महाराष्ट्रातील धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी अशी ओळख असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे.
तुकाराम मुंढे यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदाची जबाबदारी होती. आता त्यांच्याकडे असंघटित कामगार विभागाचे विकास आयुक्त म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी यासंबंधीच पत्र काढलं आहे. तुकाराम मुंढे यांच्या जागी राजेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बदलीसंदर्भातील अधिकृत पत्रात सांगण्यात आलं आहे की, शासनाने आपली बदली केली असून आपली नियुक्ती विकास आयुक्त , मुंबई या रिक्त पदावर केली आहे. तरी आपण आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार राजेश कुमार, भाप्रसे यांच्याकडून सोपवून नवीन पदाचा कार्यभार त्वरीत स्विकारावा.तुकराम मुंढे हे शिस्तप्रिय अधिकारी असून आपल्या कडक शिस्तीसाठी ओळखले जातात. ज्या विभागात त्यांची बदली होती तेथील कर्मचाऱ्यांना नेहमीच त्यांच्या शिस्तीचा धाक असतो.
तुकाराम मुंढे पहिल्या प्रयत्नात मेन्समध्ये फेल झाले. त्यांना 865 मार्क मिळाले. जे मेरिटपेक्षा फार कमी होते. यानंतर तुकाराम मुंढे यांनी दुसऱ्यांदा प्रयत्न केला. त्यात ते प्रिलिअम पास झाले पण मेन्समध्ये पुन्हा अपयश आलं. म्हणून तुकाराम मुंढे यांनी परत तिसरा प्रयत्न केला. यावेळी तुकाराम मुंढे यांनी प्रिलियम आणि मेन्स दोन्ही परीक्षा उत्तीर्ण करत मुलाखतीपर्यंत पोहोचले. मुलाखत झाली पण अंतिम निवड झाली नाही. 2003 साली एमपीएससीचा अंतिम निकाल आला. तुकाराम मुंढे यांच्या यांचं क्लास 2 मध्ये सिलेक्शन झालं.
2004 साली तुकाराम मुंढे प्रिलिअम पास झाले, मेन्स पास होणार याची खात्री असल्याने त्यांनी मुलाखतीची तयारी सुरु केली. 2005 च्या एप्रिल-मे महिन्यात तुकाराम मुंढे यांची मुलाखत पार पडली. 11 मे 2005 रोजी अंतिम निकाल आला त्यावेळी तुकाराम मुंढे यांची भारतातील रँक 20 होती.'शेअर बाजारात 30 लाख कोटींचा तोटा पण एकीलाच 521 कोटी न...
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ; 1 आणि 10 ग्रॅमचा भाव जाणून घ्याGold Price Today in Maharashtra: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यामुळं ग्राहकांच्या चिंतेत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.
Read more »
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 10 जूनपर्यंत सेवेत, कसा असेल मार्ग?Coastal road: कोस्टल रोड प्रकल्प आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता कोस्टल रोडचा दुसरा टप्पादेखील सेवेत येणार आहे.
Read more »
'...तर विधानसभेत 288 उमेदवार देणार'; मराठा आरक्षण, सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशाराMaratha aarakshan : लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा जोर धरतोय. पोलिसांची परवानगी नसतानाही मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत.
Read more »
'चंद्राबाबू, नितीश कुमारांनी अमित शाह यांचा राजीनामा मागावा'; संजय राऊतांचा संतप्त सूरSanjay Raut on Amit Shah and increasing terror attacks in country : रियासी, मणिपूर आणि त्यामागोमाग डोडा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर आता देशात पुन्हा एकदा दहशतवादाच्या वाढच्या कारवायांनी चिंता वाढवली आहे....
Read more »
आज 96 हजारांच्या जवळपास पोहोचली चांदी; तर, 10 ग्रॅम सोन्याचा दर...; वाचा सोन्या-चांदीचे भावGold Price Today On 29th May: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळाली आहे. चांदीला आज पुन्हा झळाळी मिळाली आहे.
Read more »
सोने-चांदीच्या दरात पुन्हा उसळी, किमतींमुळे ग्राहकांना फुटला घाम, पाहा प्रतितोळा किंमतलोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना आता सोने-चांदीच्या दराने पुन्हा उसळी मारल्याचे पाहायला मिळत आहे.
Read more »