Rane-Thackeray Clash: राणे समर्थकांकडून तुमच्यावर हल्ल्याचा प्रयत्न? आदित्य ठाकरे म्हणाले 'माझ्या खिशात...'

Chhatrapati Shivaji Maharaj News

Rane-Thackeray Clash: राणे समर्थकांकडून तुमच्यावर हल्ल्याचा प्रयत्न? आदित्य ठाकरे म्हणाले 'माझ्या खिशात...'
Aditya ThackerayNarayan RaneRajkot Fort
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 87 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 52%
  • Publisher: 63%

Chhatrapati Shivaji Maharaj: मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राजकारण तापलं असतानाच ठाकरे-राणे समर्थक भिडले आहेत.

Rane-Thackeray Clash: राणे समर्थकांकडून तुमच्यावर हल्ल्याचा प्रयत्न? आदित्य ठाकरे म्हणाले 'माझ्या खिशात...'

मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राजकारण तापलं असतानाच ठाकरे-राणे समर्थक भिडले आहेत. महाविकास आघाडीकडून मोर्चाची घोषणा करण्यात आली असतानाच केंद्रीय मंत्री नाराणय राणे राजकोट किल्ल्यावर पोहोचले होते. दरम्यान त्याचवेळी आदित्य ठाकरेदेखील आले आणि काही क्षणात ठाकरे आणि राणे समर्थक आपापसात भिडले. आदित्य ठाकरे यांनी आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न होता असा आरोप केला आहे. तसंच उंचीप्रमाणे बालबुद्धी असा टोला लगावला आहे.

राड्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की,"हे फार दुर्देवी आणि बालिशपणाचं आहे. एका कॅमेऱ्यामनला धक्काबुक्की झाली आणि त्यातून सुरुवात झाली. मी कार्यकर्त्यांना महाराजांच्या किल्ल्यात राजकारण करायचं नाही सांगत अडवलं आहे". मला या बालिशपणात जायचं नाही. त्यांची हीच शिकवण आहे. उंचीप्रमाणे त्यांची बालबुद्धी आहे असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला.

आम्ही येथे नीट येत होतो. ही काय लढाई करण्याची जागा आहे. ही बालबुद्धी किती दिवस सहन करायची असाही संताप त्यांनी व्यक्त केला. दरम्यान तुमच्यावर हल्ल्याचा प्रयत्न होता का? अशी विचारणा केली असता आदित्य ठाकरे म्हणाले की,"माझ्यावर हल्ला करण्याचा 100 टक्के हेतू होता. कारण ते मला घाबरतात. पण माझ्या खिशात कोंबड्या नाहीत".आदित्य ठाकरे यांनी राजकोट किल्ल्याची पाहणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की,"माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नाहीत.

"जूनमध्ये डागडुजीसाठी पत्र गेलं होतं, म्हणजे लगेच गंज चढला. पंतप्रधानांना खूश करायचं, त्यांच्याकडून कार्यक्रम करुन घ्यायचा यासाठी हे झालं आहे," अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. काल एक निर्लज्ज मंत्री येथे आले आणि यातून चांगलं काहीतरी करु असं म्हणाले. म्हणजे याच्यातून अजून पैसे कमवायचे आहेत. यांना मंत्री म्हणून फिरताना लाज वाटली पाहिजे. तुम्ही असताना या पुतळ्याचं अनावरण झालं होतं. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी यापेक्षा जास्त वारे सहन करतो.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Aditya Thackeray Narayan Rane Rajkot Fort Malvan

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

'..तर शरद पवार, उद्धव ठाकरेंना विधानसभेला एकही सभा घेता येणार नाही'; राज ठाकरे कडाडले'..तर शरद पवार, उद्धव ठाकरेंना विधानसभेला एकही सभा घेता येणार नाही'; राज ठाकरे कडाडलेRaj Thackeray Warns Uddhav Thackeray Sharad Pawar: छत्रपती संभाजीनगरमधील सुभेदारी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ठाकरे-पवारांवर संताप व्यक्त करताना थेट इशाराच दिला.
Read more »

'जरा तुमची दहशत दाखवा,' शर्मिला ठाकरे पोलीस आयुक्तांसमोरच कडाडल्या, 'तुमचा भत्ता...''जरा तुमची दहशत दाखवा,' शर्मिला ठाकरे पोलीस आयुक्तांसमोरच कडाडल्या, 'तुमचा भत्ता...'मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Raj Thackeray Wife Shamrila Thackeray) यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांची (Navi Mumbai Police Commissioner) भेट घेत महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर नाराजी जाहीर केली आहे.
Read more »

आमचं सरकार 2-3 महिन्यात येईलच, तोपर्यंत हा निर्णय...; ठाकरेंचं मुंबईकरांना आश्वासनआमचं सरकार 2-3 महिन्यात येईलच, तोपर्यंत हा निर्णय...; ठाकरेंचं मुंबईकरांना आश्वासनUddhav Thackeray Latest News: उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा धारावी पुर्नविकासावर सवाल उपस्थित केले आहेत. तसंच, मुंबईकरांना आश्वासनदेखील दिले आहे.
Read more »

ठाकरेंनी दिल्ली दौऱ्यात रॅण्ड घोटाळ्यातील आरोपीची घेतली भेट, शिंदे गटाकडून खळबळजनक आरोपठाकरेंनी दिल्ली दौऱ्यात रॅण्ड घोटाळ्यातील आरोपीची घेतली भेट, शिंदे गटाकडून खळबळजनक आरोपNaresh Mhaske on Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुक जसजशी जवळ येतेय तसतसे ठाकरे गट आणि शिंदे गटातील भांडणे विकोपाला चालली आहेत.
Read more »

Maharashtra Bandh: मुंबईत लोकल, बस उद्या बंद राहणार?Maharashtra Bandh: मुंबईत लोकल, बस उद्या बंद राहणार?Maharashtra Bandh: उद्या कडकडीत बंद पाळा असं आवाहन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं आहे. तसंच लोकल आणि बससेवा बंद ठेवावी असं म्हटलं आहे.
Read more »

'फडणवीस कुठल्या तोंडाने...', 'त्या' विधानावरुन ठाकरे गट संतापला! म्हणाले, 'राज्याच्या गृहखात्याची...''फडणवीस कुठल्या तोंडाने...', 'त्या' विधानावरुन ठाकरे गट संतापला! म्हणाले, 'राज्याच्या गृहखात्याची...'Badlapur Sexual Harassment Case Uddhav Thackeray Group Vs Fadnavis: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलापूरप्रकरणीही विरोधकांनी राजकारण करू नये असं विधान केल्याच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाने फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
Read more »



Render Time: 2025-02-24 16:49:48