Vasai Fort Leopard: वसई किल्ला परिसरात दोन आठवड्यापूर्वी बिबट्याचा वावर असल्याचे आढळले होते. आता अखेर 25 दिवसांनंतर बिबट्याला पकडण्यात यश आले आहे.
वसई किल्ल्यात शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यास अखेर वनविभागाला यश आले आहे. अखेर 25 दिवसांनंतर वनविभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला आहे. त्यामुळं भीतीच्या छायेत वावरणाऱ्या वसईकरांनी व ग्रामस्थांनी अखेर सुटकेचा श्वास घेतला आहे.
25 दिवसांपूर्वी वसई किल्ल्या परिसरात बिबट्या दिसला होता. त्यामुळं परिसरात एकच भीतीचे वातावरण पसरले होते. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने ठिकठिकाणी सीसीटीव्ही व ट्रॅप बसवले होते. मात्र, तरीही बिबट्याला पकडण्यात यश येत नव्हते. त्यामुळं नागरिकही हैराण झाले होते. रात्रीच्या वेळी नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं अवाहनदेखील करण्यात आलं होतं. तसंच, किल्ल्यातील प्रमुख रस्ताही संध्याकाळनंतर बंद करण्यात आला होता.
बिबट्याला पकडण्यासाठी वसई किल्ला परिसरात पिंजरा लावण्यात आला होता. मात्र रो-रो फेरी आणि नागरिकांची वर्दळ यामुळं बिबट्या पकडण्यास अडचणी येत होत्या. बिबट्या बाहेर पडण्याच्या वेळीसच वर्दळ असल्याने बिबट्या किल्ल्याबाहेर पडत नव्हता. त्यामुळं वनविभागाने रो-रो फेरीच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द कराव्यात अशी मागणीही केली होती. वनविभागाच्या विनंतीनुसार, शेवटच्या दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या.
वन विभागाने पूर्ण किल्ला परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. तसेच किल्ल्यातील भुयार यावर पाळत ठेवली होती. शेवटी एका भुयारात बिबट्या असल्याचे निष्पन्न होताच त्याठिकाणी सापळा लावून त्याला सुखरूप पकडण्यात यश आले आहे. वन विभागाच्या पिंजऱ्यात त्याला जेरबंद करून रात्रीच वन विभाग घेऊन गेले आहेत. आता बिबट्याची वैद्यकीय चाचणी करुन तो सुखरुप असल्याची निष्पन्न होताच त्याला जंगलात सोडून देण्यात येईल.
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, तुंगारेश्वर अभयारण्यातून हा बिबट्या वसई किल्ला परिसरात आला होता. आता बिबट्या जेरबंद करण्यात आल्यानंतर वसई किल्ल्याच्या परिसरातील किल्ला बंदर, पाचूबंदर भागातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.महाराष्ट्र
Imprisoning The Leopards Leopard In Vasai Fort Forest Department Succeeded In Imprisoning Leopar Vasai Leopard Spotted Vasai Fort Forest Department Search Operation Maharashtra Forest Department Mumbai Mumbai News
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
रस्त्यावर झाडांखाली कार पार्क करण्यांसाठी मोठी बातमी, मुंबई महापालिकेने घेतला 'हा' निर्णयMumbai : रस्त्याच्या कडेला झाडांखाली लावलेली वाहने वेळीच हलवावीत, वाहनांचे नुकसान झाल्यास महानगरपालिका जबाबदार नाही असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
Read more »
मोठी बातमी: शिल्पा शेट्टीच्या बंगल्यासह तब्बल 98 कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त!मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईडीनं ज्या मालमत्तेला अटॅच केलं आहे. त्यात शिल्पा शेट्टीता जुहूत असलेल्या बंगला देखील आहे. तिचा पती राज कुंद्रा याच्यावर ED नं मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कारवाई केली आहे. त्यांच्यावर प्रिवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंगचा दावा म्हणजेच PMLA 2002 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
Read more »
दोन देशात MDH आणि Everestच्या मसाल्यांवर बंदी; आता केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊलMDH Masala Ban: दोन देशांनी भारतीय कंपन्यांच्या मसाल्यांवर बंदी घातल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारनेही मोठी पावलं उचलली आहे.
Read more »
आताची मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कारवाई होणार? 'कचा-कचा' वक्तव्य भोवणारLoksabah 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानादरम्यान राज्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या एका वक्तव्याने अडचणीत आले आहेत. मतदारांना आमिष दाखवल्याच्या त्यांच्यावर आरोप आहे.
Read more »
आताची मोठी बातमी! काँग्रेस नेते राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची तामिळनाडूत झडतीLoksabha 2024 : देशाच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी. तामिळनाडूमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची झडती घेण्यात आली. राहुल गांधी वायनाड लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी जात असताना ही घटना घडली.
Read more »
Monsoon 2024 : बळीराजासाठी आनंदाची बातमी! यंदा वरुणराजा सरासरीहून अधिक बरसणार.. IMDची माहितीIMD monsoon 2024 predictions : जीवाची काहिली करणाऱ्या उकाड्यात हळुवार फुंर घालतेय मान्सूनच्या पहिल्यावहिल्या अधिकृत अंदाजाची ही बातमी...
Read more »