Gokhale Bridge: गेल्या 5 महिन्यांपासून जोडणीचे काम सुरू असलेला गोखले पूल व सी.डी बर्फीवाला पुल अखेर खुला करण्यात आला आहे.
सी.डी बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यामची एक मार्गिका खुली करण्यात आली आहे. आज 5 जुलै पासून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. वाहतूक व्यवस्थापनासंबंधित सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामुळं आता नागरिकांना जुहूपासून अंधेरी असा पश्चिम - पूर्व प्रवास करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. मात्र, यावेळी हलक्या वाहनांना पुलावर वाहतुकीसाठी प्रवेश, अवजड वाहनांना बंदी असणार आहे.
अंधेरी पूर्व व पश्चिम प्रवासासाठी सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाचा भाग गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपुलाच्या समांतर उंचीवर जोडल्यानंतर, वाहतूक व्यवस्थापनाची संबंधित कामे व चाचण्या पूर्ण होवून गुरूवार, दिनांक ४ जुलै २०२४ सायंकाळी ५ वाजेपासून जुहू दिशेने अंधेरी असा प्रवास करण्याचा पर्याय देणारी मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. सध्या हलक्या वाहनांनाच पुलावर प्रवेश दिला जाणार असून अवजड वाहनांना वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे.
अंधेरी परिसराला पूर्व आणि पश्चिम जोडणारा, वाहतुकीसाठी महत्वाचा दुवा असलेल्या गोपाळकृष्ण गोखले पुलाच्या उंचीशी समांतर अशा पातळीवर सी. डी. बर्फीवाला उड्डाणपूल जोडणीच्या दृष्टीने नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी दिले होते. त्यानुसार तांत्रिक सल्लागारांच्या देखरेखीखाली सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करण्यात आली आहेत. या अंतर्गत सी. डी.
या पुलावर जुहू पासून अंधेरी असा पश्चिम - पूर्व प्रवास करण्याचा पर्याय देणारी मार्गिका वाहतुकीसाठी सुरळीत आणि संरचनात्मकदृष्ट्या सुरक्षित असल्याचे 'व्हिजेटीआय' मार्फत घोषित करण्यात आले आहे. पुलाच्या मार्गिकेवरील वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने वाहतूक व्यवस्थापना संबंधित अनुषांगिक कामे व चाचण्या वाहतूक पोलिसांच्या सुचनेनुसार पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यानुसार सायंकाळी ५ वाजेपासून पश्चिम - पूर्व मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे.
Gokhale Bridge Barfiwala Flyover Gokhale Bridge Barfiwala Flyover Connector गोखले पूल बर्फीवाला फ्लायओव्हर गोखले पूल बातम्या गोखले पूल खुला
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
मुंबईत तयार होणार तिसरा सी-लिंक; प्रवाशांचा तासाभराचा वेळ वाचणार, असा असेल मार्ग?Nariman Point to Colaba Sea Way: कुलाब्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मदत होणार आहे. नरीमन पॉइंट ते कुलाबा पाच मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे.
Read more »
मुंबई वालों के लिए गुड न्यूज, 4 जुलाई से खुलेगा गोखले-बर्फीवाला ब्रिजगोखले ब्रिज से बर्फीवाला ब्रिज को जोड़ने के लिए हाइड्रोलिक जैक और ‘एमएस स्टूल पैकिंग’ का उपयोग करके अलाइनमेंट किया गया है। सी.डी.
Read more »
वेस्टर्न एक्सप्रेस हाइवे से जुहू का सफर अब सिर्फ 15 मिनट में, 5 महीने बाद जुड़ा गोखले-बर्फीवाला ब्रिजबीएमसी अधिकारियों का कहना है कि रेलवे और बीएमसी के बीच समन्वय की कमी के कारण यह गलती हुई थी, जिसे अब सुधार लिया गया है। गोखले-बर्फीवाला ब्रिज के बीच डेढ़ मीटर का गैप सामने आने के बाद बीएमसी की काफी आलोचना हुई थी। सोशल मीडिया पर मजाक उड़ाया गया था।
Read more »
मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; डेक्कन एक्स्प्रेस, इंटरसिटी 'इतके' दिवस रद्दPune-Mumbai Railway: मुंबई-पुणे- मुंबई प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी मोठी माहिती समोर येतेय. काही दिवस प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
Read more »
दक्षिण मुंबईला जोडणार ट्रान्सहार्बर लिंक; तासांचा प्रवास मिनिटांत होणार, कधी पूर्ण होतोय हा महत्त्वाचा प्रकल्प?Mumbai News: मुंबईतील वाहतुककोंडीची समस्या ही नेहमीचीच आहे. वाहतुक कोंडीच्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नवनवीन प्रकल्प आखले जात आहे.
Read more »
Mumbai News : मुंबईकरांचा प्रवास वेगवान पण, 'या' वेळेतच कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यावरून प्रवासास परवानगीMumbai News : मुंबईला जागतिक स्तरावरील शहराचा दर्जा देऊ पाहणारे अनेक प्रकल्प सध्या नागिरकांच्या सेवेत आले असून, त्यातील एक महत्वाकांक्षी प्रकल्प आता आणखी अद्ययावत पद्धतीनं नागरिकांसाठी सज्ज झाला आहे.
Read more »