Pune News: मैत्रिणी सोबत बोलणाऱ्या तरुणाच्या अंगावर चार चाकी वाहन घालून तरुणाला केले जखमी, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
विद्येचे माहेरघर असलेले पुणे सध्या वेगळ्याच कारणांमुळं चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पोर्शे अपघात प्रकरण देशभरात चर्चेत आहे. या अपघातात दोन तरुणांनी जीव गमावला होता. तर, पोर्शे कार चालवणारा आरोपी अल्पवयीन असल्याने तसंच, मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समोर आल्यानंतर समाजातून एकच संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात पोलीस चौकशी सुरू असतानाच पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाच्या अंगावर चार चाकी कार घालून त्याला गंभीर जखमी केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मैत्रिणीसोबत बोलणाऱ्या तरुणाच्या अंगावर चार चाकी घालून त्याला गंभीर जखमी करण्यात आले आहे. या घटनेत निलेश शिंदे गंभीर जखमी झाला आहे. तर, तरुणाच्या अंगावर गाडी घालणाऱ्या सुशील काळे या तरुणाविरोधात 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच, जेव्हा अपघात घडला तेव्हा आरोपी काळे याने मद्यपान केले असल्याचे समोर आले आहे. पिंपरी चिंचवड परिसरात काल मध्यरात्री एकच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. यशवंत नगर येथील शंकर चौधरी चौक परिसरातील ही घटना आहे.
दरम्यान, जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश शिंदे आणि सुशील काळे यांचे एकाच तरुणीवर प्रेम होते. निलेशसोबत वाद झाल्यानंतर तिचे सुशीलसोबत प्रेमसंबंध होते. मध्यरात्री निलेश त्याच्या एक्स प्रेयसीला भेटायला आला होता. तरुणीने याची माहिती सुशील काळे याला दिली होती. निलेश तिच्याशी बोलत उभा असताना चार चाकी कारने सुशीलने कार त्यांच्या अंगावर घातली. यात निलेश गंभीर जखमी झाला आहे.
दरम्यान, निलेशच्या अंगावर कार घालून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी सुशील काळे याला अटक केली आहे. तसंच, या प्रकरणी त्यांच्यावर गन्हा दाखल करण्यात आला आहे.महाराष्ट्र
Love Affair News In Marathi Pune News Today पुणे ताज्या बातम्या पुणे आजच्या बातम्या पुणे बातम्या पुणे कार अपघात Pune Car Accident
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
'बच्चन कुटुंबाचे संस्कार', आराध्याची कृती पाहताना नेटकऱ्यांनी केली स्तुतीऐश्वर्या सध्या तिच्या हाताला झालेल्या दुखापतीला सांभाळत या फिल्म फेस्टिवलमध्ये आली आहे. तिच्या हाताला असलेलं फ्रॅक्चर पाहून तिच्या चाहत्यांना देखील तिची चिंता वाटत होती.
Read more »
मुलगा गावठी पिस्तुलाशी खेळत असतानाच गोळी सुटली अन् थेट....; आईने थेट पोलीस स्टेशन गाठलंआपल्या मुलीवर गोळीबार केल्याप्रकरणी एका महिलेने आपल्याच 10 वर्षाच्या मुलाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Read more »
उर्फी जावेदच्या फॅशननं जान्हवी कपूर Inspired! सोशल मीडियावर म्हणाली...उर्फीनं फॅशनमध्ये अनेक सेलिब्रिटीजला मागे टाकलं असं नेटकरी बोलताना दिसतात. एकीकडे जिथे उर्फी तिच्या अतरंगी कपड्यांमुळे ट्रोल होते तर दुसरीकडे सेलिब्रिटी तिच्या फॅशनची स्तुती करताना दिसतात. काही दिवसांपूर्वी समांथानं उर्फीच्या एका ड्रेसचा फोटो शेअर करत तिच्या फॅशन सेन्सची स्तुती केली होती.
Read more »
'मी गरोदर नाही, तर माझ्या गर्भाशयात...'; Timepass 3 फेम अभिनेत्रीकडून गंभीर आजाराचा खुलासाकृतिकानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे.
Read more »
धक्कादायक! सतत डोळे चोळण्याच्या सवयीमुळे 21 वर्षीय तरुणाने दृष्टी गमावली; थेट रुग्णालयात..Continuous Eye Rubbing Lost Vision: या तरुणाने सोशल मीडियावरुन त्याच्याबरोबर घडलेल्या या विचित्र प्रकाराची माहिती दिली आहे. त्याने नेमका हा सारा प्रकार कसा घडला आणि काय काय झालं हे व्हिडीओत सांगितलं आहे.
Read more »
'लहान मुलं खूप आगाऊ असतात पण...', सुकन्या मोने यांनी सांगितला मायरासोबत काम करण्याचा अनुभवSukanya Mone on Myra Vaikul and her Parents Trolling : तिच्या अभिनयानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. तर दुसरीकडे काही नेटकरी तिच्या बोलण्यावरून तिला ट्रोल करताना दिसतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मायरानं केलेल्या वक्तव्यानं तिच्या वयाला शोभत नाही..तिच्या बोलण्यात अॅटिट्यूड दिसून येतो...
Read more »