LokSabha Election: देशात उद्या म्हणजेच 19 एप्रिलला लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दरम्यान लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावं या हेतून काही शहरांमध्ये बँक हॉलिडेची घोषणा करण्यात आली आहे.
: संपूर्ण देशाला प्रतिक्षा लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान उद्या म्हणजेच 19 एप्रिलला होणार आहे. मतदान सुरळीत पार पडावं यासाठी निवडणूक आयोगाने सर्व तयारी केली आहे. लोकांनी घऱाबाहेर पडून जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावं असं आवाहन निवडणूक आयोगाकडून वारंवार केलं जात आहे. दरम्यान, निवडणुकीची टक्केवारी वाढावी या हेतूने मतदानाच्या पहिल्या दिवशी काही शहरांमध्ये बँक हॉलिडेची घोषणा कऱण्यात आली आहे.
ET च्या वृत्तानुसार, चेन्नई, देहरादून, इटानगर, जयपूर, कोहिमा, नागपूर आणि शिलॉन्ग येथील बँका 19 एप्रिल 2024 रोजी बंद राहतील. लोकसभा निवडणूक, तसंच अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2024 आणि कन्याकुमारी जिल्ह्यातील विलावनकोड मतदारसंघातून तामिळनाडू विधानसभेची पोटनिवडणूक याच्या आधारे हा बँक हॉलिडे जाहीर करण्यात आला आहे.लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यात मतदान होणार आहे. 19 एप्रिलपासून मतदानाला सुरुवात होणार असून यानंतर 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे, 25 मे आणि 1 जून 2024 पर्यंत चालू राहील.
1) उत्तराखंड सरकारने 19 एप्रिल हा दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित केला आहे. उत्तराखंड सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने हा निर्णय जारी केला आहे.
Lok Sabha Election 2024 Lok Sabha Election Banks Closed On April 19 Bank Holiday Reserve Bank Of India RBI Uttarakhand Nagaland Tamil Nadu Banks Closed Tomorrow Phase 1 Voting Election News Election News 2024 Lok Sabha Chunav Pm Election 2024
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
LokSabha : साताऱ्यात उमेदवारी, उदयनराजेंची कॉलर टाईट; नाशिकचं काय?Maharastra Loksabha Election 2024 : सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आल्यावर उदयनराजेंची कॉलर टाईट झालीय. पण नाशिकमध्ये अद्याप सावळा गोंधळ पहायला मिळतोय.
Read more »
LokSabha: नारायण राणेंना रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून उमेदवारी जाहीर; एकनाथ शिंदेंची अखेर माघारभाजपाने रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रत्नागिरी सिंधुदुर्गमधून मतदासंघावरुन महायुतीमध्ये पेच होता.
Read more »
शिंदे सरकारच्या 10% आरक्षणावरुन मराठ्यांना धक्का! कोर्ट म्हणालं, 'शैक्षणिक प्रवेश, नोकऱ्या..'Maratha Aarakshan High Court Verdict Instruction: मराठा समाजाला राज्य सरकारने 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर या प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी 13 जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
Read more »
Loksabha Election 2024: महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदान कधी? कुठे? कोणत्या नेत्यांचं भविष्य मतपेटीत होणार कैद?Loksabha Election 2024 Maharashra First phase of voting : लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचं मतदान 19 एप्रिलला पार पडणार असून या टप्प्यासाठीच्या प्रचाराच्या तोफा बुधवारी सायंकाळी थंडावणार आहेत.
Read more »