सासू सासऱ्यांनी का केला जावयाचा खून, मुलीच्या संसाराबाबत काय केला विचार?
Updated: Sep 27, 2024, 11:32 AM ISTधावत्या एसटीमध्येच जावयाचा सासू आणि सासर्याने खून केल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. खुन केल्यानंतर जावायचा मृतदेह सासू आणि सासऱ्याने मध्यवर्ती बस स्थानकमध्ये टाकला होता. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आल आहे. जावाई दारू पिऊन मुलीला प्रचंड त्रास देत असल्याच्या रागातून सासू आणि सासऱ्याने हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे. संदीप शिरगावे असे मृत जावयाचे नाव असून हनुमंत काळे आणि गौरवा काळे असं सासू-सासर्यांचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 26 सप्टेंबर रोजी सकाळी कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा खून झाल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाली. त्यानंतर शाहूपुरी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी घेऊन पाहणी केली. यावेळी बेवारस स्थितीत असलेल्या व्यक्तीचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गळा आवळून ठार मारल्याची प्राथमिक माहिती समोर आली. मृत व्यक्तीची तपासणी केली असता त्याचेजवळील आसलेल्या कागदपत्रावरून त्याचे नांव संदिप रामगोंडा शिरगांवे असलेचे समजले.
दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व शाहुपूरी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांनी खुनाच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करण्यासाठी पथक नेमून तपासासाठी रवाना केले. दरम्यान मृतदेह मिळालेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि आजूबाजूला चौकशी केले असता रात्रीच्या सुमारास अनोळखी एक महिला व एक पुरुष असे दोन व्यक्तीनी मृतदेह एस.टी. स्टॅन्ड परीसरात उचलून आणून ठेवले असलेचे निदर्शनास आले.
दरम्यान तीन दिवसांपासून संदिप शिरगांवे हा गडहिंग्लज येथे जावून दारु पिऊन पत्नी, मुलास त्रास देवून मारहाण करीत होता. म्हणून संशयित आरोपी आसलेल्या सासू-सासर्यांनी त्याला समजावून सांगितलं, तो ऐकत नसल्याने त्याला रात्री उशिरा कोल्हापुरात सोडण्यासाठी सासू-सासरे बिनावाहक बस मधून येतं होते. यावेळी पुन्हा एकदा बसमध्येच जावई आणि सासू-सासर्यांमध्ये जोरदार भांडण झालं. त्यावेळी सासरा हनमंतआप्पा यल्लाप्पा काळे आणि सासू गौरा हनमंतआप्पा काळे यांनी संदीपचा दोरीने गळा आवळून खून केला.
Kolhapur News In Laws Killed Son ST Bus Stand ST Bus Depo Kolhapur ST Stand
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
बलात्काराला विरोध केल्याने मुख्याध्यापकाने 6 वर्षाच्या मुलीची केली हत्या, मृतदेह कारमध्ये लॉक केला अन् 5 वाजताच...मुख्याध्यापक गोविंद नट्टने (Principal Govind Natt) मुलीचा मृतदेह दिवसभर कारमध्ये ठेवला होता.
Read more »
भोस्ते घाटातील स्वप्नातल्या मृतदेहाचं गूढ: सुरत, PUBG, गर्ल्डफ्रेंड, गोवा कनेक्शन?Mysterious Dead Body Near Khed Bhoste Ghat: खेड रेल्वे स्थानकाजवळ मृतदेह असल्याचं स्वप्नात आल्याचा दावा तरुणाने केल्यानंतर खरोखरच जंगलामध्ये मृतदेह सापडल्याने गूढ वाढलं.
Read more »
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचं वयाच्या 26 व्या वर्षी निधन; अनेक दिवसांपासून होता बेपत्ता, कुटूंबावर दुःखाचा डोंगरअनेक दिवसांपासून बेपत्ता झालेल्या अभिनेत्याचा सापडला मृतदेह, मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट
Read more »
कोलकाता बलात्कार पीडितेच्या वडिलांचा सर्वात मोठा खुलासा; 'पोलिसांनी तोंड दाबण्यासाठी पैसे...'कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या वडिलांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. या प्रकरणावरुन त्यांना पोलिंसाकडून दबाव केला जात असल्याचा आरोप केला आहे.
Read more »
'तू जागा आहेस का?', रोहित शर्माचा रात्री 2.30 वाजता मेसेज, काय झालं विचारलं तर पेपर दाखवत म्हणाला 'हे बघ...', खेळाडूचा खुलासाभारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटर पियूष चावलाने रोहित शर्माबदद्दल एक खुलासा केला आहे. त्याने याआधी न सांगितलेला एक किस्सा उघड केला आहे.
Read more »
अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं दहन नाही तर पुरणार; वकिलांनी दिली माहिती, म्हणाले, 'भविष्यात काही...'Akshay Shinde Death: अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं दहन करणार नाही तर त्याचा मृतदेह पुरणार आहे अशी माहिती अक्षय शिंदेच्या वडिलांच्या वकिलांनी दिली आहे.
Read more »