Mumbai Coastal Road: कोस्टल रोडचा एक महत्त्वाचा टप्पा आजपासून खुला होत आहे. कुठून ते कुठपर्यंत हा मार्ग असणार आहे, हे जाणून घेऊया.
महापालिकेचा महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणजे सागरी किनारा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. त्याचबरोबर आता कोस्टल रोडचा पुढचा टप्पादेखील लवकरच खुला करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. कोस्टल रोडचे काम 90 टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाले आहे. या रस्त्याचे दोन्ही बोगदेदेखील नागरिकांना वाहतुकीसाठी खुले केले आहेत. त्यानंतर आता वांद्रे-वरळी सी-लिंक ते कोस्टल रोड असा पुढचा महत्त्वाचा टप्पा पालिका लवकरच सुरू करणार आहे. 11 जुलै रोजी कोस्टल रोडचा हाजी अली ते वरळी हा टप्पा सुरू होत आहे.
कोस्टल रोडच्या उत्तर मार्गिकेचा आणखी एक भाग काही प्रमाणात खुला केला जाणार आहे. वांद्रे वरळी सी-लिंकच्या आधी असणारा हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंतचा साडेतीन किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. या आधी मरीन ड्राईव्ह ते हाजी अलीपर्यंतची मार्गिका खुली करण्यात आली होती. ही मार्गिका खुली करण्यात आल्यानंतर मरीन ड्राइव्ह ते वरळीपर्यंतचा थेट प्रवास करता येणार आहे.
कोस्टल रोडची कामे टप्प्या टप्प्याने पूर्ण केली जात आहेत. 10.58 किमीचा कोस्टल रोड आणि 4.5 लांबीचा वांद्रे-वरळी सी लिंक यांना जोडणाऱ्या गर्डरचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळं वांद्रे ते दक्षिण मुंबई असा पाऊण तासांचा प्रवास अवघ्या 15 मिनिटांत करणे शक्य होणार आहे. या प्रकल्पामुळं 70 टक्के प्रवासाचा वेळ वाचणार आहे. त्याचबरोबर 34 टक्के इंधनाचा बचत देखील होणार आहे. कोस्टल रोडमुळं पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कमी होण्यासही मदत होणार आहे.
दरम्यान, बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोस्टल रोडच्या उत्तरवाहिनेच्या पाहणीचे काम केले. हाजी अली ते वरळी सी फेस किनारी रस्ता मार्गाच्या टप्प्याची साडेतीन किलोमीटर रस्त्याची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. आजपासून सकाळी सातपासून हा रस्ता खुला करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तर, वरळी ते सी लिंक हा जोडमार्ग पुढच्या तीन आठवड्यात पूर्ण होणार, अशीही माहिती समोर येतेय. या मार्गामुळं वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार असून मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे.
Coastal Road Coastal Road Timings Coastal Road Timings On Weekends Is Coastal Road Open On Sunday In Mumbai कोस्टल रोड वेळा कोस्टल रोड मार्ग कुठपर्यंत कोस्टल रोड कधी खुला होणार
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे ते जुहूपर्यंतचा प्रवास अवघ्या 15 मिनिटांत; गोखले-बर्फीवाला पूल खुला, पण...Gokhale Bridge: गेल्या 5 महिन्यांपासून जोडणीचे काम सुरू असलेला गोखले पूल व सी.डी बर्फीवाला पुल अखेर खुला करण्यात आला आहे.
Read more »
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना 'या' तारखेपासून करता येणार आरक्षण; रेल्वे, एसटीचं 'असं' करा बुकिंगKonkan Ganeshotsav 2024 : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आरक्षण उद्यापासून सुरुवात.
Read more »
बीसीसीआयने 125 कोटी दिलेत, पण या चार खेळाडूंना रुपया पण मिळणार नाही?BCCI Prize Money Distribution : टीम इंडियाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरल्याचा पराक्रम केल्याने बीसीसीआयने खुश होवून तब्बल 125 कोटींचं बक्षिस जाहीर केलंय.
Read more »
मुंबईकरांनो आता तुमची लोकल वेळेतच स्थानकात येणार, मध्य रेल्वेने केले मोठे बदल!Mumbai Local Train Update: गेल्या काही दिवसांपासून मुंबई लोकलचे वेळापत्रक बिघडले आहे. मात्र लवकरच आता ट्रेनचे वेळापत्रक पुन्हा पुर्ववत होणार आहे.
Read more »
दक्षिण मुंबईला जोडणार ट्रान्सहार्बर लिंक; तासांचा प्रवास मिनिटांत होणार, कधी पूर्ण होतोय हा महत्त्वाचा प्रकल्प?Mumbai News: मुंबईतील वाहतुककोंडीची समस्या ही नेहमीचीच आहे. वाहतुक कोंडीच्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नवनवीन प्रकल्प आखले जात आहे.
Read more »
मोबाईलवरुन कसा घेता येईल लाडकी बहिण योजनेचा लाभ; अॅप बद्दल जाणून घ्या A टू Zमुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आता मोबाईलवरुन देखील अर्ज करता येणार आहे. जाणून घ्या प्रोसेस.
Read more »