SambhajiRaje Chhatrapati: विशाळगड अतिक्रमण या मुद्द्यावरुन राज्यात पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे. संभाजीराजे छत्रपती आज विशाळगडाच्या दिशेने रवाना होणार आहेत.
विशाळगड अतिक्रमण मुक्त होण्यासाठी माझ्यावर गुन्हा दाखल होत असेल तर त्याचा मला आनंद आहे, असं वक्तव्य संभाजी राजे छत्रपती यांनी केलं आहे. आज संभाजीराजे विशाळगडच्या दिशेने रवाना होणार आहेत. कोल्हापुरातील भवानी मंडप इथ असणाऱ्या जुना राजवाडामधील कुलस्वामिनी तुळजा भवानी मातेचे दर्शन घेवून संभाजीराजे विशाळगडच्या दिशेने रवाना होणार आहेत.
राज्य सरकार हे स्थानिक आमदाराच्या दबावाखाली विशाळगडला अतिक्रमण मुक्त होवू देत नाहीये, असा आरोप देखील संभाजी राजे यांनी केला आहे. विशाळगडावर एकूण 156 जणांनी अतिक्रमण केले आहे, त्यातील फक्त 6 जणांना न्यायालयाने अतिक्रमण काढायला स्थगिती दिली आहे, मग राज्य सरकार उर्वरित अतिक्रमण का काढत नाही, असा सवाल देखील संभाजी राजे यांनी उपस्थितीत केला आहे.
दरम्यान, संभाजी राजे छत्रपती यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे. प्रशासनाने जिल्ह्यात जमाव बंदी आदेश जारी केले आहेत. त्याचबरोरीने विशाळगड मार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अतिक्रमण मुक्तीसाठी संभाजी राजे यांनी संपर्ण महाराष्ट्रातील शिवभक्तांना चलो विशाळगडचा नारा दिला आहे. त्यामुळे विशाळगडाच्या दिशेने हजारो शिवभक्त येतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलनं केले जात आहे. विशाळगड अतिक्रमणावरून कोर्टात याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर संभाजीराजे यांनीदेखील हा मुद्दा उपस्थित केला आहे. आज संभाजीराजे विशाळगडाच्या दिशेने रवाना होणार आहे.महाराष्ट्र
Vishalgad Dargah विशाळगड किल्ला विशाळगड अतिक्रमण विशाळगड बातम्या विशाळगड अतिक्रमण बातम्या Sambhajiraje Chhatrapati Marathi News
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
'माझ्यावर कलम 370 नुसार गुन्हा दाखल केला पाहिजे'; पंकजा मुंडे स्वत:च असं का म्हणाल्या?लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव झाल्यानंतर त्यांचे समर्थक नैराश्यातून आत्महत्या करत आहेत. यामुळे पंकजा मुंडे यांनी आपल्याला अपराधी वाटत असल्याची उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे.
Read more »
महाराष्ट्रातील आश्चर्यकारक धबधबा, आकाशाच्या दिशने वाहते पाणी; गुरुत्वाकर्षणाचा नियम ठरतो फेलउलट्या दिशेने वाहणारा कोकणकडा पाहण्यासाठी पर्यटाकांची गर्दी पहायला मिळत आहे. उलट्या दिशेने वाहणारा धबधबा पाहून पर्यटक आश्चर्यचकित होत आहेत.
Read more »
मुंबईत तयार होणार तिसरा सी-लिंक; प्रवाशांचा तासाभराचा वेळ वाचणार, असा असेल मार्ग?Nariman Point to Colaba Sea Way: कुलाब्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मदत होणार आहे. नरीमन पॉइंट ते कुलाबा पाच मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे.
Read more »
उलट्या दिशेने वाहणारा कोकणकडा धबधबा महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण इथं गुरुत्वाकर्षणाचा नियम ठरतो फेलReverse Waterfall : उलट्या दिशेने वाहणारा कोकणकडा पाहण्यासाठी पर्यटाकांची गर्दी पहायला मिळत आहे. उलट्या दिशेने वाहणारा धबधबा पाहून पर्यटक आश्चर्यचकित होत आहेत.
Read more »
पृथ्वीची फिरण्याची गती मंदावली! 24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार, एका वर्षात 365 पेक्षा कमी दिवस येणार24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार आहेत. कधी पासून होणार हा बदल जाणून घेऊया.
Read more »
LIVE Updates: मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून नाना पटोले यांची माघारBreaking News LIVE Updates: विरोधी पक्षनेते राहुल गांधी 14 जुलैला वारीत होणार सहभागी!
Read more »