Ladki Bahin Yojna: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे.
लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. आधी या योजनेचा अर्ज भरण्यासाठी 31 ऑगस्ट होती शेवटची मुदत होती. अधिकाधिक महिलांना लाभ घेता यावा यासाठी सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. लवकरच महाराष्ट्र सरकार यासंदर्भात निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.
2.5 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील 21 ते 35 वयोगटातील महिला आणि मुलीसाठी ही योजना आणण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत त्यांना 1500 रुपये मासिक मदत मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करणं आवश्य आहे. आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक अकाऊंट डिटेल्स, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, पासपोर्ट साईज फोटो, उत्पन्नाचा दाखला, डोमिसाईल सर्टिफिकेट, जन्म दाखला, मतदान कार्ड हे कागदपत्र आवश्यक आहेत. 14 ऑगस्टपासून या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.
"राजकारणात वेगवेगळे पक्ष असू शकतात. पण लाडकी बहीण योजना बंद करा आणि या योजना सगळ्या बंद करा काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार हायकोर्टात गेले आहेत. त्यांनी याचिका दाखल केली आहे. हे अनिल वडपल्लीवार तेच आहेत जे नाना पटोले, विकास ठाकरे यांचे निवडणूक प्रमुख होते. सुनील केदार यांचे राईड हँड म्हणून ओळखले जातात. आज त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली असून या योजनांवर फास पैसा खर्च होतो सांगत बंद करण्याची मागणी केली आहे.
Maharashtra Government Ladki Bahin Scheme
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
मोठी घोषणा! मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाअंतर्गत 50 हजार युवकांना मिळणार इतके रुपयेMukhyamantri Yojnadut Karykram:लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरु असताना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय.राज्यातील तरुणांसाठी आता मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.
Read more »
लाडकी बहीण योजना कधी बंद होणार? महिलेच्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले...लाडकी बहीण योजनेवरून रंगलेला श्रेयवाद आणि रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपाच्या महिला मोर्चाच्या वतीने लाडक्या बहिणींचा लाडका देवाभाऊ कार्यक्रम सुरू झाला आहे.
Read more »
सरकार बिथरलय; त्यामुळे विधानसभेआधी प्रत्येक महिलेच्या खात्यात 1500 नव्हे तर 'इतके' रुपये देतील- सुप्रिया सुळेSupriya Sule On Ladki Bahin Yojna:लोकसभेनंतर आता विधानसभेपर्यंत हे सरकार काय काय सांगेल याचा काही भरोसा नाही. आता हे सरकार घाबरलं. त्यामुळे निवडणुका देखील आता हे पुढे ढकलत आहे. त्यांना त्यांचं अपयश दिसत असल्याने सरकार बिथरलंय.
Read more »
'...तर लाडकी बहीण योजना थांबवण्याचे आदेश देतो'; 35 हजार कोटींचा संदर्भ देत SC चा इशाराSupreme Court On Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारने आर्थसंकल्पामध्ये 35 हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
Read more »
....यांना महिला अद्याप समजल्या नाहीतच; लाडकी बहीण योजनेवर रोहिणी खडसेंची सडकून टीकाRohini Khadse : एकीकडे लाडक्या बहिणींचा सन्मान केला जातोय तर दुसरीकडे महिलांवार अत्याचाराच्या घटना काही थांबायचं नाव घेत नाही असं असताना रोहिणी खडसे यांनी राज्य सरकारवर खडसून टिका केली आहे.
Read more »
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे पैसे तेव्हाच मिळतील, जेव्हा अर्जावर असेल 'ही' नोंदLadki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाची अपडेट. अर्ज पुढे जाऊन पैसे येण्यासाठी एका गोष्टीची पूर्तता आवश्यक. जाणून घ्या महत्त्वाची माहिती.
Read more »