Ashadhi ekadashi 2024 : आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाच पंढरपुरात आतापासूनच राज्यातून आणि देशातूनही भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.
pandharpur stampede like situation before Ashadhi ekadashi 2024 video आषाढी एकादशी च्या वारीनिमित्त काही संतांच्या पालख्यांनी प्रस्थान ठेवलं आहे, तर पुढील तीन ते चार दिवसांमध्ये मानाच्या आणि मोठ्या पालख्या पंढरपूर च्या दिशेनं प्रस्थान ठेवणार आहेत. आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेली असल्यामुळं अनेक भाविक पंढरपुरात येऊन विठ्ठलाचं दर्शन घेताना दिसत आहेत. इथं भाविकांची झालेली गर्दी पाहता एका मोठ्या संकटानं नुकतीच देवाच्या दारी चाहूल दिली आणि अनेकांनाच धडकी भरली.
बुधवारी पहाटेपासूनच विठ्ठल- रखुमाईच्या दर्शनासाठी मोठ्या भाविक दर्शन रांगेमध्ये उभे होते. सकाळच्या सुमारास या दर्शन रांगेमध्ये काही ठिकाणी बॅरिगेटिंग नसल्यामुळे भाविकांची गर्दी झाली आणि पुढे काही कळायच्या आतच रांगेच चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. मंदिर समितीचे एकही सुरक्षा रक्षक रांग लावण्यासाठी किंवा ती नियंत्रित करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. त्यामुळे या ठिकाणी गर्दीच्या या वातावरणात भाविकांमध्ये गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं. एकीकडे मंदिर समिती नव्या नव्या घोषणा करत असताना प्रत्यक्षात मात्र परिस्थिती मात्र वेगळीच असल्याचे या प्रसंगामुळं समोर आलं आणि मंदिर प्रशासनाला ख़डबडून जाग आली.बातमीLifestyle
Pandharpur To Mumbai Train Pandharpur Darshan Pandharpur Vithoba Pandharpur St Mumbai To Pandharpur St Mumbai To Pandharpur Train Pandharpur Vittha Mandir Darshan News Ashadhi Ekadashi Ashadhi Ekadashi 2024 Ashadhi Ekadashi 2024 Date Ashadhi Ekadashi 2024 News Ashadhi Ekadashi 2024 Status Ashadhi Ekadashi 2024 Photos आषाढी एकादशी मराठी बातम्या बातम्या पंढरपूर आषाढी मुंबई एसटी पंढरपूर गर्दी पंढरपूर भक्त निवास
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
अरविंद केजरीवाल जेलमध्येच राहणार; दिल्ली हायकोर्टाचा धक्का, जामिनावरील स्थगिती कायममद्य घोटाळा प्रकरणी अटकेत असणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावरील स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे.
Read more »
विधानसभा निवडणुकीत संधी देणार; अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना शरद पवार गटात प्रवेशासाठी ऑफर?येत्या काळात राष्ट्रवादीत मोठा भूकंप येणार आहे. अजित पवारांसोबत गेलेले सर्व आमदार पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Read more »
लैंगिक शोषण प्रकरणात सूरज रेवण्णाला अटक! कार्यकर्ता म्हणाला, 'त्याने माझे कपडे काढून..'Suraj Revanna Arrested: पोलिसांनी शनिवारी वेगवेगळ्या गुन्ह्याअंतर्गत तक्रारी दाखल करुन घेत सूरज रेवण्णाला ताब्यात घेतल्यानंतर रविवारी या प्रकरणामध्ये मोठा खुलासा समोर आला आहे.
Read more »
मोठी बातमी! दहशतवाद्यांची मदत करणाऱ्यांना मृत्यूदंड; जम्मू काश्मीरमध्ये लागू होणार 'हा' कायदाJammu Kashmmir News : जम्मू काश्मीरमधील परिस्थितीमध्ये निर्माण झालेला तणाव पाहता यंत्रणा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत. जाणून घ्या हा कायदा लागू झाल्यान नेमकं काय बदलणार?
Read more »
Maharashtra Weather News : चिंता वाढली! मान्सून जितक्या वेगानं आता तितक्याच वेगानं....Maharashtra Weather News : पावसाचा यलो अलर्ट लागू करण्यात आलाय खरा, पण हा मान्सून आहे तरी कुठं? पावसाचं घटललें प्रमाण पाहून अनेकांच्या चिंतेत भर
Read more »
पंतप्रधानपदी विराजमान होताच मोदींचा पहिला मोठा निर्णय; शेतकऱ्यांना थेट फायदाPM Modi First Decision : देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर मोदी नेमका कोणता निर्णय घेणार याचीच उत्सुकता अनेकांना लागून राहिली होती; आणि अखेर पंतप्रधान मोदींनी मोठा निर्णय घेतलाच...
Read more »