SRH vs RCB, IPL 2024 : बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर षटकारांचा पाऊस पहायला मिळाला. या सामन्यात हैदराबादने आरसीबीवर विजय मिळवत 2 अंक खात्यात जमा केले आहेत.
SRH vs RCB : हैदराबादच्या फलंदाजांकडून आरसीबीचा खात्मा, ऐतिहासिक सामन्यात सनरायझर्सचा 25 धावांनी विजय
बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना खेळवला गेला. या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा स्कोर उभा केला. हैदराबादने 287 धावा उभ्या केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना आरसीबीने 262 धावा केल्या अन् हैदराबादने 25 धावांनी सामना खिशात घातला. हैदराबादकडूनने खणखणीत शतक ठोकलं तर हेन्री क्लासेनने 67 धावांची वादळी खेळी केली. हैदराबादने एका इनिंगमधील 22 सर्वाधिक षटकार खेचले.
आरसीबीला डोंगराएवढं आव्हान पार करायचं होतं. सलामीला विराट कोहली अन् फाफ डुप्लेसिस यांनी दमदार सुरूवात करून दिली. पहिल्या 6 ओव्हरमध्ये आरसीबीने 60 चा टप्पा पार केला. विराट कोहली 42 धावा करून बाद झाला अन् दुसऱ्या बाजूने विकेट्स पडत गेल्या. पुढच्या 45 धावांवर आरसीबीची अर्धी टीम तंबूत परतली होती. मात्र, कॅप्टन फाफने 62 धावांची आक्रमक आणि झुंजार खेळी केली. तर दुसरीकडे दिनेश कार्तिकने पहिल्या बॉलपासून तिसऱ्या घेरवर बॅटिंग सुरू केली. दिनेशने 35 बॉलमध्ये 83 धावा चोपल्या.
आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि हैदराबादला प्रथम फलंदाजीचे आव्हान दिलं होतं. सनरायजर्स हैदराबादकडून फलंदाज अभिषेक शर्माने 38, ट्रेव्हिस हेडने 102, हेन्री क्लासेनने 67, एडन मार्करमने 32, अब्दुल समदने 37 धावा केल्या. ट्रेव्हिस हेडने 9 चौकार आणि 8 षटकारांची आतिषबाजी करून केवळ 39 बॉलमध्ये शतक पूर्ण केले. ट्रेव्हिस हेडचं हे शतक आयपीएलच्या इतिहासातील चौथं सर्वात वेगवान वेगवान शतक ठरलं. तर हैदराबादने आयपीएलच्या इतिहासात सर्वात मोठा स्कोर बनवला.
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स , ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्करम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन , अब्दुल समद, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट आणि टी नटराजन.स्पोर्ट्समहाराष्ट्रात बारामती आणि बारामतीत पवार; लेक अन् बायकोच्या प...
IPL 2024 SRH Beat RCB Travis Head Dinesh Karthik Faf Du Plessis Virat Kohli Heinrich Klaasen Abdul Samad Aiden Markram M Chinnaswamy Stadium Bengaluru Indian Premier League 2024 Latest Marathi News
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
RCB vs SRH : बैंगलुरु ने टॉस जीतकर चुनी गेंदबाजी, ऐसी है दोनों टीमों की प्लेइंग 11RCB vs SRH : बैंगलुरु ने टॉस जीतकर चुनी गेंदबाजी, ऐसी है दोनों टीमों की प्लेइंग 11
Read more »
IPL 2024, RCB vs SRH Dream11 Prediction: आरसीबी और सनराइजर्स हैदराबाद के मैच में इन खिलाड़ियों को दें फैंटेसी टीम में मौकाRCB vs SRH Dream11 Prediction, Royal Challengers Bengaluru vs Sunrisers hyderabad Playing XI: जनसत्ता.कॉम ने रॉयल चैलेंजर्स बैंगलोर और सनराइजर्स हैदराबाद के मैच की संभावित ड्रीम इलेवन तैयार की है।
Read more »
RCB vs SRH IPL 2024RCB ve SRH arasındaki IPL 2024 maçı hakkında haberler ve güncellemeler.
Read more »
RCB vs SRH Pitch Report: चिन्नास्वामी में लगेगा रनों का अंबार या गेंदबाजों की होगी चांदी? जानें कैसा खेलेगी पिचRCB vs SRH Pitch Report, 15 April: रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु और सनराइजर्स हैदराबाद एक दूसरे से लोहा लेने वाले हैं। दोनों टीमों के बीच एक रोमांचक मुकाबले की पूरी उम्मीद है।
Read more »