना मुंबईतील तीन जागांसह 16 जागांवर निवडणूक लढणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितलं आहे. तसंच महायुतीमध्ये (Mahayuti) जागावाटपावरुन कोणताही तिढा नसल्याचा दावा केला आहे.
Read more »
मिलिंद नार्वेकरांना शिंदेकडून उमेदवारीची ऑफर! महायुती ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीतLosabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या तारखा जशा जवळ येतायत तसे राजकीय पक्ष एकमेकांना कशाप्रकार धक्केदेतील सांगता येत नाही. आता महायुती उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का देण्याच्या तयारीत आहे. उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव आणि विश्वासू यांनाच आपल्या गटात खेचण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
Read more »
काँग्रेसचे बंडखोर हेच उद्धव ठाकरे यांचे सर्वात मोठ टेन्शन; थेट कारवाईची मागणीकाँग्रेसचे बंडखोर उद्धव ठाकरे यांच्यासाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहेत. यामुळे आता उद्धव ठाकरे थेट कारवाईची मागणी करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
Read more »
Fact check: मंच पर उद्धव ठाकरे को कांग्रेस कार्यकर्ताओं ने बोलने से नहीं रोका, वायरल दावा गलतवर्धा में रैली के दौरान कांग्रेस कार्यकर्ताओं ने पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे को बोलने नहीं दिया, यह वायरल दावा गलत है।
Read more »