T20 World Cup: रोहित शर्माने केला होता हार्दिकच्या नावाला विरोध, आगरकर म्हणाला 'संघात इतके खेळाडू...'

T20 World Cup News

T20 World Cup: रोहित शर्माने केला होता हार्दिकच्या नावाला विरोध, आगरकर म्हणाला 'संघात इतके खेळाडू...'
Rohit SharmaHardik PandyaAjit Agarkar
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 89 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 53%
  • Publisher: 63%

T20 World Cup: आगामी टी-20 वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व करणार आहे. यावेळी हार्दिक पांड्या उप-कर्णधार म्हणून खेळताना दिसेल.

T20 World Cup : रोहित शर्माने केला होता हार्दिकच्या नावाला विरोध, आगरकर म्हणाला 'संघात इतके खेळाडू...'

T20 World Cup: आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा प्रवास अनपेक्षितपणे संपला आहे. मुंबई इंडियन्स आता प्लेऑफमध्ये पोहोचणार नाही हे स्पष्ट झालं आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स संघ आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला आहे. आयपीएल स्पर्धा सुरु होण्याच्या आधीपासूनच मुंबई इंडियन्स कर्णधारपदामुळे वादात अडकला होता. रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याला कर्णधार केल्याने चाहते नाराज असताना, मुंबई इंडियन्स संघातही सर्व काही आलबेल नव्हतं.

मुंबई इंडियन्स संघात कर्णधार बदलल्यानंतर वेळेसह सर्व काही सुरळीत होईल असं बोललं जात होतं. मात्र तसं होऊ शकलं नाही आणि संघाच्या कामिगिरीवर परिणाम झाला. कर्णधार हार्दिक पांड्याची वैयक्तिक कामगिरीही चांगली होऊ शकली नाही. त्यामुळे जेव्हा त्याला टी-20 वर्ल्डकप संघात स्थान मिळालं तेव्हा अनेकांनी आश्चर्य व्यक्त कलें. दैनिक जागरणने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकरचा हार्दिक पांड्याच्या निवडीला विरोध होता.

आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्याने 13 सामन्यांमध्ये 144.93 च्या स्ट्राइक रेटने 200 धावा केल्या आहेत. तसंच 13 सामन्यांमध्ये 10.59 च्या सरासरीने 11 विकेट्स घेतल्या आहेत. स्पर्धेच्या उत्तरार्धात त्याची सर्वाधिक चांगली गोलंदाजी केली.रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, हार्दिक पांड्याची टी-20 वर्ल्डकपमध्ये निवड करण्यासाठी दबाव होता. तसंच या वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा टी-20 मधून निवृत्ती जाहीर करु शकतो.

T20 विश्वचषक संघ निवडीनंतर रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेतली होती. तेव्हा त्यांना हार्दिक पांड्या फॉर्ममध्ये नसतानाही त्याची निवड का केली? अशी विचारणा करण्यात आली होती. यावर अजित आगरकरने निवड समितीकडे हार्दिकच्या जागी दुसरा कोणताही पर्याय नव्हता असं सांगत निवडीमागील कारणाचा उलगडा केला होता. सध्या जे गुणी खेळाडू आहेत त्यांच्यात हार्दिकची जागा घेऊ शकेल असा कोणीही खेळाडू नाही असं अजित आगरकरने सांगितलं होतं.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Rohit Sharma Hardik Pandya Ajit Agarkar T20 World Cup Team

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

'तुमचा फॉर्म लक्षात ठेवणार नाही, पण...', T-20 वर्ल्डकपआधी युवराज सिंगने रोहित, विराटला दिला इशारा'तुमचा फॉर्म लक्षात ठेवणार नाही, पण...', T-20 वर्ल्डकपआधी युवराज सिंगने रोहित, विराटला दिला इशाराT20 World Cup: युवराज सिंगने (Yuvraj Singh) आगमी टी-20 वर्ल्डकपनंतर (T20 World Cup) विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्माने (Rohit Sharma) निवृत्तीचा विचार करावा असा सल्ला दिला आहे.
Read more »

Rohit Sharma: रोहित शर्मा थकला असून...; वर्ल्डकपपूर्वी भारताच्या कर्णधाराविषयी 'असं' का म्हणाला माजी खेळाडू?Rohit Sharma: रोहित शर्मा थकला असून...; वर्ल्डकपपूर्वी भारताच्या कर्णधाराविषयी 'असं' का म्हणाला माजी खेळाडू?Rohit Sharma: गेल्या काही सामन्यांमध्ये त्याला फारसा चांगला खेळ करता आलेला नाही. अशातच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधारने मोठं विधान केलं आहे.
Read more »

Kl Rahul को क्यों नहीं मिला T20 World Cup 2024 Squad में मौका, क्या हैं Rahul और Pant के आंकड़े!T20 World Cup 2024: टी-20 वर्ल्ड कप 2024 (t20 world cup) के लिए टीम इंडिया (team india) ने अपने स्क्वाड का ऐलान कर दिया है.
Read more »

T20 World Cup: टी20 विश्व कप में टीम इंडिया के सामने पैदा हो सकती हैं ये 4 बड़ी परेशानियां, सवाल मुश्किल हैंT20 World Cup: टी20 विश्व कप में टीम इंडिया के सामने पैदा हो सकती हैं ये 4 बड़ी परेशानियां, सवाल मुश्किल हैंT20 World Cup 2024: अच्छी टीम होने के पास भी रोहित के लिए सुलझाने के लिए कई बड़े सवाल अभी से ही हैं
Read more »

Shreyas Iyer: आम्ही विचारंही केला नव्हता की...; पराभवानंतर असं का म्हणाला श्रेयस अय्यर?Shreyas Iyer: आम्ही विचारंही केला नव्हता की...; पराभवानंतर असं का म्हणाला श्रेयस अय्यर?Shreyas Iyer : या सामन्यात जोस बटलरच्या झंझावाती शतकाने राजस्थानला विजय मिळवून दिला. त्याच्या या खेळीनंतर श्रेयस अय्यरने देखील त्याचं कौतुक केलं.
Read more »

T20 World Cup 2024: মহাযুদ্ধের কথা ভেবে পাক বিশ্বকাপ জয়ীকে বিশেষ দায়িত্ব বাংলাদেশেরT20 World Cup 2024: মহাযুদ্ধের কথা ভেবে পাক বিশ্বকাপ জয়ীকে বিশেষ দায়িত্ব বাংলাদেশেরBangladesh rope in Mushtaq Ahmed as spin bowling coach ahead of T20 World Cup 2024
Read more »



Render Time: 2025-02-24 08:52:59