Sharad Pawar on Manipur violence : महाराष्ट्रात मणिपूरसारखं घडेल की काय याची चिंता वाटत असल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. शरद पवारांनी हे वक्तव्य का केलं? खरंच राज्याची सामाजिक परिस्थिती चिंता वाटण्यासारखी झालीय का?
Maharastra Politics : 'मणिपूर'वरून महाराष्ट्रात रणकंदन, शरद पवारांच्या वक्तव्यावर काय म्हणाले राजकीय नेते?
आणि पवारांच्या विधानावर विरोधकांचं नेमकं काय मत आहे.जाणून घेऊयात एका सविस्तर रिपोर्टमधून..मणिपूरच्या मुद्द्यावरुन शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर टीका केलीय. महाराष्ट्रातही मणिपूरसारखं काहीतरी घडेल की काय अशी चिंता वाटतेय असं पवारांनी म्हटलंय. मणिपूरमध्ये जे घडलं तेच आजुबाजूच्या राज्यात घडलं. कर्नाटकात घडलं. मणिपूरवर एवढं मोठं संकट आल्यानंतरही तिथल्या जनतेला दिलासा द्यावा असं मोदींना वाटलं नाही. मोदींनी मणिपूरकडे ढुंकूनही पाहिलं नाही, अशी टीका पवारांनी केलीय.
संसदेत मणिपूरमधील हिंसाचाराची चर्चा झाली. मणिपूरमध्ये पिढ्यानुपिढ्या एकत्र असलेला लहानसा प्रांत अस्वस्थ झालाय. सुसंवाद ठेवणारा समाज आज एकमेकांशी बोलायला तयार नाही, असं म्हणत शरद पवारांनी मोदींवर टीका केली.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केलेलं विधान राज्यातील सामाजिक स्थितीबाबात गंभीरपणे विचार करायला लावणारं आहे. आगामी काळात महाराष्ट्रातही मणिपूर सारखं काही तरी घडेल अशी चिंता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलीय.
निवडणुकीच्या तोंडावर दंगल घडवण्याची भाषा पवारांच्या तोंडून योग्य नसल्याची प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केली. तर पवारांनी हातभार लावू नये असं म्हणत राज ठाकरेंनीही आपल्या खास शैलीत पवारांना खोचक टोला लगावला. तर दुसरीकडं महाराष्ट्र आणि मणिपूरची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे मणिपूरसारखी परिस्थती राज्यात होणार नसल्याचं आमदार बच्चू कडूंनी म्हटलंय.
दरम्यान, राज्याबाबत पवारांनी व्यक्त केलेली चिंता विचार करायला लावणारी आहे. महाराष्ट्रही वर्षभरापासून आरक्षणाच्या आंदोलनांनी ढवळून निघालाय. मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष राज्यात तापलाय. त्यामुळे राज्यकर्त्यांनो एकत्र येऊन यातून मार्ग काढा. महाराष्ट्रातील जातीय सलोखा कायम राहुद्या एवढीच सर्वसामान्यांची आशा आहे.
Manipur Violence Maharastra Politics Political Leaders Raj Thackreay Sharad Pawar Statement Latest Marathi News
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! 'त्या' दिवशी उद्धव ठाकरे शरद पवारांसाठी होते नॉट रिचेबल, उद्धव ठाकरे म्हणाले, 'मविआतून बाहेर...'येत्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडमोडी घडताना दिसत आहेत. विधानपरिषदेच्या निवडणुकीआधी त्या दिवशी उद्धव ठाकरे शरद पवारांसाठी नॉट रिचेबल होते.
Read more »
'हा दिवा मी महाराष्ट्राच्या जेलमध्ये...', शऱद पवारांच्या अमित शाहांवरील टीकेने भाजपा नेते संतप्त, म्हणाले 'खोट्या...'Sharad Pawar on Amit Shah: तो दिवा मी महाराष्ट्राच्या जेलमध्ये पाहिला आहे अशा शब्दांत शरद पवारांनी (Sharad Pawar) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान शरद पवारांच्या या विधानामुळे भाजपा नेते संतप्त झाले असून, जाहीर माफीची मागणी करत आहेत.
Read more »
Maharastra Politics : पवारांच्या मंचावर दादांचे आमदार, पुण्याच्या राजकारणाने अजित पवारांना आणखी एक धक्का?Maharastra Politics : अजित दादांचा एक आमदार थेट शरद पवारांच्या व्यासपीठावर उपस्थित राहिल्यानं एकच खळबळ उडालीय. खरंच अजित पवार गटाला धक्का बसणार की काही वेगळं कारण होतं. पाहुया त्यासंदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट..
Read more »
मी पवारांना सांगितलं आम्ही मुख्यमंत्री, मंत्री झालो तरी...; छगन भुजबळांनी सांगितलं भेटीचं कारणMaharashtra Politics News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले होते .
Read more »
छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर, मात्र अर्धा तासांपासून वेटिंगवरMaharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.
Read more »
हिंदू, हिंसा... राहुल गांधींच्या 100 मिनिटांच्या भाषणावर सभापतींनी चालवली कात्री; अनेक मुद्दे गायबRahul Gandhi Speech In Loksabha : राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते? सत्ताधाऱ्यांनी सभापतींकडे केलेल्या तक्रारीनंतर परिस्थिती इतकी बिघडली?
Read more »