IND vs BAN: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विकेटकिपर ऋषभ पंत (Rishabh Pant) यांचा डीआरएस (DRS) घेण्याचा निर्णय चुकला असता मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) चांगलाच संतापलेला पाहायला मिळाला.
IND vs BAN: 'त्याला पुन्हा कधी....', मोहम्मद सिराज मैदानातच संतापला, रोहित शर्माने हात जोडून मागितली माफी, पंत ठरला कारण
IND vs BAN: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विकेटकिपर ऋषभ पंत यांचा डीआरएस घेण्याचा निर्णय चुकला असता मोहम्मद सिराज चांगलाच संतापलेला पाहायला मिळाला.भारत आणि बांगलादेशमधील पहिल्या कसोटी सामन्यात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 376 धावांवर सर्वबाद झाला असून, फक्त 27 धावांमध्ये शेवटचे चार विकेट्स गमावले. हसन महमूद याने सलग चार विकेट मिळवले. तस्कीन अहमदने तीन विकेट मिळवले.
सध्या सर्व बाबी भारतीय संघाच्या बाजूने दिसत आहे. आकाश आणि जसप्रीत बुमराह यांनी बांगलादेशच्या फलंदाजांसमोर चांगलंच आव्हान उभं केलं आहे. भारताने अद्याप तरी कोणताही चुकीचा निर्णय घेतलेला नाही. फक्त कर्णधार रोहित शर्माने घेतलेल्या एका डीआरएसचा अपवाद त्यात आहे. बांगलादेशचा आघाडीचा फलंदाज झाकीर हसन फलंदाजी करत असताना रोहित शर्माने हा डीआरएस घेतला होता.
मोहम्मद सिराज चौथी ओव्हर टाकत असताना चेंडू झाकीर हसनच्या पायावर लागला. सिराजने एलबीडब्ल्यूसाठी अपील केली असता अम्पायरने नाबाद दिलं. यावेली मोहम्मद सिराज रिव्ह्यू घेण्यासाठी आग्रह करत होता. मात्र ऋषभ पंतचं मत वेगळं होतं. अखेर रोहित शर्माने मोहम्मद सिराजकडे दुर्लक्ष केलं आणि पंतचं म्हणणं ऐकलं.चेंडू हसनच्या पॅडवर लागल्यानंतर रोहित शर्मा, 'वरती आहे? नाही? निघतोय' असं बोलत असल्याचं स्टम्प माईकमध्ये कैद झालं आहे. रोहितने पंतचा सल्ला ऐकला होता.
यादरम्यान समालोचन करणारे रवी शास्त्री यांनीही, सिराजला रिप्ले दाखवू नका, त्याला अजिबात आवडणार नाही असं म्हटलं."सिराजने जिथून डिलिव्हरी केली आहे ते पाहिल्यास, ते स्टंपच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे मला वाटतं की 50-50 टक्के संधी आहे. तो डिलिव्हरीच्या वेळी स्टंपच्या जवळ जातो त्यामुळे लेग बिफोरची शक्यता जास्त असते," असं त्यांनी सांगितलं.Full Scorecard →
Rohit Sharma Mohammed Siraj DRS
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
IND vs BAN: आखिर क्यों LIVE मैच में पंत को सिराज से मांगनी पड़ी माफी, बैठे बिठाए हो गया नुकसानIND vs BAN: चेपॉक स्टेडियम में खेले जा रहे मुकाबले में कुछ ऐसा हुआ कि विकेटकीपर-बल्लेबाज ऋषभ पंत को लाइव मैच में मोहम्मद सिराज से माफी मांगनी पड़ी.
Read more »
शाहरुखच्या 'जवान' सिनेमात काम केल्याचा अभिनेत्याला पश्चाताप, 'तो' रोल का केला?शाहरुख खानचा जवान सिनेमा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याला कारण आहे सिनेमातील अभिनेत्याने सांगितल्या जुन्या आठवणी.
Read more »
Rishabh Pant: 634 दिन बाद टेस्ट में वापसी कर पंत ने किया बड़ा कारनामा, 24 साल बाद भारतीय क्रिकेट में हुआ ऐसा करिश्माRishabh Pant Test Record; IND vs BAN 1st Test: बांग्लादेश के खिलाफ खेलते हुए टीम इंडिया के लिए ऋषभ पंत ने एक और रिकॉर्ड अपने नाम कर लिया है
Read more »
IND vs BAN: 634 दिन बाद टेस्ट में वापसी कर पंत ने किया बड़ा कारनामा, 24 साल बाद ऐसा करिश्मा करने वाले दूसरे भारतीयIND vs BAN 1st Test: बांग्लादेश के खिलाफ खेलते हुए टीम इंडिया के लिए ऋषभ पंत ने एक और रिकॉर्ड अपने नाम कर लिया है
Read more »
IND vs BAN: बांग्लादेश के लिए 'स्पेशल हथियार' तैयार कर रहे हैं रोहित-गंभीर, भारत की जीत अब हो गई पक्की!IND vs BAN: बांग्लादेश के साथ खेली जाने वाली टेस्ट सीरीज के लिए भारतीय क्रिकेट टीम के कप्तान रोहित शर्मा और हेड कोच गौतम गंभीर ने स्पेशल प्लान तैयार किया है.
Read more »
Ind vs Ban: अगर बांग्लादेश के साथ खेला ड्रॉ, तो टीम रोहित के साथ आईसीसी रैंकिंग में हो जाएगा यह बड़ा खेला, जानें पूरा गणितInd vs Ban:बांग्लादेश के साथ इसी महीने होने जा रही टेस्ट सीरीज टीम रोहित के लिए बहुत ही ज्यादा अहम है
Read more »