Maharashtra Weather News : आठवड्याची सुरुवात दमदार पावसानं; पाहा कोणत्या भागावर मान्सूनची कृपा, अन् कुठे देणार दणका

Maharashtra Weather News

Maharashtra Weather News : आठवड्याची सुरुवात दमदार पावसानं; पाहा कोणत्या भागावर मान्सूनची कृपा, अन् कुठे देणार दणका
Monsoon NewsMaharashtra Weather NewsMaharashtra Weather Updates
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 78 sec. here
  • 32 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 136%
  • Publisher: 63%

Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये मान्सूनच्या पावसानं भक्कम पकड मिळवली असून, आता हा पाऊस अनेक जिल्ह्यांमध्ये मनमुराद बरसताना दिसत आहे.

Maharashtra Weather News : आठवड्याची सुरुवात दमदार पावसानं; पाहा कोणत्या भागावर मान्सूनची कृपा, अन् कुठे देणार दणका

Maharashtra Weather News medium to heavy rain in mumbai orange alert in konkan vidarbha latest updatesशुक्रवारपासून जोर धरलेल्या पावसानं अद्यापही उसंत घेतली नसून, आता नव्या आठवड्याची सुरुवातही या पावसाच्याच हजेरीनं होणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. राज्यात सक्रिय झालेल्या मान्सूनमुळं कोकणासह घाटमाथ्यावरील परिसरामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे.

मुंबई शहर आणि उपनगरातही पावसानं अद्याप उघडीप दिली नसल्यामुळं शहरातील वातावरणात आल्हाददायक गारवा जाणवू लागला आहे. पुढील 24 तासांमध्ये कोकणातील काही दुर्गम भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकणातील काही भागांमध्ये पाऊस अडचणी वाढवणार असून याच धर्तीवर काही भागांना ऑरेंज तर काही भागांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

रायगड जिल्ह्यात अधून मधून पावसाच्या सरी पाहायला मिळत असून, रविवारच्या तुलनेत सोमवारी पहाटेपासून पावसाचा जोर कमी आहे, मात्र प्रशासनानं सतर्क राहत इथं ऑरेंज अलर्ट जारी केला असून, महाड, माणगाव, पोलादपूर तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. रत्नागिरीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, इथंही प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

मान्सूनचा प्रभाव असणारा कमी दाबाचा पट्टा सध्या अपेक्षित रचनेच्या दक्षिणेकडे झुकला असून, राजस्थानच्या बिकानेरहून निघालेला हा पट्टा बंगालच्या उपसागराच्या पूर्वेपर्यंत प्रभाव दाखवताना दिसत आहे. त्यातच गुजरात ते केरळदरम्यानही समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, देशभरात पावसाची समाधानकारक हजेरी पाहायला मिळेल. मुंबईला पुढील 24 तासांमध्ये काही अंशी जोरदार पावसापासून मोकळीक मिळणार असली तरीही हा पाऊस उघडीप देण्याची शक्यता कमीच आहे हे लक्षात घ्यावं.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Monsoon News Maharashtra Weather News Maharashtra Weather Updates Maharashtra Weather Latest News IMD Monsoon 2024 Predictions Maharashtra Weather Today Unseasonal Rain Weather Updates India Weather Updates Maharashtra Weather Updates Weather News Todays Weather Report Monsoon IMD Mumbai Rains Rain Maharashtra Maharashtra Weather Forecast Mumbai Weather News Mumbai News News महाराष्ट्र हवामान महाराष्ट्रातील आजचे हवामान महाराष्ट्र हवामान विभाग Summer Al Nino La Nina Arabian Sea अरबी समुद्र

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Maharashtra Weather News : सोसाट्याचा वारा अन् जोरदार पाऊसधारा; राज्याच्या 'या' भागात पाऊस पुन्हा देणार दणकाMaharashtra Weather News : सोसाट्याचा वारा अन् जोरदार पाऊसधारा; राज्याच्या 'या' भागात पाऊस पुन्हा देणार दणकाMaharashtra Weather News : मागील दोन दिवसांची उसंत घेतल्यानंतर आता पावसानं पुन्हा एकदा सक्रिय होत महाराष्ट्र व्यापण्यास सुरुवात केली आहे.
Read more »

Maharashtra Weather News : हायअलर्ट! पुढील 12 तास धोक्याचे, 'या' जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्टMaharashtra Weather News : हायअलर्ट! पुढील 12 तास धोक्याचे, 'या' जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्टMaharashtra Weather News : राज्यात मान्सूनचा जोर पुन्हा एकदा वाढलाय. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने पावसाचा काय अंदाज दर्शविलाय जाणून घ्या कुठे अतिमुसळधार...
Read more »

Maharashtra Weather News : पुढील 24 तासांत पाऊस हुलकावणी देणार की दिलासा? हवामान विभागानं स्पष्टच सांगितलंMaharashtra Weather News : पुढील 24 तासांत पाऊस हुलकावणी देणार की दिलासा? हवामान विभागानं स्पष्टच सांगितलंMaharashtra Weather News : देशात सरासरीपेक्षा 20 टक्के कमी पाऊस, तर राज्याच्याही बहुतांश भागांना मान्सूनची प्रतीक्षा. पुढील 24 तासांमध्ये कसं असेल हवामान...
Read more »

Maharashtra Weather News : तो दुप्पट ताकदीनं परतलाय! मुंबईत मुसळधार; कोकणासह विदर्भात वादळी पावसाची शक्यताMaharashtra Weather News : तो दुप्पट ताकदीनं परतलाय! मुंबईत मुसळधार; कोकणासह विदर्भात वादळी पावसाची शक्यताMaharashtra Weather News : राज्याच्या काही भागांमध्ये उसंत घेतलेल्या पावसानं आता पुन्हा एकदा जोर धरला असून, हा पाऊस कोकणाला झोडपून काढताना दिसत आहे.
Read more »

काळजी घ्या! ढगफुटी सदृश्य पावसानं कोकणाला झोडपलं; रायगड, सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्टकाळजी घ्या! ढगफुटी सदृश्य पावसानं कोकणाला झोडपलं; रायगड, सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्टMaharashtra Weather News : महाराष्ट्रात सध्या सुरु असणाय़ऱ्या पावसानं जुलै महिना अर्ध्यावर येत असताना जोर धरला असून, यामुळं कोकणात अनेक भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Read more »

Maharashtra Weather News : राज्यात फक्त 'इथं'च मुसळधार; मान्सून सहलीच्या विचारात असणाऱ्यांना पाऊस देणार तुरी?Maharashtra Weather News : राज्यात फक्त 'इथं'च मुसळधार; मान्सून सहलीच्या विचारात असणाऱ्यांना पाऊस देणार तुरी?Maharashtra Weather News : पावसाचं नेमकं चाललंय काय? काळ्या ढगांचा चकवा आता चिंता वाढवतोय.... जाणून घ्या हवामान विभागाचं यावर नेमकं काय मत?
Read more »



Render Time: 2025-02-25 02:41:38