Eknath Shinde Resigned As Chief Minister Of Maharashtra: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील यावेळेस राजभवानामध्ये उपस्थित होते.
Eknath Shinde Resigned As Chief Minister Of Maharashtra:
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. एकनाथ शिंदेंनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये शिंदेंनी राजीनामा सुपूर्द केला आहे. राज्य सरकारचा कार्यकाळ आज संपणार आहे. 26 नोव्हेंबर ही विद्यमान विधानसभेच्या कार्यकाळाची शेवटची तारीख असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
भारतीय जनता पार्टीने विधानसभा निवडणुकीमध्ये 132 जागांवर विजय मिळवला असून शिंदेंच्या शिवसेनेनं 57 जागांवर विजय मिळवला आहे. अजित पवारांच्या पक्षाने 41 जागांवर विजय मिळवला आहे. महायुतीचा मुख्यमंत्री कोण यासंदर्भात केंद्रीय नेतृत्वाशी बोलून आम्ही योग्य तो निर्णय घेऊन असं एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वेळोवेळी सांगितलं आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 Maharashtra CM Oath Ceremony Oath Ceremony शपथविधी
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
'त्यांनी पक्षश्रेष्ठींना स्पष्ट सांगितलेय की...'; शिंदेंच्या नाराजीबद्दल विचारल्यावर केसरकरांचं विधानEknath Shinde Resigned As Chief Minister Is He Unhappy: एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला.
Read more »
लाईट बील 30 % कमी करणार, लाडक्या बहिणींना 1500 रुपयांऐवजी...; CM शिंदेंची 10 वचनंMaharashtra Assembly Election Eknath Shinde Kolhapur Rally: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोल्हापूरमधील महायुतीच्या जाहीर सभेतील भाषणादरम्यान 10 महत्त्वाच्या घोषणा केल्या असून यामध्ये त्यांनी 2029 च्या महाराष्ट्राचाही उल्लेख केला आहे.
Read more »
'उद्धव ठाकरे आमच्यासाठी देव होते, मात्र एकनाथ शिंदेंनी फसवलं'; 'या' आमदाराने सोडलं अन्न पाणी; म्हणतो 'मी आयुष्य...'Srinivas Vanga on Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने श्रीनिवास वनगा (Srinivas Vanga) नाराज असून त्यांनी अन्न, पाणी सोडलं आहे. ते मानसिकदृष्ट्या खचले असून आता आत्महत्येचा विचार कर आहेत.
Read more »
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: नाना पटोले राजीनामा देण्याची शक्यताMaharashtra Breaking News Today LIVE Updates: राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार? पाहा आजच्या दिवसातील सर्व लहानमोठ्या घडामोडींच्या अपडेट एका क्लिकवर...
Read more »
Maharashtra Assembly Election: ...तर मला अटक करतील; जाहीर सभेत CM शिंदेंनी व्यक्त केली भितीMaharashtra Assembly Election: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ रविवारी भाऊबीजेच्या दिवशीच फोडला. एका जाहीर सभेमध्ये शिंदेंनी स्वत:च्याच अटकेची शक्यता व्यक्त केली आहे. नेमकं ते काय म्हणालेत पाहूयात...
Read more »
'ही' भीती असल्याने CM शिंदेंनी राज ठाकरेंच्या लेकाविरुद्ध उमेदवार दिला; राऊतांचा दावाMaharashtra Assembly Election 2024: उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे खासदार तसेच प्रवक्ते संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या राजकीय भूमिकेवरुन खोचक शब्दांमध्ये निशाणा साधल्याचं दिसत आहे.
Read more »