मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारं तानसा धरण शंभर टक्के भरलं आहे.
तानसा धरणक्षेत्रात जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे तानसा धरण ओव्हरफ्लो झालं. मुंबईची पाण्याची तहान 5 धरणं आणि 2 तलावांद्वारे भागवली जाते. या 5 धरणांपैकी तानसा हे 1 धरण आहे. ते आता ओसंडून वाहू लागलं आहे. तर इतरही धरण क्षेत्रांत चांगला पाऊस होतोय. त्यामुळे मुंबईकरांची पुढल्या वर्षभराची पाण्याची चिंता हळूहळू मिटण्याच्या मार्गावर आहे.
हे देखील वाचा - धरणात xx का? च्या अफाट यशानंतर दादांचा नवा डायलॉग; अजित पवारांवर सुषमा अंधारेंचा निशाणा मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्याने सात तलावांत 592866 दशलक्ष लिटर पाणी जमा झाले असून मुंबईला दररोज होणारा 3850 दशलक्ष लिटरचा पाणीसाठा पाहता हे पाणी डिसेंबर 2024 पर्यंत पुरणारे आहे. सात तलावांत सध्या एकूण 41 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. दरम्यान, मुंबईला पाणी पुरवठा होणाऱ्या तलावांत तुळशी तलाव सकाळी 8.30 वाजता ओसंडून वाहू लागला. त्यामुळे मुंबईसाठी चांगली बातमी मिळाली आहे.
मुंबईला मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज 3850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी 14 लाख 47 हजार 343 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. यंदा जून महिन्यात पावसाने धरण क्षेत्रात पाठ फिरवल्याने मुंबईत 5 जूनपासून 10 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. मात्र जुलै महिन्यापासून पावसाची जोरदार इनिंग सुरू झाल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. याआधी पवई तलाव 8 जुलै रोजी ओसंडून वाहू लागला.
Tansa Dam Supplies Water To Mumbai The Worries Disappear तानसा तानसा धरण
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
महाराष्ट्रातील सर्वात सुंदर नेकलेस फॉल; याच धबधब्यावर झालयं सलमान खानच्या सुपरहिट गाण्याचं शुटींगभंडारदरा धरण परिसरात असलेला रंधा धबधबा अर्थात अम्ब्रेला फॉल पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
Read more »
Video : मुसळधार पावसाचा नेत्यांना फटका; अमोल मिटकरी, अनिल पाटील यांचा थेट रेल्वे रुळांवरून पायी प्रवासMumbai Rain Video : मुंबईला मागील 24 तासांपासून मुसळधार पावसानं झोपडून काढलं असून, या पावसाचा फटका आता आमदार आणि मंत्रीमहोदयांना बसताना दिसत आहे.
Read more »
सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट; पाऊस धुमशान घालणारसातारा कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आली आहे. हवामान विभागानं मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला आहे.
Read more »
Big Breaking : OBC, SEBC आणि EWS संवर्गातील मुलींना उच्च शिक्षणात 100 टक्के फी सवलतOBC, SEBC आणि EWS संवर्गातील महाराष्ट्रातील विद्यार्थींना दिलासा देणारा निर्णय सरकारने घेतला आहे. मुलींना उच्च शिक्षणात 100 टक्के फी सवलत मिळणार आहे.
Read more »
मुंबईत मराठी लोकांना 50% घरे आरक्षित ठेवणार का? बिल्डरनं तसं न केल्यास 10 लाखांचा दंड आणि 6 महिन्याची जेल होणार का?मुंबईत बांधण्यात येणा-या नव्या इमारतींमध्ये मराठी लोकांना 50 टक्के घरे आरक्षित ठेवण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटानं केली आहे.
Read more »
चीनमुळे पृथ्वीची फिरण्याची गती मंदावली, उत्तर, दक्षिण ध्रुव एकमेकांपासून दूरावलेThree Gorges Dam : जगातील सर्वात मोठे धरण हे चीन मध्ये आहे. या धरणाचा पृथ्वीवर मोठा परिणाम झाला आहे.
Read more »