लोकसभा निवडणुकांचे कल जाहीर झाले आहेत. भाजपप्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र, असे असले तरी भाजपचे 400 पारचे स्वप्न भंगले आहे. त्यामुळं भाजपला आता सत्ता स्थापनेसाठी मित्रपक्षाची गरज भासणार आहे. आज एनडीए सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. मात्र, त्यापूर्वी दिल्लीत एनडीएची बैठक सुरू आहे.
या बैठकीत एकमताने नरेंद्र मोदी यांचे एनडीएच्या नेतेपदी निवड झाली आहे.: या बैठकीत एकमताने नरेंद्र मोदी यांचे एनडीएच्या नेतेपदी निवड झाली आहे. राजनाथ सिंह यांनी याबाबत प्रस्ताव मांडला असून केंद्रीय मंत्री अमित शहा आणि नितीन गडकरी यांनी याबाबत अनुमोदन केले. एनडीए सरकारचा शपथविधी 9 जून रोजी होणार असल्याचे समोर येत आहे.
संसद भवनात आज एनडीएच्या नेत्यांची बैठक होती. यावेळी घटक पक्षातील सर्व प्रमुख उपस्थित होते. नरेंद्र मोदी संसदेच्या सभागृहात येताच सर्व नेत्यांनी मोदी मोदी अशा घोषणा केल्या. तसंच, राजनाथ सिंह यांनी एनडीएच्या नेतेपदाचा प्रस्ताव मांडल्यानंतर सर्व घटक पक्षाच्या प्रमुखांनी या प्रस्तावाला पाठिंबा देत मोदींना नेतेपदी निवडले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भाषणदेखील केले.
'एनडीए आज देशभरात 22 राज्यात लोकांनी सरकार बनवून सेवा करण्याची संधी दिली. सात राज्यांमध्ये एनडीए नागरिकांची सेवा करत आहेत. आपण सर्व-धर्म समभाव मानत असून सविधानाला समर्पित आहे. आज आपल्याला त्या राज्यांतही एनडीएच्या रुपात सेवेची संधी आपल्याला मिळाली आहे. प्री पोल अलायन्स हिंदुस्थानाच्या राजकारणाच्या इतिहासात तर, युतीच्या इतिहासात प्री पोल अलायन्स कधीच इतके यशस्वी झाले नसेल इतकं एनडीए झालं आहे, 'असं मोदी यांनी म्हटलं आहे.
'एनडीएच्या अस्तित्वाला 30 वर्षे झाली आहेत. देशात यापूर्वी कधीही निवडणूकपूर्व आघाडीला एवढा मोठा विजय मिळाला नव्हता. एनडीए आघाडीची ही चौथी टर्म आहे. ही भारताची सर्वात यशस्वी युती आहे. ही मूल्ये जनतेच्या सेवेसाठी आम्हाला मिळाली आहेत. एनडीएला अटलबिहारी वाजपेयींशिवाय बाळासाहेब ठाकरे, प्रकाशसिंग बादल यांसारख्या नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. आज एनडीएचा वटवृक्ष झाला आहे. अशा परिस्थितीत आपण लोकांच्या स्वप्नांवर खरे उतरू,' असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.
एनडीएची बैठक एनडीए नेते नितीश कुमार अमित शहा भाजप काँग्रेस Narendra Modi Nda Meeting NDA Leader Nitish Kumar Amit Shah BJP Congress
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
दाभोलकर हत्या प्रकरण: कोर्टात काय युक्तवाद झाला? वकील म्हणाले, 'ही शोकांतिका आहे की..'Narendra Dabholkar Murder Case Court Proceedings: 11 वर्षांपूर्वी झालेल्या या हत्याप्रकरणामध्ये कोर्टात नेमका काय काय युक्तीवाद झाला यासंदर्भातील माहिती वकिलांनी दिली आहे.
Read more »
कोणालाही धाराबावीबाहेर पाठवणार नाही; स्थानिकांच्या घरांबाबत आणखी काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?Mumbai Dharavi Redevelopment News : घर मिळणार, दुकानही मिळणार... ; धारावीतील रहिवाशांसाठी मुख्यमंत्र्यांचं आश्वासक वक्तव्य
Read more »
Loksabha Election LIVE UPDATES: पाचव्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या...आता 20 मे मतदानाच्या दिवसाकडे लक्षपाचव्या टप्प्यातील प्रचारसभा, शक्तीप्रदर्शन, आरोप प्रत्यारोपांची राळ आता थंडावली आहे. आज दिवसभरात राजकीय वर्तुळामध्ये नेमकं काय काय घडलं, जाणून घेऊयात या लाइव्ह ब्लॉगमधून...
Read more »
'माझे पिरीएड्स सुरु आहेत असं ओरडून सांगत होते, पण..'; मलिवाल यांनी सांगितला घटनाक्रमAAP MP Swati Maliwal Shocking Claims: खासदार स्वाती मलिवाल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांच्याबरोबर नेमकं काय काय घडलं याबद्दल धक्कदायक खुलासा केला आहे.
Read more »
'माझे खासगी फोटो..', मालीवाल यांचा 'आप'वर गंभीर आरोप! म्हणाल्या, 'माझ्याबद्दल घाणेरड्या..'Swati Maliwal Assault AAP Plot: स्वाती मालीवाल यांनी एका बड्या नेत्याचा आपल्याला फोन आला होता असं सांगत आम आदमी पार्टीने आपल्याविरुद्ध काय काय कट रचला आहे यासंदर्भात धक्कादायक दावे केले आहेत.
Read more »
PM Modi Meeting: एग्जिट पोल के नतीजों के बीच पीएम मोदी का बड़ा एक्शन, बुलाई अधिकारियों की बैठकPM Modi Meeting: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने बुलाई पीएमओ अधिकारियों की बैठक, मोदी सरकार 3.0 के अगले 100 दिन पर होगी अहम चर्चा
Read more »